वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
12/13/08
घर
आमचं घर फारस मोठ नाही. प्रशस्त होत पण मोठ नव्हत. शेजारच्या आजोबांनी आणि माझ्या आजोबांनी मिळुन ते घर घेतल होत. शेजारच्या आजोबांचा वाटा मोठा होता. आमच्या घरात मध्यभागी अंगण होत आणि तिन्ही बाजुंनी घराच्या खोल्या अंगणात उघडत असत. चौथ्या बाजुला न्हाणीघर होत. डाव्या अंगानी गच्चीवर जायला जिना होता. वरच्या मजल्यावर अजुन दोन खोल्या आणि गच्ची होती. घराच्या मागल्या बाजुला एक लहानशी बोळ होती. तीत बरीच झाडी आणि गवत वाढल होत. माझा बेत त्या गल्लीतून घराच्या मागल्या बाजूनी वर चढण्याचा होता. एक मजलीच घर होत त्यामूळे चढता येण शक्य झाल असत. मी मागल्या बोळात उभ राहून नेमक कुठुन आणि कस चढायच याचा विचार करत होतो. काहीतरी धाडसी कृत्य करणार या विचारानी माझ्या अंगावर रोमांच आला होता. चढायच्या आधी मी भिंतीला कान लाऊन आडोसा घेतला तर घरातून अगम्य असा थड-थड असा आवाज येत होता. मी पाईपला धरून वर चढु लागलो तर तो आवाज वाढत गेला. मी गच्चीवर पोचलो तर घरभर विचित्र वातावरण होत. थड-थड आवाज तर येतच होता आणि कसला तरी जळण्याचा वास येत होता. सगळी कडे जळमट लागली होती. भिंतींवरून काहीतरी ठिकठिकाणी लोंबकळत होत. मी निरखुन बघितल तर कोणीतरी पोपडे खरचचवून काढले होते.आम्हाला जाऊन एक आठवडाही झाला नव्हता त्यात घराची एवढी अवदशा ? वरच्या दोन खोल्याच्या दारांवर व खिडक्यांवर गडद पोपटी रंगाचे फुलाफुलांचे पडदे घट्ट लावले होते. त्यामागे गाद्या असाव्यात. बहुतेक आवाज बाहेर जाऊ नये म्हणुन असाव. म्हणजे फक्त खालच्या घरात नव्हे तर वरच्या खोल्यांमधेही कोणीतरी आहे या विचारानी मी सावध झालो. पण घरात अस कोंडून घेऊन ही लोक नेमक काय करतायत ते कळत नव्हत. बाबा समोरून चढून येणार होते ते अजुन पोचलेच नव्हते. खरतर घराच्या समोरच्या बाजुनी चढण सोप होत. त्यांना समोरून धरल तर नाही या विचारानी मला घाम फुटला. तसेही ते गच्चीत भेटणार होते की मधल्या चौकात ते त्यांनी सांगितलच नव्हत. वाट तरी किती बघायची? गंमत-जंमत थोडीच चालली होती.
मी मांजरीच्या पावलांनी जिना उतरत मधल्या चौकात आलो. थड-थड आवाज घड्याळाच्या काट्याप्रमाणे येत होता. मधल्या चौकातला पाळणा काढून ठेवला होता. कुंडीतली झाड जळून गेली होती. रॉकेल टाकुन जाळली होती. बहुधा तोच वास असावा. रॉकेल टाकुन झाड जाळावी या कल्पनेनी माझ्या अंगावर काटा आला. च्यायला चालल काय आहे? मला घरातून पावलांची आवाज ऐकु येऊ लागले. सिमेंटच्या पोपड्यावर कसलीतरी खरखरीत पाऊल पडत होती. न्हाणीघराच्या दरवाज्यांना मोठ्ठ कुलुप लावल होत. स्वयंपाकघरात जाणारा दरवाजा बाहेरच्या दरवाज्यासारखा किलकिला उघडा होता. संरक्षणासाठी हातात काहीतरी हव म्हणुन मी शोधाशोध करू लागलो. पण काहीच मिळेना. माझ्या अचानक लक्षात आल कि घरातून येणारे आवाज थांबले आहेत. थड-थड आवाजही थांबलाय. माझ्या शोधा-शोधीत माझी चाहूल आतल्यांना लागली असावी. आता मात्र जास्त वेळ घालविण्यात अर्थ नव्हता. मी तडक स्वयंपाकाघराच्या दरवाज्याकडे सरसावलो. क्षणभर मी दरवाज्यापुढे रेंगाळलो. आत काय असेल? कोण असेल? हे सगळ गुढ काय आहे? बाबा कुठेयत? उगाच शिवाजी बनुन इथे आलो. आधी दोन-चार लोकांना एकत्र करूनच यायला हव होत. पण आता मागे फिरण नव्हत एवढ नक्की. आता आर-या-पार!
डोंबल आर-या-पार. हातात शंख आणि चाललो मी चोरांना पकडायला. पण घरात चोर आहेत कशावरून? विक्षिप्त विचारांनी डोक्यात पिंगा घातला होता.
शेवटी मी किलकिला दरवाजा हळुच ढकलला. घरात अंधार होता. पण अर्धवट उघड्या दरवाज्याच्या प्रकाशात भिंतींच्या वीटा दिसत होत्या. मी डोकावून उजवीकडे नजर टाकली तर देवघराच्या दारातून कोणीतरी माझ्याकडे डोकावून बघत होत. ती नजर स्थिर होती आणि इतक्या दूरून मला त्या खुनशी नजरेनी थंड केल. माझ्या डाव्या डोळ्याची पापणी भीतीनी फडफडु लागली पण ती नजर स्थिरच होती. मी खालती बघितल तर मला त्या आकृतीच्या हातातली कुर्हाड पुसटशी दिसली. माझा मेंदू गुंग झाला होता आणिहृदय छातीतून उडी मारून पळून जायची तयारी करत होत. माझ्या पायाला काहीतरी ओल लागल. रक्त होत ते! मी ओरडण्याचा प्रयत्न करू लागलो. पण भीतीनी घशातून आवाजच फुटेना. तोंडाला कोरड पडली होती. तेवढ्यात कुठुनतरी चिन्मय चिन्मय हाक ऐकु येऊ लागली. म्हणजे बाबा आलेत की काय?
"काय झाल बाळा?" बाबा मला हलवुन उठवत होते.
मी खडबडुन जागा झालो. अजुन बस नागपूरला पोचायचीच होती. हे सगळ स्वप्न होत या विचारानी मला हायस वाटल.
पाणी हवय का बाळा?" बाबांनी विचारल. आजुबाजुची बरीच मंडळी माझ्याकडे बघत होती. सगळ्यांसमोर बाबा मल 'बाळ' म्हणत होते त्याची मला थोडी लाज वाटत होती.
"काही तरी विचित्र स्वप्न पडल होत" मी म्हटल.
"नशिबवान आहेस. खड्ड्यातून इतक अंग घुसळत असतांना तुला बरी स्वप्न पडतात!" बाबा हसत म्हणाले.
परत थड-थड आवाज येऊ लागला. समोरच्या सीटवर बसलेल्या कोणाचा तरी स्टील चा डब्ब्याचा तो आवाज होता. त्या डब्ब्यातून तेल गळुन माझा पाय माखला होता.
11/29/08
आपण सारे अर्जुन! *
आपला समाज शंढा सारखा हा नर-संहार कसा सहन करतोय? आपल्या समाजाच कौतुक कराव तितक थोडं आहे. बहुतेक सवय झाल्यावर कशाचीही तीव्रता कमी होते. हि भयानक स्थिती काही पहिल्यांदा आपल्यावर लोटली नाहीया. मूर्ख पत्रकार जगत या घटनेला भारताच ९/११ घोषित करू बघत आहे. अमेरिकेच्या भूमीवर ९/११ च्या आधी कधीच हल्ला झाला नव्हता. जेंव्हा की भारतावर अनेक ९/११ च्या भीषणतेचे हल्ले झाले आहेत. १९९३ चे स्फोट कस कोणी विसरू शकत? गेल्या पाच वर्षात (मूर्ख आणि नालायक शिवराज पाटील यांच्या गृह मंत्रालया अंतर्गत) भारताच्या प्रत्येक मुख्य शहरात स्फोट झाले आहेत. मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, बंगालुरु, हैद्राबाद, अहमदाबाद. आता फारशी शहरच उरली नाहीयात.
या सगळ्या नर-संहारात अलिप्तपणे मनमोहन सिंग आणि शिवराज पाटील वावरतायत. जणु काही झालच नाही. अफझल गुरु ला फाशी का द्यायची? अतिरेक्यांनी गोळीबार केलेला चालेल पण पोलिस अतिरेक्यांना कसे काय मारू शकतात? दिल्लीला एका शूरवीर पोलिसाने आपले प्राण दिलेत तर त्यावर वादंग उठविण्यात (अत्यंत घृणास्पद मुलायम सिंह आणि अमर सिंहा सोबत) मनमोहन सिंहच आघाडीवर होते. स्वदेशाच्या पोलिस अधिकार्यांचे मनोबल खच्ची कसं कराव हे या लोकांकडून शिकाव. गेल्या महिन्यात कुठे तरी भाषण देतांना (या अकलेच्या कांद्याला भाषण देण्या पलिकडे काही येत का?) माननीय मनमोहन सिंह म्हणालेत की "सामान्य जनता पोलिस दलावर इतका अविश्वास का दाखवते याचा पोलिस दलाने विचार कराव" अरे नालायका, आपल्या माजघरात-देवघरात येऊन हि मुसलमानी अतिरेकी संहार मांडतायत आणि तू निष्क्रियतेची साक्षात मूर्ती कसा बनलेला आहेस हा विचार करून आम्हा सामान्यांची डोकी पिकली आहेत त्याच काय? आपल्या प्रेमळ शिवराज पाटीलांना मुसलमानी अतिरेकी आणि माओवादी अतिरेकी 'हरवलेले तरूण' वाटतात. त्या दैत्यांवर गोळ्या चालविण्या ऐवजी गुलाब पाण्याचा छिडकावा करायला हवा या मनोवृत्तीचे शिवराज पाटील आहेत. अफझल गुरुला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा दिल्यावरही "त्याला फाशीची शिक्षा का द्यायची?" हा प्रश्न पाटील साहेबांना पडला. सध्याच्या मुंबई नर-संहाराच्या सुरुवातीसच " दोनशे अति-प्रशिक्षित जवान पहाटेच मुंबईला पोचणार आहेत" ही माहिती पाटील साहेबांनी पत्रकारांच्या द्वारे जणु अतिरेक्यांना पोचविली. किती मूर्ख असाव माणसाने! हा इसम मराठी मातीत जन्मला आहे याची मला खरोखरच लाज वाटते. पण या माणसाची लाळ सोनिया बाईंच्या पद-कमलांशी गळते त्यामुळे बाकी भारत चूलीत गेला तरी जो पर्यंत १० जनपथच्या मालकीण बाईंच ताईत गळ्यात आहे तो पर्यंत पाटील साहेबांचा बाल कोणी बाका करु शकत नाही. सोनिया तारी त्याला कोण मारी?
भारतीयांच्या नामुष्कीची ही परिसीमा आहे.
जुनी शस्त्रास्त्र आणि जुनी चिलखत घालुन चढाईस निघालेल्या पोलिसांना बघितल कि जीव भरून येतो. खरच वाईट वाटत. भ्रष्ट असलेत तरी शेवटी समाज रक्षणासाठी प्राण हीच लोक वेचतात. एकतर राजकारण्यांनी पोलिस खात्याचा तमाशा बनवुन ठेवला आहे. एकी कडुन जनतेचा दबाव आणि दुसरीकडुन राजकारण्यांनी हात बांधुन ठेवलेले पोलिस खाते म्हणजे एक दारूण दृश्य आहे. या लोकांना पगार कमी असतात आणि दिवसाला १४ तास काम करावी लागतात. उच्च अधिकारी खालच्या अधिकार्यांशी अत्यंत वाईट वागतात. केवळ नोकरी म्हणुन नाईलाजास्तव काम करणार्या हवालदारांची कीव येते. त्यातून या लोकांच्या हातात नुसता दंडुका! हे डोंबल संरक्षण करतायत समाजाच. मुंबईत घडलेल्या घटनांमधे अतिरेक्यांकडील शस्त्रास्त्र बघितलीत तर दंडुके घेउन हिंडणारे हवालदार हे दृश्य हास्यास्पदच आहे. अर्थात यात चूक पैसे खाण्यात मग्न असलेल्या नेत्यांची आहे. विकासाची काम करतांना कोणी पैसा खाल्ला तर तेवढ वाईट वाटत नाही पण आजकालची नेते मंडळी म्हणजे काम न होऊ देण्यासाठी मुख्यत्वे पैसा खातात. गंमत म्हणजे हीच लोक खुप काळ जगतात.
मुंबईवर हल्ला होणार आहे हे सांगायला कोणा वराह-मिहिराची आवश्यकता नव्हती. तीन (दोन?) वर्षापूर्वी लोकल मधे बाँब स्फोट झालेला होता. तसंच सर्व मुख्य शहरांमधे मनात येइल तेंव्हा अतिरेक्यांनी हल्ले केले होते त्यामुळे मुंबई अगला निशाना आहे हे अपेक्षितच होते. पण हा हल्ला थांबवायचा कसा? मुंबईतील करोडाहुन जास्त लोकसंख्येवर लक्ष ठेवायच कस? तसच प्रत्येक दिवशी मुंबईत ये-जा होत असलेल्या लाखो लोकांचा हिशोब ठेवायचा कसा? इतक्या विस्तृत प्रदेशावर लक्ष द्यायला अदृश्य व्हायला हव. गुप्तचर विभाग कार्यरत हवा तसंच त्यांचा पोलिस खात्याशी सतत संपर्क हवा. अतिरेकी सापडला तर त्याला फार वेळ जिवंत ठेवण्याची गरज नको. न्यायलय सजग हव. कायद्यांची अंमल बजावणी कडक व्हायला हवी. अफझल गुरु सारखे सैतान इतकी वर्ष तुकडे तोडत जिंवत ठेवायला नको. कायदा चोख असला तर दुष्कृत्य करायचे ध्राष्ट्य होत नाही. समाज संरक्षणाची हि शस्त्र नीट वापरली तर मुंबई सारख्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आणि असं होण फार कठीण आहे अश्यातलाही भाग नाही. के.पी एस. गिल यांनी अश्याच तर्हेनी पंजाब शांत केल. पण हे चक्र इथे थांबायला नको.
हे धर्म-युध्द आहे. आणि याची जाणीव जो पर्यंत आपल्या समाजाला होत नाही तो पर्यंत परिस्थिती कठिण आहे. येथे धर्म म्हणजे हिंदु-मुसलमान युध्द अपेक्षित आहे. मुंबईत या क्षणी बरीच मुसलमान पोलिस प्राणाची बाजी लावायला मागे-पुढे बघणार नाही. पण ही सर्व अतिरेकी मंडळी केवळ एकाच धर्मातून येतात हे सुध्दा मान्य करण आवश्यक आहे. या लोकांना प्रगती बघवत नाही. धर्मांध आणि धर्म-पंगु असलेल्या या लोकां विरुध्द लढायला सर्व समाजात एकजूट हवी. शेवटी पोलिस अधिकारी काय, स्पेशल कमांडो काय किंवा न्यायाधीश काय, हे सगळे समाजाचे अंग आहेत. थोडक्यात समाजाने स्वरक्षण स्वतःच करायला हव. श्वान जातीची राजकारणी मंडळी झी-प्लस सिक्युरीटीत रहातात. यांच्या घरच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत. यांच्या वर गोळ्यांचे किंवा बाँबचे हल्ले होत नाहीत म्हणुन ही सगळी गांधीगिरी यांना सुचते. जनतेचे सेवक म्हणवणार्या या सैतानांपासुनच आपल्या सामान्यांना स्व-रक्षण करणे आवश्यक आहे. मुसलमानी अतिरेकी तर बोलुन चालून शत्रूच आहेत. पण नेत्यांच्या जातीने उपस्थित घरभेद्यांची खबर आपल्याला आधी घ्यायला हवी. आणि त्या साठी मताधिकारासारखे शस्त्र नाही. या सत्ता-पिपासु कुत्र्यांना त्यांची जागा दाखवुन द्यायला मताधिकारासारखा पट्टा नाही. आवश्यक प्रश्न विचारणे हे सुशिक्षित समाजाच कर्तव्य आहे. आणि बरोबर उत्तर न मिळाल्यास निवडणुका जिंकु न देण्याचे कार्य करणे आवश्यक आहे.
या युध्दात मार्गदर्शन करण्यासाठी श्री कृष्ण मिळण्याचे आपले भाग्य नाही. याचा अर्थ असा नव्हे की आपण सर्वांनी अर्जुन बनुन दिढमुढ व्हाव. मुंबई हत्या-सत्र काय किंव्हा दिल्ली, जयपूर आणि गुवाहाटीतील बाँब-स्फोट काय, या सगळ्या अघोरी भविष्याकडे जाणार्या पाऊलवाटा आहेत. परिस्थिती बिकट आहे आणि एकजुट होऊन सक्रियतेने बदल घडवुन आणण्यासाठी परिश्रम तातडीने घेतले नाहीत तर भविष्यात अत्यंत भीषण काळोख आहे.
----*----
*आपण सारे अर्जुन हे व. पु. काळे यांच्या शेवटल्या पुस्तकांपैकी एक आहे. ललित शैलीत आपल्या समाजाचे संभ्रमित स्वरूप त्यांनी मांडले आहे. वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे ही विनंती. त्या पुस्तकाचे शिर्षक प्राप्त परिस्थितीस तंतोतंत लागू होते म्हणुन मी माझ्या या लेखालाही तेच शिर्षक कायम ठेवले आहे.
9/30/08
वायफळ बडबड
गेल्या शनिवारी एका प्रख्यात इतिहासकाराच्या सांनिध्यात वेळ घालविण्याची संधी मिळाली. बर्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यांच्या सारख्या थोरा-मोठ्यांनी माझ्या सारख्या पोरा-टोरांना वेळ द्यावा ही थोडी नवलाईची गोष्ट वाटते. कोणाला भेटाव आणि कोणाला भेटू नये यातून थोरपणा सिध्द करणारे राजकीय नेत्यांच्या जमातीत मोडतात. याला मी भाड्याचा थोरपणा म्हणतो. खरे थोर हे त्यांच्या कार्यामुळे ठरतात. एका ध्येयासाठी आपले आयुष्य वेचण हि काही सोपी गोष्ट नाही. कुठला तरी लेख, भाषण किंवा चित्रपट बघुन भारावून सगळेच जातात पण दुसर्या दिवशी ये-रे माझ्या मागल्या सारख आपण आपल्या आयुष्यात परत गुरफटुन जातो. थोडक्यात आपण आपले सामान्यत्व दुसर्याच घटकेला सिध्द करतो. पण काही 'वेडगळ' लोक असतात जे नुसते भारावून न जाता त्या विचारसरणीत स्वत:ला झोकुन देतात. समाजाच्या प्रगतीसाठी झटत रहातात. या मार्गातील कठिण परिस्थितीतून ते असामान्य होउन बाहेर पडतात. राजकीय नेते ज्यांचे पुतळे सगळी कडे दिसतात, ते फक्त पुतळ्यांच्याच रूपात समाजाचा एक अर्थहिन भाग बनतात. तर हि असामान्य लोक समाजाला समृध्द करून अमर होतात. असली लोक फार अल्प संख्येत आढळतात. ती लोकं पटकन ओळखुही येत नाही. या लोकांना शोधाव लागत. सध्य-परिस्थितीत या लोकांची आपल्या समाजाला नितांत आवश्यकता आहे.
भारतात सध्या दिवाळीच्या आधीच धमाक्यांची माळ लागलीय. लोकांचे जीव जातायत आणि आपले शिवराज पाटील मात्र त्यांच्या खुर्चीत स्थिर आहे. एका परदेशी बाईचे पाय चाटण्यात भूषण मानणार्या या मराठी माणसाची कीव येते. आणि असल्या शंख माणसाला निवडूण दिल्याबद्दल भारतीय समाजाचा राग येतो. पण काही मार्ग दिसत नाही. समाज जातींच्या विभाजनाने पोखरलेला आहे. प्रत्येकाला आरक्षणात हिस्सा हवा. भारतीय समाजाचे विभाजन करण्याचे इंग्रजी सत्तेने चालू केलेले कार्य आजचे नेते धडाडीने पुढे करतायत. त्यातूनच विश्वनाथ प्रताप सिंह किंवा अर्जुन सिंह सारखे अत्यंत घृणास्पद आणि गलिच्छ व्यक्ति देशाचे भविष्य अंधारात ढकलतात. तरीही कुंभकर्ण रूपी समाजाची निद्रा चळत नाही हे आश्चर्यच आहे. घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजु शकत नाही. तस सगळ्या गोष्टी समजुनही समाज त्यावर काही कृती करण्यास नकार देत असेल तर खुदा बचाए!
बर्याच गप्पा झाल्यात. तिसरा लेख लिहिला गेला हे बरं झाल. त्यातून काही फारस निष्पन्न होणार आहे अश्यातला भाग नाही पण मनाला खोटा दिलासा मिळणार एवढच.
9/16/08
शिव-राज्यारोहण - भाग १
मी अक्षरशः दर दोन ओळींमागे महाराजांनी स्वार्थासाठी स्वतःचे सिंहासन स्थापन केले नाही अस म्हणतो आहे. कारण या राज्यारोहणामागे स्वार्थ असता तर त्यांनी १६७४ उजाडण्याची वाट बघितली नसती. १६६८ मधेच तो कार्यक्रम त्यांनी उरकला असता. पण त्यांनी हा लढा स्वतःचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी मांडला नव्हता. त्या हिशोबानी चाणक्य शिष्य चंद्रगुप्त मौर्य सोडुन भारतीया परंपरेतील कुठल्याही राजाशी त्यांची तुलना होत नाही. त्यांच्या आधिच्या प्रत्येक राजाचा लढा स्वकियांशीच होता. स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी हे राजे आपापसात लढत असत. चंद्रगुप्तानी नंदाचा नाश जरी केला असला तरी त्याचे (आणि त्यान्वये चाणक्याचे) मुख्य लक्ष अलेक्स्झांडरची सत्ता उलथण्याचा होता. त्याच प्रमाणे महाराजांचे मुख्य लक्ष परकीय मुसलमानांची सत्ता उलथण्याचा होता. म्हणुन त्यांनी स्थापित केलेल्या राज्याला स्वराज्य म्हणायचे. त्यांना अत्याचारी मुसलमानी सत्ता उलथवायच्या होत्या हे तर जगजाहिर आहे पण या मुसलमानी सत्तांमधेही आपापसात एक वेगळे राजकारण चालत असे. दख्खनी बादशाह्या या धर्मांतरीत मुसलमानांच्याच होत्या. त्यामुळेच मुघली सत्ता या दख्खनी बादशाह्यांना निम्न दर्जा देत असत. या 'नविन' मुसलमानांच्या सत्ते ऐवजी 'स्वच्छ' मोघल रक्ताची आणि सच्च्या मुसलमानांची सत्ता अधिक उपयुक्त अशी मुघलशाहीची धारणा होती. त्यापायी त्यांनी दख्खनी शाह्यांवर अनेक आक्रमणे केली. औरंगझेब स्वतः दख्खन मधे दोनदा आला. पहिल्यांदा आला. पहिल्यांदा १६५७ मधे जेंव्हा महाराज जावळी घेण्याच्या उद्योगात होते. आणि दुसर्यांदा १६८२ मधे तो खास मराठ्यांना भेट द्यायला आला. मराट्यांनीच त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली.
एक गोष्ट मात्र नक्की की मोघल असो किंव्हा नुकतेच धर्मांतर केलेले मुसलमानांच्या सत्ता असो, कोणा हिंदुनी राज्य प्रस्थापित केलेले कोणीच खपवुन घेणार नव्हते. ९व्या १० व्या शतकात इराणी आणि अरब मुसलमान अफगाणीस्थानातील खोकर राज्याशी वर्षानुवर्षे भांडुन त्या राज्याचा पडाव केला. तीच स्थिती गुजरातेतील सोळंकी किंवा देवगिरीच्या रामदेवरायाची झाली. बंगालमधील सेन घराण्याचीही तीच कथा. दख्खनेतील मुसलमानी सुल्तान शतकानुशतके दक्षिणेतील लहान लहान हिंदु राजघराण्यांना नष्ट करण्याच्या मागे होते.मोघलांनी आसाम मधल्या अहोम राज्याला नष्ट करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतलेत. विजयानगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आपापसात भांडणार्या पाच मुसलमानी सत्ता एकत्र आल्यात. आणि तालिकोटाच्या विजया नंतर विजयानगरातील प्रत्येक इमारत या आक्रमकांनी जमिनदोस्त केली. प्रत्येक पुरुषाला ठार केले आणि प्रत्येक बाईला बाजारात विकले. या सगळ्या मागचा मुख्य उद्देश हिंदु मनात उठाव करण्याचा विचारच कधी यायला नको हा होता. हिंदु लोक सत्ता चालविण्यास कुचकामी आहेत. ते लढवय्ये मुळीच नाहीत. पळपुटे, भ्याड आणि धर्महिन असली ही हिंदु जात फक्त नोकरशाही करण्यापलिकडे फारशी उपयोगी नाही असली समजुत या मुसलमानी लोकांची होती. हिंदुंना स्वतः बद्दलच लाज वाटावी हा मुख्य उद्देश. .गंमतीचा भाग असा की या मुसलमानी बादशाह्यांच्या चाकरीत लढवय्ये असे बरीच हिंदु मंडळी होती पण हि सगळी लोक गुलामीलाच भूषण मानित असत. मिर्झा राजे जयसिंह हे त्या मिंधेपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. अर्थात, यात काही नविन नाही. सगळे विजेता आक्रमक असच करतात इंग्रजांनीही तेच केले. पण अश्या परिस्थितीत या आक्रमकां विरुध शिवाजी महाराजांनी केवळ रणांगणातच यश संपादन केले नाही तर मुत्सद्देगिरीत आणि राज्य व्यवस्थापनेतही ते या परकियांपुढे सर्वस्वी वरचढ ठरलेत. त्यांनी केवळ धर्म रक्षणच केले नाही तर धर्म संवर्धनासाठी हि ते झटले. त्या काळात राज्य हि धर्माच्या आधारावरच ठरवली जात असत. मुसलमानी आक्रमकांच्या राज्यांमधे बहुतांश लोक हिंदु असले तरी हि आक्रमक राज्यकर्ते मुस्लीम धर्म वाढविण्यासाठीच झटत असत. पण इथेही राजे त्यांच्या सांप्रत काळाहुन पुढे होते. ते स्वतःला हिंदु धर्म संरक्षक जरी मानत असले तरी त्यांनी इतर धर्मांना मुळीच त्रास दिला नाही. अगदी चढाया करण्याच्या वेळेसही कुठल्याही धार्मिक स्थळांना हात लाविण्याची परवानगी सैन्यास नव्हती. सुरत लुटण्याच्या वेळेस तिथल्या एका ख्रिश्चन पाद्रीच्या इमारतीस मराठ्यांनी मुळीच त्रास दिला नाही.
१६७४ साला पर्यंत महाराजांनी आदिलशाहीस नेस्तनाभूत केले होते. पोर्तुगीज लोक महाराजांशी गोडी-गुलाबीचे संबंध ठेउ बघत होते. इंग्रजांची शक्ति थोडा-फार उपद्व्याप करण्या पलिकडे फारशी नव्हती. निजामशाही तर कधीच मोडकळीस आली होती. उत्तरेस बागलकण्यापर्यंत (रामनगर आणि कोळी राज्या पर्यंत. म्हणजे सुरतेपासुन दोन-तीन तासाच्या अंतरापर्यंत) तर दक्षिणेस गोव्या पर्यंत महाराजांची अनभिषिक्त सत्ता होती. पूर्वेस ते अहमदनगर पर्यंत आरामात फेर-फटाका मारून येऊ शकत असत. अहमदनगर तेंव्हा मुघलांचे फार महत्त्वाचे सैन्य विभागाचे ठिकाण होते. मुख्य म्हणजे या सर्व भागातील कर मराठा सत्तेस मिळत असत. तसांच मराठी न्याय या भागात कार्यरत होता. तिथे कुठल्याही बादशहाचा अंमल चालत नसे. या प्रदेशातील कुठलाही भाग जिंकण्यास बादशाही सैन्यास मराठा सैन्याशी टक्कर द्यावी लागत असे. पुणे भागात मिळालेल्या लहानश्या जमिनीच्या तुकड्यापासुन महाराजांनी एवढे मोठे राज्य स्थापन केले. त्यांची शासन व्यवस्था, सैन्य मांडणी तसेच राजा आणि राज्याची कर्तव्ये इत्यादी कारभाराची सर्व अंगे हि प्रस्थापित मुसलमानी सत्तेच्या तुलनेत क्रांतिकारी होती. थोडक्यात सार्वभौम राजा बनण्यासाठी आवश्यक कारणे आणि आवश्यक पराक्रम त्यांनी केलेला होता. राज्य व्यवस्था, धर्म संस्थापन आणि संवर्धन आणि स्वराज्य स्थापन हि सर्व कामे त्यांनी यशस्वी रित्या पूर्ण केलेली होती. त्यामुळे राज्यारोहण हे खर्या दृष्टीने यशाचा मुकुटमणी होता. ही केवळ औपचारिकता नव्हती, ती आवश्यकता होती. काळाची गरज होती. या समारंभाचे प्रतिसाद भारतभर उमटणार होते. मानसिक हार मानलेल्या हिंदु समाजात कणा उत्पन्न करण्याचे कार्य या राज्यारोहणाने केले. स्वातंत्र्यतेचे बीज जरी आधी रोवल्या गेले असले तरी हिंदुंमधे स्वातंत्र्याचा होमकुंड यशस्वीपणे पेटविण्याची शक्ती आहे हे या सोहळ्याने सिध्द केले. पृथ्वीराजा नंतर स्वतःचा बळावर राज्याभिषेक करणारे महाराज हे केवळ तिसरे शूरवीर होते. (हरिहर राय आणि बुक्का हे विजयानगर सत्तेचे संस्थापक सिंहासनधीश होते. तसच 'विक्रमादित्य' हेमू हा दिल्लीत फार थोड्या काळासाठी सत्ताधीश होता.) तर तीन आघाड्यांवर लढा देऊ शकणारे ते फक्त दुसरे लढवय्ये होते. पंड्या किंवा चोला राज्यांनंतर नौदल स्थापन करणारे ते पहिले दूरद्रष्टे होते. या सगळ्या कारणांचा विचार करुनच महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करण्याचे ठरवले.
एवढी पार्श्वभूमी ठळकपणे दिसत असली तरी मागे म्हटल्या प्रमाणे मुघली सत्ता १८५७ पर्यंत चालली असे का मानतात? त्यामागच्या राजकारणाचा विचार पुढल्या लेखात करू या.
9/5/08
निर्माल्य - भाग ३
"माई या बसा" म्हणत कोणीतरी खुर्ची आणुन दिली.
माईंच लक्ष नव्हत.
"काय करताय अक्का?" माईंनी स्वयंपाकघरात गॅसपाशी उभ्या असलेल्या बाईला विचारल. एका शेगडीवर दूध ऊतू जात होत. अक्का गॅसशी झटापटी करत होत्या. गावात दोन-तीन घरांमधेच गॅस होता. अविनाश ने नुकताच घरी सिलेंडर लावला होता.
"चहा करत होते सगळ्यांसाठी पण या शेगडीची मेली भानगड कळत नाही." अक्का उत्तरल्या. माईंनी दुसर्या शेगडीकडे नजर टाकली. दुसर्या शेगडीवर काहीतरी खदखदत होत.
"पिठल करत होते. लोक येतीलच, जेवायच तर लागेलच ना" अक्कांच्या चेहर्यावर अपराधी भाव उगाच होते.
"बरं सुचल तुम्हाला" अस म्हणत माई वर्हाड्यांत पुन्हा आल्या आणि अण्णांच्या आरामखुर्चीवर अंगाची घडी करून बसल्या. घरात पिठल शिजतय या विचाराने त्यांना हसु आल. जो जायचा तो जातोच पण मागे राहिलेले भूकेच्या पछाड्यातून थोडीच सुटतात. भूकेला काही भावना नसतात. त्यांनी पदरात स्वतःल गुरफुटुन घेतल आणि चुकलेल्या गणितांचे हिशोब त्या करू लागल्या. पण कुठे हातचा चुकला त्यांना परत कळेनास झाला. ती संध्याकाळ त्यांच्या घशाशी आली होती. त्या परत आठवणींच्या गुहेत नाहीश्या झाल्या.
कोणाचही कोणावाचुन आणि कशावाचुन अडत नाही. रहाटगाड चालूच रहात. बघता बघता पोरं मोठी झाली. श्रीकांत लहाना आणि अविनाश मोठा. दोघांमधे चार वर्षाच अंतर होत. दोघांमधे पण त्यांच्या स्वभावात जमिन-आस्मान चा फरक होता. परिस्थिती छन्नी प्रत्येक मनुष्यावर निर्-निराळ्या तर्हेनी आकार देते. आईची होणारी सततची तक-तक आणि वडिलांची होत असलेली दुर्दशा बघुन अविनाश स्वभावाने विचारी आणि शांत झाला. घरची जवाबदारी लौकरात लौकर खांद्यावर घेण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू असे. त्यांने आपले शिक्षण नीट पूर्ण केले. त्या काळात उठ-सुट सगळे इंजिनिअर होत नसत तेंव्हा त्याने मुंबई महाविद्यालयातून मेकानिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. मुंबईलाच टाटा कंपनीत तो नोकरीला लागला होता. तो वडिलांवर गेला होता. अत्यंता हुशार आणि परिस्थितीमुळे कष्टीक. आईची काळजी त्याला सतत लागलेली असे. त्यामुळेच माईंची मदार अविनाश वर असे. श्रीकांतची काही फारशी शाश्वती नव्हती. तो लौकीक दृष्ट्या वाया गेला होता अस म्हणता येणार नाही पण निकम्मा जरूर होता. त्याने शिक्षण पूर्ण केल तरी पावलं अशी परिस्थिती होती. बुध्दु होता अश्यातला भाग नाही पण उनाडक्या करण्यातचा त्याचा बहुतांश वेळ जात असे. घरी बापाचा धाक नाही आणि आईला तो जुमानित नसे. त्याचाही आईवर जीव होता पण त्या पलिकडे आपली काही जबाबदारी आहे असे त्याला वाटत नसे एवढच. अविनाश ला नोकरी लागल्याच्या दोन वर्षाच्या आत माईंनी त्याला बोहल्यावर चढवला. गावातलीच मुलगी होती. तीनेही बी.ए. पूर्ण केल होत आणि माईंच्या शाळेत नुकतीच शिक्षिका म्हणुन लागली होती.
अण्णाच्या आजारपणाला सुरुवात झाल्यापासुन पुढल्या वीस वर्षाचा काळ इतक्या झपाट्याने गेला की माईंना फारसा विचार करायला फुरसत मिळाली नाही. सुरुवातीची देव-देवके थंडावली होती. अण्णा असेच रहाणार हे माईंनी मान्य केले होते. नवर्याचे सुख त्यांना सुरुवातीची चार-पाच वर्ष सोडलीत तर कधीच लागले नाही. अण्णांचे व्यक्तीमत्व गेल्या वीस वर्षात सप्तरंग दाखवुन आता पांढरे फटक पडले होते. कुठल्याही भावनांचा लवलेश त्यांच्यात उरला नाही. फिटस मधुन मधुन येत असत. घरच्यांना नेमकं काय करायच हे पक्क माहिती होते. फिटस येउन गेल्यावर थोडं बहुत बोलणारे अण्णा अजुन गडद होत असत. परत पूर्ववत यायला दोन आठवडे लागत. पूर्ववत येण म्हणजे खायला दे किंवा चहा कर एवढ्या पूर्तीच त्यांची बौध्दीक क्षमता सिमित झाली होती. सुख-दु:खाच्या पलिकडे ते जणु गेले होते. आल्या -गेल्यांची विचारपूस नाही किंवा घरात होत असलेल्या गोष्टी मधे रस नाही. लाकडाची मूर्ती जणु घरात फिरत असे. पेपर मात्र दररोज वाचत असत. सकाळचा पेपर संध्याकाळ पर्यंत ते रात्रीपर्यंत पेपर त्यांच्या हातात असे. काय कळायच त्यात त्यांना देवच जाणे. थोडक्यात ते आहेत काय आणि नाही काय एकच होत.
दोन पोरांपैकी एक तर मार्गी लागला होता. संसारी पुरुष झाला होता. लहान्याची चिंता होती. पण अविनाश ओळखीनेच टाटाच्याच कुठल्या कारखान्यात श्रीकांतला लावण्याच म्हणत होता. रावसाहेबा शिक्षण पूर्ण कधी करतात त्यावर सगळ अवलंबुन होत. एकुण माईंच्या जीवनातील वादळ शांत होण्याच्या मार्गावर होतं. त्यांच्या शुष्क मनावर कर्तव्य पार पाडल्याचा भावनांची सावली पडत होती. खुप वर्षांनी त्यांना समाधान वाटत होत. शाळेतून घरी आल्या की त्यांना शांत वाटत असे. खुप वर्षांनी त्यांना स्वस्थता मिळत होती. अविनाशच नुकतच झालेल लग्न आणि घरात खुप वर्षांनी अजुन एका स्त्रीचा वावराने माईंच मन हुळहुळत होत. लौकरच नातू येणार घरात आणि घर परत खेळत होणार. नातवाला धडधाकट आई-वडिल असणार या विचाराने माईंना आनंद होत असे.
मुंबईहुन बसने अविनाश जा-ये करत असे. आणि एके दिवशी परत येतांना बस मोकळी होती म्हणुन तो पाय लांब करून झोपला. रात्रीची वेळ होती. अविनाश घरी उशीरा येत होता. बस वेगाने जात होती. मधेच कोणी तरी आल म्हणुन चालकाने करकचून ब्रेकस दाबले. अविनाश गाढ झोपला होता तो सीटवरून घसरला आणि त्यांच डोक दाणकन विरूध्द दिशेच्या सीटच्या लोखंडी भागाला आपटले. निमिषार्धात सगळ घडल आणि झोपेतच काही कळायच्या आत अविनाश मृत झाला. बस-चालकाला सुध्दा काही कळल नाही. बस जेंव्हा डेपोत गेली तेंव्हा हा कोण वेडा-वाकडा माणुस पसरलाय म्हणुन बस चालक बघायला गेला तेंव्हा सगळ त्याच्या लक्षात आला. सकाळी नेहमी सारखा कामावर गेलेला अविनाश फक्त देहरुपीच परतला.
काळ कुणासाठी थांबत नाही अस म्हणतात. न थांबायला काळाला जायच तरी कुठेय? काळ पुढेही जात नाही आणि मागेही जात नाही. तो तसाच असतो. स्थिर, चिरंतन चिराकाल. पुढे रेटत जात ते माणसाच घोंगड. दुसरा पर्यायही नसतो. दैव फासे खेळायला बसवतो पण फासे फक्त दैवच टाकत. फक्त भोगण आपल्या हातात असत. माईंच्या मनात असल्या काहीश्या विचारांचा फडफडाट होत होता. पण मग त्या निश्चयाने उठल्या. आधी डाव उलटला तेंव्हा त्यांनी हार मानली नव्हती आणि आत्ताही त्या धडाडीनेच पुढे जाणार होत्या. सुनेला सावली देणार होत्या. त्यांनी मनात पुढचे आराखडे बांधायला सुरुवात केली. तीचं शिक्षण कस पुढे चालू करायच. तिचा जीव कसा रमवायचा. कधीही न भरणार्या जखमेवर हात ठेउन त्या पुढे जाणार होत्या. त्यांच्याकडे अजुन कुठला पर्यायही नव्हता.
8/28/08
शिवाजींच्या शोधात
सुप्रसिध्द इतिहासकार श्री जादुनाथ सरकारांनी मी "द हाउस ऑफ शिवाजी" या पुस्तकाच्या शेवटी महाराष्ट्रा बद्दल फार सुरेख लेख लिहिला आहे. त्यांच्या मते गेल्या हजार वर्षाच्या गुलामगिरीत महाराष्ट्राची जमात जणु सूर्यासारखी भारतीय इतिहासावर वर झळकते. तलवार आणि लेखणी सातत्याने आणि तितक्याच कुशलतेने चालविण्याचा मान फक्त मराठी लोकांनाच जातो. शिवाजी महाराजांनी फुंकलेल्या स्वातंत्र्य रणदुंदुभीचे पडसाद टिळक-सावरकरांद्वारे आपल्याला वीसाव्या शतकातही ऐकु येतात. पण इंग्लीश सत्तेने भारतीय जनमानसाचा चेहरा-मोहराच बदलवुन टाकला त्यामुळे हे पडसाद महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतीयांना घोंगाट वाटु लागले. भारतीय विचारसरणी बदलली तरच भारत आपला खर्या तर्हेनी गुलाम होईल हे इंग्रजांनी बरोब्बर हेरले. त्यासाठी त्यांनी दोन आघाड्यांवर काम सुरु केले. एकतर भारतीय इतिहासाला वाट्टेल तसा आकार द्यायचा आणि दुसर म्हणजे भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल लाज वाटेल याची व्यवस्था करायची. या अंतर्गत शिवाजी कसा वाईट माणुस होता आणि त्याच हिंदु राष्ट्र कल्पना कशी खोटी होती. तो साधा चोर-लुटारू होता आणि अत्यंत स्वार्थी असा त्याने मुघलांशी टक्कर केवळ स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी केली इत्यादी धादांत खोट्या कल्पना आणि समजुती त्यांनी भारतीयांच्या मनावर बिंबविण्यास आरंभ केला. थोडक्यात शिवाजी महाराज हे सार्वभौम राजे नसुन मघली सत्तेत पुंडाई करणारा साधा सरदार होता हे भारतीयांच्या मनात बिंबविले की भारतीय जमात परकीय सत्तेविरुध्द उठाव करण्यास कशी असमर्थ आहे आणि परकीय सत्ते मुळेच आत्ता पर्यंत भारतीयांचा विकास झालेला आहे हे दर्शविणे सोपं जात. या प्रकल्पात इंग्रज बरेच यशस्वी ठरलेत. बहुतांश ऐतिहासिक पुस्तकात शिवाजींना हिन मानल्या जात. माझ्या वाचनात १८४० साली लिहिलेल्या कोण्या इंग्रज अधिकार्यानी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत आली. पुस्तक लहानस आहे आणि त्यात औरंगझेब कसा मुघल सत्तेच्या विनाशास कारणीभूत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्या पुस्तकातही शिवाजींना शूर म्हटल आहे पण शिवाजी केवळ चोर दरोडेखोर असेच म्हटले आहे. अमेरिकेत उपलब्ध असलेल्या (आणि माझ्या वाचनात आलेल्या) जागतिक इतिहासावर भाष्य करणार्या बहुतांश पुस्तकात शिवाजींचा उल्लेखही नसतो. मुघलांचा जरूर असतो. आणि मुघलांनंतर सरळ ती पुस्तके इंग्रजी सत्तेवर येतात. कहर म्हणजे मुघल सत्तेचा शेवट म्हणे १८५७ साली झाला अस सरळ सरळ सगळ्या पुस्तकात छापलेलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या विलियम डर्लिम्पेल यांनी लिहिलेल्या "द लास्ट मुघल" या पुस्तकाचा सूरही असाच आहे.
लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की ही सगळी पुस्तके इंग्रजीतच आहेत. मराठी लोकांवर अर्थातच याचा परिणाम झाला नाही पण उत्तर व पूर्व भारतात शिवाजींना चक्क चोर म्हटल्या जात ते या कारस्तवच. आणि जाब विचारला तर वर सांगितल्या प्रमाणे इंग्रजी पुस्तकांचा पुरावा दिल्या जातो. युरोप-अमेरिकेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच सोडा पण भारताच्या पहिल्या पंत-प्रधान नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात (द डिस्कवरी ऑफ ईंडिया") शिवाजींचा उल्लेख चोर-दरोडेखोर असा केला आहे. आत नेहरू शंख माणूस होता हा भाग निराळा मानला तरी पुस्तकात शिवाजींबद्दल असला लिहिण्याची त्यांची हिम्मत झालीच कशी? शिवकालीन इंग्रज आणि पोर्तुगिजांची पत्रांमधुन महारजांबद्दल लिहिल्या गेल्याचे सूर १८ व्या व १९ व्या शतकातील इंग्रज इतिहासकारांच्या पुस्तकांतुन उमटतात. या दरम्यान इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या किंवा इंग्लंडमधेय शिकलेल्या भारतीय मध्यम वर्गीय (महाराष्ट्रा व्यतिरिक्त) व्यक्तिंनी लिहिलेल्या पुस्तकातून परत तेच दिसते. त्यामुळे नेहरूंनी जे लिहिले ते नविन नव्हते फक्त त्या विकृत, नेभळट आणि शंढ विचारसरणीचे रोपटे नेहरू पुन्हा स्वंतत्र्य भारतात पुन्हा रोवत होते.
स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांची पकड भारतीय इतिहासावर संशोधनावर अजगरासारखी आहे आणि भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल मुळीच स्वाभिमान वाटु द्यायचा नाही हेच या मिंध्या श्वान जातीच्या कम्युनिस्टांच लक्ष आहे. इंग्रजाची हि नीती भारतीय कम्युनिस्ट पुढे नेता आहेत हि परिस्थिती थोडी हास्यापद, फार घातकी आणि विकृत आहे. या गुलामगिरीच्या मनोरुग्णांनी शिवाजींना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून नामशेष केल किंवा एक साधा राजा ज्याने मुघलांविरुध्द लढा दिला यापूर्तीच त्यांना सिमित केल. त्यामूळे झाल काय की शिवाजींनी मुघलांविरुध्द लढा का दिला आणि त्यात त्यांचा तिळमात्र स्वार्थ कसा नव्हता हे महाराष्ट्रा पलिकडे कोणालाच कळत नाही. मराठा साम्राज्याच्या सीमा आज भारताच्या सीमा आहेत. याचा अर्थ शिवाजींचे भारतीय इतिहासात किती अधिक महत्त्व आहे हे महाराष्ट्रेतर जनतेला कळत नाही. पण हा भाग सांप्रत राजकारणत मोडतो आणि यावर आपण पुढल्या भागात चर्चा करु या.
शिवाजी महान होते यात काही वाद नाही. मग त्यांना सर्व भारतीयांसमोर महान सिध्द करण्याचा अट्टहास का हा प्रश्न उभा रहाण सहाजिक आहे. राजे सार्वभौम सत्तधीश होते. त्यांनी विशिष्ट कारणांस्तव स्वतःचा राज्याभिषेक केला. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मुळीच नव्हता. या अपूर्वाई ला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा मुसलमानी सत्तांविरुध्द लढा आणि मुख्यत्वे मुघलांविरुध्दच्या लढ्यामागे विशिष्ट विचार प्रणाली होती. त्यांच्या जन्माआधी उत्तर भारतीय उपखंड मुसलमानी सुलतानांचे पाय धुण्यात निपुण झाला होता तर दक्षिणी भारतात भाऊ-बंदकित व्यस्त आणि परकीय आक्रमकांनी घातलेल्या विध्वंसाशी विन्मुख होता. अश्या परिस्थितीत भारतीयत्वाचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी तलवार उचलली आणि जन-मानसात स्वाभिमान जागृत केला. गेल्या तीनशे वर्षात महाराष्ट्रात झालेल्या समाजोत्थनाचे मूळ महाराजच आहे. पण त्यांचे कार्य महाराष्ट्रापूर्तीच सिमित नाही ते कार्य संपूर्ण राष्ट्राची धरोहर आहे. आणि ही गोष्ट्र महाराष्ट्रेतर समाजास समजवण्यासाठी प्रयत्न करण्यात वावग काहीच नाही.
8/17/08
निर्माल्य - भाग २
"आई, आई काय झाल?"
माईंनी काही उत्तर दिलं नाही. वरची दोन बटनं सोडलेला शर्ट, खर्रा खाऊन रंगलेल तोंड आणि चोपून मागे केलेले केस अश्या श्रीकांतकडे त्या नुसत्या बघत होत्या. श्रीकांतला सायकल दामटुन श्वास लागला होता. त्याला काहीतरी अर्धवट बातमी कळली होती. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते. माई काहीच बोलत नाही बघुन तो "वहिनी, वहिनी" हाका मारत धावत घरात गेला. आतुन परत रडण्याचे आवाज येऊ लागलेत. श्रीकांत परत धावतच बाहेर आला. सारं घर स्तब्ध होत. आकाशात ढग दाटलेले होते. आणि पान ही हलत नव्हत. अश्यात फक्त श्रीकांतच धावपळ करत होता. त्याने माईंना मिठी मारायचा प्रयत्न केला. पण माईंनी काहीच हालचाल केली नाही.
"आई, तू रडू नकोस. मी आहे" असं काहीस म्हणत तो सायकल कडे धावला. सायकलचे पाईडल जोराने मारण्याच्या प्रयत्नात पाईडल त्याच्या पोटरीला खस्सकन लागले पण त्या कडे त्यांच लक्ष नव्हत. त्याने घाटाकडे सायकल हाणली.
घरात परत सुन्न झाले. पाऊस पडत नव्हता आणि गरमीने श्वास गुदमरायची वेळ आली होती.
"माई, आत या" कोणी मध्यमवयीन बाई उंबरठ्यावर उभी राहुन माईंशी बोलत होती.
"राहु दे इथेच मला. पोरीची काळजी घ्या" माई उत्तरल्या. श्रीकांत झंझावातात त्यांचे रडणे थांबले होते. त्यांच्या शुन्य डोळ्यातून गरम टपोरे अश्रु परत वाहु लागले.
त्यांचं लग्न नुकतच झाल होत तेंव्हाची घटना त्यांना आठवत होती. त्यांच्या सासुबाई त्यांना कोणा बाबा कडे कोंकणात घेउन गेल्या होत्या. बाबा एका झोपडी वजा खोलीत रहात असे. त्याची खोली विचित्रश्या कुबट वासानी भरली होती आणि अंगार्यांचा धूरात काहीच दिसत नव्हते. त्या बाबाच्या पायावर पडुन सासुबाईंनी हंबरडा फोडला. माई जेमतेम विशिच्या असतील तेंव्हा. ती घुसमटलेली खोलीने त्यांचा जीव दडपुन गेला होता आणि सासुबाईंच अभद्र रडण त्यांना असह्य झाल होत. "असं नका करू हो. दया करा. सूनेला सुख लाभु द्या" असं काहीस सासूबाई हुमसुन-हुमसून म्हणत होत्या. पण बाबाने हूं का चूं केलं नाही. थोड्या वेळानी सासूबाईंनी आणलेला प्रसाद बाबाच्या पायावर ठेवला आणि माईंना घेऊन त्या घरी परत आल्या. घडलेला प्रकार इतका भेसूर आणि विक्षिप्त होता की माईंना त्या बद्दल सासूबाईंना काही विचारण्याची हिम्मत झाली नाही. सासूबाईंनीही काही कधी सांगितल नाही. पण जायच्या वेळी मात्र "पोरी, पोरी" म्हणत सासूबाई आपले खरखरीत हात माईंच्या गोल चेहर्यावर सारख्या फिरवत असत. सासूबाई त्या बाबाच्या पाया पडुन का रडत होत्या हे जरी माईंनी कधी विचारल नसलं तरी त्याची प्रचिती त्यांना जन्मभर जणू यायची होती.
माई कणखर व्यक्तीमत्वाच्या होत्या. जन्मभर संसार त्यांनीच रेटला होता. जवळच्या शाळेतच त्या नोकरी करत असत. सध्या त्या मुख्याध्यापिका होत्या. शिस्तबध्द आणि करारीपणासाठी त्या प्रसिध्द होत्या. त्या काळात बायका फारश्या नोकरी करत नसतं. पण नोकरी करावीच लागली तर शिक्षण क्षेत्राकडे जास्त कल असे. माईंची नोकरी करण्यामागची कारणे थोडी निराळी होती. माई लग्न होऊन घरात आल्यात तर घर खाऊन-पिऊन सुखी होतं. त्यांचे यजमान, आपले अण्णा, मोठ्या सरकारी हुद्द्यावर नोकरीस होते. इतक्या लहान वयात एवढा पगार आणि एवढा हुद्दा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचं भविष्य उज्वल होत. लग्नानंतर यथावकाश माईंना दोन सोन्यासारखी पोरं झाली. सगळं कस चित्रपटातल्या सारख चालू होत. पण वाईट काळ दार खटखटवुन येत नाही आणि बाहेर हाकलून बाहेरही जात नाही. खुपदा तो घरचाच होऊन बसतो. घुशीसारखा घरातल्यांची आयुष्य कुरतडत बसतो.
अण्णा स्वभावाने थोडे विक्षिप्त होते पण त्यांना वेड लागणार आहे अस कोणाच्या डोक्यात आलं नसत. पण वयाच्या तीशीत त्यांना फिटस् चा त्रास सुरू झाला. सुरुवातीला औषध देऊन आराम पडत असे पण या रोगाला निदान नेमके असे निदान नाही. हळु-हळु औषधांचा परिणाम कमी होऊ लागला. त्रास अजुन वाढत जाणार याची ती लक्षण होती. घरातील एकट्या कमविणार्या व्यक्तीची होत असलेल्या दुर्दशेचे सावट सगळ्यांवर पडत होते. फिटस च्या त्रासाने अण्णांची मानसिक संतुलन बिघडत होते. लहान असली तरी पोरे वडिलांसमोर दबुन असत. कधी काही चूक नसतांना बेदम मार पडत असे तर कधी कप-बशी फोडली तरी मुके मिळत असत. पण अश्या परिस्थितीतही अण्णांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी माईंचे शिक्षण पुन्हा चालू केले. खरं सांगायच तर अजुन काही मार्ग नव्हताही. माई मुळात हुशार होत्या पण लग्न व्हायच्या वेळेस त्या बी. ए. च्या प्रथम वर्गात होत्या. पण लग्ना नंतर सहाजिकच त्यांच शिक्षण थांबल. सध्य परिस्थितीत मात्र बी.ए. ची पदवी मिळाल्यावर शिक्षिकेची नोकरी पक्की होती. घराजवळच सरस्वती महाविद्यालय होत. माईंनी मुंबईच्या महाविद्यालयात स्वतःचे शिक्षण सुरु केले.
मुंबईला दररोचच जाण-येण आणि घर बघण यात त्यांची फार धाव-पळ होतं असे. अण्णा आजकाल घरीच असत. पण त्यांची फारशी मदत नसे. पण त्यांची होत असलेली दशा माईंना बघवत नसे. त्यांनी खुप उपास-तापास चालू केले. अभ्यास आणि घरा-दारातून वेळ काढुन त्यांनी आजु-बाजुची सगळी मंदिर झाडुन काढलीत. जेजुरी-तुळजा भवानी झालं मंगेश आणि त्र्यंबकेश्वरही आटपला पण त्या हार मानायला तयार नव्हत्या. जे काही घडलय किंवा घडलय त्या मागे काही तरी कारणं असतात. कुठल्या कारणाशिवाय कसं काही घडणार? आपल्या सोन्यासारख्या नवर्यावर अशी परिस्थिती का यावी याचे उत्तर माई शोधत होत्या. स्वत:च्या आयुष्याशी दैव असला अघोरी झिम्मा का खेळत होता हे त्यांना आकलनी पडत नव्हते. त्यांना खरं सांगायच तर शिकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना फक्त छान संसार करायचा होता. आपल्या नवर्याची सुखी ठेवायचे होते. पोरांना छान मोठं करायच होत. एवढ्या साध्या मागण्या त्या, काय चूक आहे त्यात? पण एवढ्या साध्या अपेक्षांचे मागणे देवाजवळ करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजु-बाजुच्या सगळ्यांचे संसार असेच चालू होते. सामान्य. पण ते सुध्दा माईंच्या नशिबी नव्हते. त्यांच्या तळहातावरच्या रेषा सामान्य नव्हत्या. अगम्य, अज्ञात अश्या त्या रेषांना जणु ऐका-मेकांचाही ठावठिकाणा नव्हता.
8/10/08
निर्माल्य- भाग १
मुंबईच्या इतक्या जवळ असुनही हे गाव थोडं विचित्र होत. ते अजुनही गावच होतं. मुंबईत माणसांचा क्षणाक्षणाला वाढणारा पूर आणि इथेय अजुनही जमिनीने हिरवा शालू नेसलेला होता. मुंबईकडे जाणार्या मुख्य रस्त्याहुन दोन मैल आत, आडवळणाला एक जुना वाडा होता. आजु-बाजुला सगळेच वाडे होते. स्वतःला कबुतरांसारख खुर्हाडात बंद करुन घेण्याची हौस इथे कोणांस नव्हती. वाड्याची बांधणी जुन्या पध्दतीची होती. कौलांच उतरतं छप्पर होतं. समोर वर्हांडा त्यापुढे आंगण. आणि मोठ्ठ परसदार अशी टुमदार बांधणी होती. दोन घरांमधे कुंपण नसल्यामुळे आवार मोठं भासत असाव. अंगणात विहिर होती. तीतं काही कासवं पोहत होती. आजुबाजुला गर्द झाडी होती पण परसदारी कोणीतरी लक्ष देउन झाड लावली होती. केळी, पेरु, फणसाची झाडं होती. आंबा पण होता. परसदार मातीचं होत आणि फरश्यांची पाउलवाट होती. घरातही काळ्या-भोर थंडगार फरश्या होत्या. परसात पाण्यांच भलं-मोठं टाक होत. एकतर कोकणात वर्षातून सहा महिने पाऊस आणि वरुन समोर अंगणात विहिर असतांना, हे टाकं थोडं मजेशीरच वाटत होत.
घरात शांतता होती. मुसमुसण्याचे आवाज ऐकु येत होते. नुकताच पाऊस पडुन गेला होता. वातावरण ओलं होत. वर्हांड्याच्या पायर्यांसमोर, अंगणाच्या मध्यभागी एक तरूण देह ठेवला होता. वर्हांड्याच्या एका टोकाला, लाकडी खांबाला टेकुन माई देहाकडे बघत बसली होती. त्यांचे डोळे शून्य होते. वर्हांड्याच्या दुसर्या टोकाला अण्णा शांतपणे पेपर वाचत आरामखुर्चीवर बसले होते. समोर देह ठेवला असतांना त्यांच पेपर वाचण अंगावर शहारे आणणारं दृश्य होतं. माईंनी गर्दीतील एकाला खुणेनी जवळ बोलावल.
"कोणाची वाटं बघणं चाललय?"
"वहिनी अजुन खोलीतून बाहेर आल्या नाहीयात. शेवटचा नमस्कार करायला हवा तीने"
"बरं. बघते मी काय करायच ते" असं म्हणत माई गुढघ्यांचा आधार घेत उठल्या आणि आत जाऊ लागल्या.
"माई"
माईंनी मागे वळुन बघीतल.
"श्रीकांत कुठेय?"
माईंनी मोठ्ठा नि:श्वास टाकला. काही उत्तर न देताच त्या माजघरात गेल्या.
"पोरी, शेवटचा नमस्कार करुन घे"
एक तरूण पोरगी लोखंडी पलंगावर पडलेली होती. आजु-बाजुला बायका रडत उभ्या होत्या.
"नाही आई मी त्यांना अस जाऊ देणार नाही"
"असं नकोस ग करु. चल, उठ. मी आहे तुझ्या सोबत." माईंनी सूनेला बळे-बळे उठवण्याचा प्रयत्न केला आणि हात धरुन अंगणात आणल. पण मृतदेह बघुन सूनेनी धाडकन आंग जमिनीवर टाकल.
पेपर टाकुन अण्णा धावत आलेत. कोणीतरी पाणी आणले.
"असं करुन कसं चालेल. नमस्कार करून टाक."
"मग तुम्ही सगळे लगेच त्याला घेउन जाल आणि मी ईथे एकटीच मागे राहीन." लहान मुलीसारखे हुंदके देत सून बोलत होती. माईंचा गळा भरून आला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना.
सूनेनी कसातरी नमस्कार केला आणि ती परत बेशूध्द पडली. तीला उचलुन आत घेउन जावं लागल.
अंत्य-संस्काराची तयारी सुरु झाली.
"माई, अग्नी कोण देणार? श्रीकांतचा नेहमीच्या ठिकाणांवरही पत्ता नाहीया"
"कधीच परत नाही आला तरी चालेल" असं काहीस पुटपुटत "हे देतील" असं त्या म्हणाल्यात.
"अहो, ऐकता का? ऊठा, या लोकांसोबत जा आणि ते सांगतील तस करा"
हो म्हणत अण्णा लगेच उठलेत. "अगं पण माझा चहा व्हायचाय. ते मग तू करतेस का ते लौकर"
"अहो काय बोलताय तुम्ही? कळतय का चाललय ते? आपला अविनाश आहे हा." देहाकडे बोट दाखवत माई बोलल्या. बाईचा जीव अगदी कावुन गेला होता.
"आणि तुम्हाला चहाची पडलीय?"
अण्णांच्या आकलनी फारस काही पडलेलं दिसत नव्हत पण चहा मिळणार नाही एवढ मात्र त्यांच्या लक्षात आल.
"बरं, लगेच जायचं असेल तर मी ते आपलं म्हणजे बाहेरचे कपडे घालु की ते आपले घरातलेच चालतील"
माई मट्टकन जमिनीवर फतकर मारुन बसल्या व भकास डोळ्यांनी जमिनीकडे बघु लागल्यात.
पुरुष मंडळींपैकी कोणी तरी आत गेलं. नात्यातलंच असाव कारण त्याला घरातल काय कुठे आहेय माहिती होत. आत जाउन त्यांने झब्बा आणला.
"अण्णा झब्बा घाला आणि चला"
"अरे पण ते म्हणजे हा झब्बा घरातला आहे" अण्णा तक्रारीच्या स्वरात म्हणालेत.
त्या पुरुषाने जबरदस्ती अण्णांना झब्बा घालायला लावला आणि दंड पकडुन फाटकापाशी घेउन गेला.
माईंना रडू आवरत नव्हतं.
श्रीराम जय राम जय जय राम चा गजर झाला. लोकांनी तिरडी खांद्यावर टाकली.
अंगणात फक्त माईच उरल्या होत्या.
दूरून एक सायकल भरधाव घराच्या दिशेनी येतं होती.
(क्रमश:)
8/8/08
धार्मिक साम्राज्यवाद
भारतात घातलेल्या हा थैमान भारतापूर्तीच सिमित नव्हता. युरोपिअन साम्राज्यावादाने असला थैमान जगाच्या प्रत्येक काना-कोपर्यात घातला. उत्तर व दक्षिण अमेरिकेत तेच घडले. ऑस्ट्रेलियातही तेच घडले. अफ्रिकेत तस करता येणं अशक्य होत म्हणुन तिथुन काळ्या लोकांना गुलाम बनवुन जगाच्या काना-कोपर्यात जाउन विकण्याचे काम या लोकांनी केल. सतराव्या व अठराव्या शतकात गुलाम-विक्रीचा धंदा फार नफ्याचा होता. जवळ जवळ दिड ते दोन करोड गुलाम अमेरिका खंडात विकल्या गेलेत. या गुलामांना ज्या दशेत अटलांटिक महासागर पार करुन अमेरीका खंडात नेण्यात येत असे याचे वर्णन कुठे वाचायला मिळाले तर प्रत्येकाने अवश्य वाचावे. मेंदु सुन्न होतो. अत्याचार करण्यात स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरीकेत पोर्तुगीज लोकांशी जणु चढा-ओढीची स्पर्धा होती. कोण जास्त लोकांना मारतो, कोण अधिक लोकांची धर्मांतर करतो या अभिमानाच्या गोष्टी असव्यात. फ्रेंच लोकांनी मध्य व उत्तर अफ्रिकेत तेच धिंगाणे केलेत. ब्रिटिश लोकांनी सध्य स्थितीत अमेरिका व कॅनडा मानल्या जात असलेल्या देशांमधे तसेच ऑस्ट्रेलिया खंडातील मूळ रहिवाश्यांना नाहिस केल. थोडक्यात हा नर-संहार सगळीकडे झाला. आशिया खंडात मुसलमानी लोकांनी केला (चेंगिझ खान पासुन तर मोहम्मद गझनवी पर्यंत) तर इतर खंडांमधे युरोपीय गोर्या लोकांनी केला.
मनात असा विचार येतो की सत्ता-पिपासु राज्यकर्ते असला संहार नेहमीच करत आले आहेत. आपली सत्त प्रस्थापीत करण्याच्या उद्योग मनुष्य जात जन्माला आल्यापासुन करते आहे. म्हणजे गेल्या हजार वर्षातील संहार हा याच मालिकेतील पानं आहेत. त्यात काही नविन नाही. पण गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. नीट निरिक्षण केले तर भीषणता अधिक जाणवते. मी फार मोठ्या भौगोलिक प्रदेशाच्या इतिहासावर तसेच विविध संस्कृतीच्या लोकांवर भाष्य करतो आहे त्यामुळे मतभेदांना बराच वाव आहे. पण जगाच्या इतिहास पटलावर गेल्या हजार वर्षातील घटनांचा विचार केला तर साम्राज्यवाद पडसाद ठळकपणे जाणवतातच पण या साम्राज्यवादाच्या मूळाशी धर्मांधता होती हे लक्षात घेतले तर साम्राज्यवादाचे अत्याचार आकलनी पडतात.
मी माझ्यासाठी किंवा माझ्या फायद्या साठी लोकांना हिंसा करण्यास उद्युक्त केल तर या हिंसेची व्यापकता माझ्या जीवनकालापर्यंतच सिमित राहिल. मी मेल्यावर किंवा माझ्या वंशजांचा र्हास झाल्यावर माझ्या विचारप्रणालीचाही अंत होईल. पण या ऐवजी मी असा प्रचार सुरु केला की हि हिंसा आवश्यक आहे आणि त्याने देव प्रसन्न होतील किंवा लोकांचे धर्मांतर करणेच कर्तव्य आहे आणि धर्मांतरा साठी त्यांच्यावर राज्य करणे आवश्यक आहे आणि ती लोकं ऐकत नसतील तर त्यांना मारुन टाकणेच पुण्य कर्म आहे तर असली विचार प्रणाली शतकानुशतके टिकुन रहाते. आणि रंगमंचावर जशी पात्र बदलत असतात तसे सत्ता-पिपासु राज्य कर्ते किंवा धर्मांध जनता बदलली तरी इतरांवरचे अत्याचार चालूच रहातात.
युरोपातील राज्यकर्ते बदलत असले तरी पोर्तुगिज, स्पॅनिश आणि ब्रिटिश लोकांनी मांडलेला हैदोस जवळ-जवळ तीन शतके सर्रास चालूच होता. पुढेही तो चालूच राहिला असता पण युरोपीय लोक जिथे-जिथे गेलीत तेथील मूळ रहिवासी नामशेष झाले त्यामुळे अत्याचार करायला कोणी फारस उरल नाही. गुलाम म्हणुन आणलेल्या काळ्या लोकांचा तर अगदी २०व्या शतकातही छळ चालूच होता. मुसलमानी लोक ८ शतकापासून जग पादाक्रांत करायला निघालेत. ते बर्याचश्या प्रमाणात यशस्वी झालीत. जगाला दार-उल्-हब्र करणे हे पुण्यकर्म आहे हि समजुत असल्यामुळे राज्यकर्ते बदललेत, खलिफा नाहिसे झालेत तरी अत्याचार चालूच रहिलेत. दोन्ही घटनांमधील साम्य स्वधर्माचा आत्यंतिक आणि अनाठायी अभिमान, स्वधर्म प्रचाराची पराकोटीची ओढ आणि राजकारण व धर्म यातील पुसट रेखा ही आहेत. साम्राज्यवाद केवळ भूमी पादाक्रांत करून नैसर्गिक संपत्तीवर अधिपत्य गाजविण्यापूर्ती सिमित नव्हता. मूळ रहिवाश्यांना शारीरकरीत्या गुलाम करण्या सोबतच मानसिक रित्या गुलाम करण्याचा मुख्य उद्देश त्या मागे होता. आणि मानसिक गुलामगिरी धर्मांतराद्वारे करणे रास्त होते. १५ व्या व १६ व्या शतकात पोपचे अप्रत्यक्ष धिपत्य युरोपातील मोठ्या प्रदेशासोबतच अमेरिका खंडांवरही होते. खलिफा बनण्यासाठीची चढाओढ ही मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अधिपत्या गाजविता येण्यासाठीच होती. पण खलिफा पध्दती पोप संस्थेच्या तुलने तेवढी यशस्वी ठरली नाही.
गंम्मत अशी की प्रत्यक्ष साम्राज्यवाद नाहिसा झाला असला तरी धार्मिक साम्राज्यवाद तेवढ्याच तीव्रतेने चालू आहे. ख्रिश्चन पाद्री अजुनही अशिक्षित जनतेमागे धर्मांतर करण्याच्या कामात गर्क आहे. मुसलमान लोक अजुनही दार्-उल-हब्र ची स्वप्ने बघतात आणि जागो-जागी स्फोट घडवुन आणतात. हा जगात 'शांतता' पसरविण्याचा अभद्र आणि बिभित्स खेळ कधी संपणार आहे कोण जाणे?
7/19/08
जागतिकिकरण आणि आपण
बरं, पोरांना प्राथमिक शिक्षण मिळाल तरी दहावी-बारावी होऊन कोणी भीक घालत नाही. आणि उच्च शिक्षण अशक्य आहे. कारण, इंजिनिअरिंग किंवा डॉक्टर होण्यासाठी सरकारी महा-विद्यालयांमधेही इतकाल्या फि वाढल्या आहेत कि दिवसाला ६० रुपये कमविणार्या कुटुंबाला तर सोडुनच द्या पण महिन्याला अगदी ३००० रुपये कमविणार्या व्यक्तिलाही महा-विद्यालयातील शिक्षण अशक्य आहे. म्हणजे थोडक्यात, रिक्षा चालविणार्या घरातील पुढल्या पिढ्यांना रिक्षा चालविण्या व्यतिरिक्त गत्यंतर नाही. हि परिस्थिती महाराष्ट्रातील शहरांची आहे. बिहार-उत्तर प्रदेशा बद्दल बोलायला नकोच. पण गम्मत पुढे सुरु होते. माझ्या मोठ्या भावाच्या सगळ्या मित्रांची किमान दोन-दोन घर बंगलोर किंवा हैद्राबाद सारख्या तत्सम ठिकाणी आहेत. प्रत्येक घराची मुल्य निदान ५० लाख असणार. माझ्या एका मित्राच्या मोठ्या भावानी त्याच्या मुलीच्या ५व्या वाढदिवसाला ४० हजार खर्च केला. ही सगळी मुलं (मी आणि माझा भाऊ सुध्दा) मध्यम वर्गीय मराठी घरातील आहे. म्हणजे पंजाबी लोकांसारखी भपकेबाजी कोणाच्या घरी नव्हती. खर सांगायचं तर स्वतःच्या कष्टानी आणि सरळ मार्गानी सगळ्यांनी पैसा कमविला आहे. ती लोकं कर देतात आणि उरलेल्या पैशातून चैन करतात. त्यात काहीच चूक नाही. पण जेंव्हा समाजातील विभिन्न थरांमधे एवढी प्रचंड दरी निर्माण होते तेंव्हा समाजाचे भविष्य उज्वल आहे असे म्हणता येणार नाही. या परिस्थितीमागची कारणं काय आणि त्यावर उपाय काय या बद्दल आपण थोडा विचार करु या.
ज्यांना पैसा कमविता येतो आहे त्यांनी खुशाल कमवावा. आणि ज्यांना कमविता येत नाही या त्यांनी कमविण्याचे मार्ग शोधावेत. ज्यांच्याकडे ५० लाखाची घर घेण्याएवढे पैशे असतील त्यांनी जरूर एवढी महाग घर घ्यावीत. थोडक्यात कर्तबगारीने व्यक्तीने पुढे जावे आणि कर्म-दरिद्री लोकांनी मागे पडावे या नियमात काही वावगे नाही. इथे मुद्दा गरिबी-श्रीमंतीचा नाही. मानव जातीच्या उदयापासुन समाजात गरिब आणि श्रीमंत हे घटक आहेत. इथे मुद्दा हा की जे गरिब आहेत त्यांच्या समोर सुखी होण्याचे मार्ग उपलब्ध आहेत की नाही. प्राप्त भारतीय समाजात हे मार्ग बंद होतायत. गेल्या तीनशी-चारशे वर्षात भारतीय समाज जाती-व्यवस्थेने विभाजित होता. ती व्यवस्था इतकी कडक होती की त्यामुळे आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी फारच कमी लोकांना मिळत असे. स्वातंत्र्या नंतर प्रजातंत्राच्या अंतर्गत प्रगतीची दालने सर्व घटकांसमोर उघडण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात, सत्तापिपासु आणि भ्रष्ट नेते मंडळी या संधीचा बट्ट्या-बोळ करण्यातच व्यस्त आहे.
पण जागतिकीकरणाच्या झंझावातापुढे समाजाचे पैश्यावरुन जे नविन विभाजन चाललय त्यापुढे सर्व हतबल आहे. माझा मुद्दा गरिबी-श्रीमंतीची परिभाषा करणे हा नव्हे. पण दिवसभर मेहनत केल्यावर कुटुंबाला दोन्ही वेळेसच पोटभर सकस अन्न मिळाव. चांगल्या दर्जाचं प्राथमिक शिक्षण मिळावे. आणि मुख्य म्हणजे ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रात पुढे जायला मार्ग उपलब्ध हवेत. याचा अर्थ असा नव्हे कि सगळ्यांनी डॉक्टर आणि इंजिनिअरच व्हावे पण कोणास ते होण्यास कुठलीही बाधा नको. या काही मागण्या नाहीयात. या साधारण अपेक्षा आहेत. आणि या साठी सरकार कडे बघण्याची गरज नाही कारण प्रजातंत्रा अंतर्गत समाजच स्वतःच्या तब्येतीसाठी जवाबदार असतो. जरी ४० करोड लोकं आता मध्यम वर्गात मोडल्या जात असतील तरी अजुनही ५० ते ६० करोड लोक गरीबच मानल्या जातात. एवढ्या मोठ्या आकड्या कडे काना-डोळा करण अशक्य आहे.
लेखाच्या सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे जर कोणी सरळ-मार्गाने रग्गड पैसा कमवित असेल तर त्यात वावग काहीच नाही. पण भारतात जी नविन आर्थिक व्यवस्था हळु हळु पाय पसरते आहे त्याचे दुष्परिणाम असे की तुम्ही जितके पुढे जात असाल तर दुसर कोणी तरी मागे पडत आहे. भारताची विदेशात जाहिरात एक संगणक क्षेत्रातील शक्ती म्हणुन होतो. पण संगणक क्षेत्र जेमतेम १५ ते २० लाख लोकांनाच रोजगार पुरवितो आहे. औद्योगिक क्षेत्रातही बर्यापैकी प्रगती झाली आहे पण कामगार-मजदूर संबधीत कायदे पुरातन आहेत. त्यांच्या सध्य परिस्थितीशी मुळीच संबंध नाही. तसेच दळण-वळणाच्या सोयींच्या नावानी शंखच आहे. त्यामुळे औद्योगिक प्रगती खुंटलेली आहे. शेतकर्यांची परिस्थिती दयनीयच आहे. हरित-क्रांतीच्या दुसर्या टप्प्याची सुरुवात कधी झालीच नाही. त्यामुळे पाच वर्षापूर्वी अन्न-धान्याची निर्यात करणारा आपल्या देशावर अन्न-धान्य आयात करण्याची पंचाईत लौकरच येऊ शकते. या सगळ्य भानगडीत केंद्र सरकार घंटा-खुर्ची खेळण्यात अधिक मग्न आहे. १९९५ नंतर एकही स्थिर सरकार केंद्रावर आलेलं नाही. गठ-बंधनाचा हा काळ आहे हे जरी खर असल तरी त्याची फार मोठी किंमत देश भरतो. अश्या परिस्थितीत सरकार कडुन कशाचिही अपेक्षा करण मूर्खपणा ठरेल. पण मग करायच काय?
१९९१ साली श्री मनमोहन सिंह यांनी भारतीय बाजारपेठांची द्वारे विदेशी कंपन्यांसाठी उघडलीत. असं करण्याचे परिणाम काय होणार आहेत हे बहुतांश जनतेला ठाऊक नव्हत. अजुनही लोकांना त्याचा थांगपत्ता नाही. अर्थात, बाजारपेठा मुक्त करण्यात काही व्यंग नाही. भारताने जागतिकिकरणाच्या प्रक्रियेत भाग घ्यावा कि याबद्दल विचार करण्यात फारसा अर्थ नाही. तसे करणे अपरिहार्य तर होतेच पण आवश्यकही होत. सोप्या भाषेत सांगायच तर नाका-तोंडाशी पाणी आलं होत. मी लहान असतांना सगळे म्हणायचे की जाहिरातींच जग येणार. मला या वाक्याचा मुळीच गंध तेंव्हा लागला नाही. पण एवढ नक्की कि दूरदर्शन वरील धारवाहिका चालू होण्या आगोदर आणि नंतर येणार्या जाहिराती, सारख्या मधे मधे येऊ लागल्या. सुरुवातीला क्षुद्र वाटणार्या या गोष्टीने आता बकासुराचे रूप घेतले आहे. प्रत्येक ठिकाणी जाहिराती. वेळी-अवेळी जाहिराती. प्रत्येक वस्तुच्या जाहिराती. कार्यक्रमांमध्ये, कार्यक्रमां आगोदर आणि नंतर फक्त जाहिरातीच. कुठल्याही कार्याच्या नारळ फोडण्या आगोदर जाहिरात करु ईच्छिणार्यांना शोधण आवश्यक आहे. आता जागतिकीकरणाचा पायाच जाहिरात असल्यामुळे तक्रार करायल वाव नाही. औद्योगिकीकरणासाठी उत्पादित वस्तु विकणे आवश्यक आहे आणि त्या साठी वस्तुंच्या जाहिराती करणे आवश्यक आहे. आधी लोकांच्या गरजा भागवण्यासाठी चाललेल उत्पादन लौकरच लोकांसाठी गरजा निर्माण करण्याच्या उद्योगास लागल. आणि या गरजा निर्माण करण्यसाठी जाहिरात याचा उपयोग विक्रेते एका शस्त्रासारखा करु लागलेत. त्यामुळे या भानगडीत होत काय की लोकांसाठी जाहिराती कि जाहिरातींसाठी लोक याचा घोटाळा होऊ लागतो. वस्तुस्थिती अशी की आपलं आयुष्यच एक जाहिरात झालेल आहे.
या जाहिरातबाजीत सत्य परिस्थितीशी संपर्क तुटतो. आजु-बाजुची गरिबी दिसण बंद होत. सगळ्यानीच हातातील कामं-धामं सोडून समाज सेवेस लागायल हव अस माझं म्हणण मुळीच नाही. पण शरीराच्या एका कोपर्यात पसरलेला कर्करोग जसा सगळी कडे पसरतो तसे समाजावर होत असलेल्या दुष्परिणामांची किंमत सगळ्यांनाच द्यावी लागणार आहे. जेवढ होईल तेवढ कराव. जितकी होईल तितकी माहिती मिळवावी. आपलं नोकरी-पाणी चालूच ठेवाव आणि त्यात प्रगती करण्यावरच सगळ लक्ष हव पण कुठली सेवा-भावी संस्था चांगल कार्य करत असेल तर निदान देणगी देण्यात हात कचरायला नको. अगदी काही नाही तर राजकीय किंवा सामाजिक घटनांची माहिती करुन घेउन त्या प्रमाणे मतदान केले तरी पुरेसे आहे. तरुण पिढीत अगदी या साध्या साध्या गोष्टींचाही अभाव दिसतो. (मी काही बाजीराव नाही. मी सुध्दा सगळ्यां एवढाच शंख आहे!) पण जर का जाहिरातींच जिवन जगण्याच्या धडपडीत राहिलोत तर प्राप्त वस्तुस्थितीने आपल्या देशाच भविष्य कधी गिळंकृत केल हे कळणार सुध्दा नाही. जेंव्हा कळेल तेंव्हा फार उशीर झालेला असेल.
7/4/08
देशभक्ति
माझ्या मायभूमीबद्दल लिहायला शब्द शोधु लागलो
मनाच्या काना-कोपर्यात तुडुंब भरलेल्या भावनांमधे नाहु लागलो॥१॥
पण या भावनांच्या सूरांना शब्दांची कोंदणे सापडेना
शब्द पारख्या या भावनांचे कोड मला उमगेना॥२॥
मनात आले देशभक्तिचे बोल हे मोठ्यांचे कार्य असावे
त्यांच्या कल्पनाशक्तीची भव्यता कळाली तरी आम्ही धन्य व्हावे॥३॥
मग वाटे देशप्रेम हि केवळ थोरा-मोठ्यांची संपत्ती नव्हे
या हृदयात तेवत असलेल्या देशभक्तीची किंमत कशाहुन कमी नव्हे॥४॥
मान्य माझ्या देशभक्तिच्या बगीच्यातनसतील कल्पनांचे ताटवे
नसतील मंजुळ गाणी किंवा नसतील शब्दसंपन्न वृक्षे॥५॥
मग आम्हा सामान्यांनी आमची देशभक्ति सिध्द कशी करावी
काय केलतं देशाबद्दल विचारले तर काय उत्तर द्यावी?॥६॥
घातली गांधी टोपी चढवले पुतळ्यांना हार आणि काढले मोर्चे सगळीकडे
राजकारण्यांनी मांडलेल्या देशभक्तिचा हा बाजार शिसारी येण्यापलिकडे॥७॥
वाढता भ्रष्टाचार वाढती महागाई वाढती आपापसातील भांडणे
घसरती माणुसकी घसरत्या नीती-मत्ता घसरती समाजाची माप-दंडे॥८॥
या व्याधीग्रस्त समाजाच्या पीडा आकलना पलिकडे
यावर उपाय शोधण्यापुढे जगाला प्रकाश देण्याचे काम उपरे॥९॥
म्हणुन काय या पणतीने तेवू नये काय?
देश धर्माची आण वाहुन जमेल तितका प्रकाश पसरवु नये काय?॥१०॥
सांगतो तुम्हांस हार-तुरे निवडणुकीं पलिकडे खरी देशभक्ती
संघटीत होउन समाज कंटकांवर मात करणे यातच खरी कीर्ती॥११॥
दीन-पिडितांची सेवा करणे हाच खरा धर्म
मायभूमीचे ऋण फेडण्याची भीष्म-प्रतिज्ञा हेच अंतिम कर्म॥१२॥
6/28/08
तो मी नव्हेच!
माझ्या ब्लॉगवर उजवीकडे 'स्टॅट काउंटर' नावाचे वाचकांच्या संख्येची नोंद करणारे यंत्र आहे. त्याचा फारसा काही उपयोग नाही पण उगाचच फुशारकी मारायला हे यंत्र सोयीचं आहे. "माझ्या ब्लॉगवर आत्तापर्यंत २ हज्जार लोक येउन गेलेत" असं म्हटल की कॉलर वर करायला बरं पडत एवढच. दोन आठवड्यापुर्वीपर्यंत भेट दिलेल्या वाचकांची संख्या २ हजारच्या घरात होती. दररोज बहुधा पाच ते दहा लोक चुकुन-माकुन येउन धडकतात. बहुतांश वेळा मराठीब्लॉग डॉट नेट वरुन ही लोक माझ्या संकेतस्थळावर पोचतात. जर का मी एखादी नविन गोष्ट टाकली तर पाहुण्यांची संख्या तीस-पस्तीसच्या घरात जाते पण ते तात्पुरतीचं.
दोन आठवड्या पुर्वी अचानक या संकेतस्थळावर एकाच दिवसात ३०० लोक येउन गेलेत. मी थोडा चरकलोच. मी या संकेतस्थळाची जाहिरात कुठेच करत नाही.माझ्या बर्याचश्या मित्रांना मी काही लिहितो हे माहिती सुध्दा नाही. काही खास मित्र मात्र नियमित वाचुन मला प्रोत्साहन देतात. मग ही अनोळखी ३०० मंडळी कुठुन आली? पण ही नुसती सुरुवात होती. दुसर्या दिवशी ७५० लोकांनी संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद स्टॅट काउंटरनी केली. (मी माझ्या संगणकावरुन संकेतस्थळावर गेलो तर त्याने भेट-नोंदीचा आकडा वाढत नाही) मला वाटायला लागल की काही तरी तांत्रिक गडबड असणार. मी लगेच स्टॅट काउंटरच्या प्रशासकीय विभागाला ई-मेल केला. पण त्यांचे उत्तर आले की यंत्रणा व्यवस्थित आहे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक संकेतस्थळावर येउन गेले आहेत. बघता बघता चार दिवसात १८०० लोक येउन गेलेत. मग मी थोडी 'तहकिकात' करायची ठरवली. माझा ब्लॉग कोणी अजुन व्यक्तीने त्याच्या ब्लॉगवर तर टाकला नाही? किंवा कोणी माझ्या ब्लॉगबद्दल प्रतिक्रीया अजुन कुठे व्यक्त तर केली नाही? कारण तस असेल तर अपरोक्षरित्या माझ्या संकेतस्थळाची जाहिरात होइल आणि वाचकांची संख्या वाढेत. मी माझं नाव (भारद्वाज माझ आण्णाव नाही. ते आमचं गोत्र आहे) किंवा संकेतस्थळाचा पत्ता गुगल करुन बघितला पण माझ्या हातात फारस काही लागेना. स्टॅट काउंटरच्या नोंदींमधे मला लोकसत्ताचे संकेस्थळाची नोंद मला अचानक आढळली. मी माझ्या ब्लॉगचे संकेतस्थळ व लोकसत्ता अश्या शब्दांना गुगल केल्यावर मला लोकसत्तेच्या रविवार पुरवणीत माझ्या ब्लॉगचा उल्लेख असलेला लेख मला आढळला. लोकसत्तेच्या तुषार खरात नावाच्या पत्रकाराने इंटरनेटवर वाढत असलेल्या मराठी ब्लॉगस् विश्वाबद्दल लेख लिहिला होता. या लेखात त्यांना आवडलेल्या काही ब्लॉगस् मधे माझ्या ब्लॉगचा उल्लेख प्रामुख्याने झाला होता. ते बघुन अनेक वाचकांनी माझ्या संकेतस्थळाला भेट दिली. ती संख्या बघता बघता अडीच हजाराच्या घरात गेली.
खर तर माझे लेखन कोणी वाचावं या हेतुने मी लिहित नाही. लिहिण्याजोगं काही तरी माझ्या कडे आहे असं मला वाटत म्हणुन मी माझा की-बोर्ड बदडतो. अर्थात, संगणकावर मराठी लिहिणही फार सोपं झालेल असल्यामुळे गोष्ट लिहायला फारश्या उठाठेवी करव्या लागत नाहीत. माझं लेखन कोणाला आवडलं तरी उत्तम आणि नाही आवडल तरी उत्तम. माझा शब्दांच्या सामर्थ्यावर ठाम विश्वास आहे आणि माझ्या शब्दात फारस सामर्थ्य कुठल्याच दृष्टीने नाही यावरही माझा तितकाच विश्वास आहे. पण नाही म्हटल तरी अचानक मिळालेल्या प्रसिध्दीनी मी हुरळुन गेलो. मी लेखक झाल्याचा भास होऊ लागला. आता घरा बाहेर पडलो तर लोकं ओळखणार तर नाही ना अशी मला भीती वाटु लागली. मी उगाच टोपी घालुन हिंडु लागलो. खर मी पिक्चर मधे काम करत नव्हतो कि लोकं ओळखतील! अजुन काही कमी असेल तर मी परदेशात रहातो आणि तिथे मराठी भाषेचा गंधही कोणाला नाही. पण ही माझी 'लाईम-लाईटची' वेळ होती. आणि तिथेच माझी लेखणी घसरली. राज-महालाच्या मनोर्यावर बसल्यामुळे कावळ्याला कोणी गरुड म्हणत नाही.
लेखन बरेच लोकं करतात किंवा करु शकतात. प्रसिध्दीस येणं हा मुद्दा थोडा बाजुल ठेवला तर प्रतिभाशाली लेखक किंवा कवीं आपल्याला का आवडतात? सगळेच लेखक-कवी आवडतात अस नाही किंवा आवडत्या साहित्यिकाने लिहिलेलं सगळंच आवडत असही नाही. पण श्रेष्ठ साहित्यिकांचे शब्द, विचार, भावना आपल्या मनाला कुठे तरी जाउन भिडतात. त्यांनी शब्दबध्द केलेल्या अनुभवांशी आपण नातं जोडु शकतो. आपल्या सोबत अस काही घडु शकत किंवा आपल्या ओळखीतील कोणा सोबत तस घडलेलं असत हे आपल्या लगेच लक्षात येत. तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य व्यक्तींनाही तसंच वाटत असत पण साहित्यिक त्या भावना शब्दांमधे अचूक पकडतात. आपल्या मूक जीवनाला बोलत करतात.
पु.लं नी लिहिलेल्या व्यक्तिचित्रां मधील अंतु बर्वा किंवा नारायण आपल्याला कुठे ना कुठे भेटले असतात. वि.स. खांडेकरांनी रेखाटलेल्या ययाती-देवयानीतील मनुष्य वृत्ती आपल्याला आपल्याच आयुष्यात नज़रेत येतात.कुसुमाग्रजांची पृथ्वीचे प्रेमगीत किंवा कोलंबसाचे गर्वगीत यात प्रगट होणार्या उंत्तुंग कल्पनाशक्तीनी मन भरुन येतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जयोस्तुते गीत वाचल्यावर शब्दांमधे समाजाची अस्मिता जागृत करण्याचे सामर्थ्य आहे याची प्रचिती येते. दु:खाच्या विविध छटा सुरेश भटांच्या प्रत्येक शब्दातून जाणवतात. बा. भ. भोरकर किंवा कवी अनिल यांचे सृष्टी-सौंदर्यावरची पद्य मन प्रफुल्लीत करतात. बहिणाबाई चौधरी किंवा भाऊसाहेब पाटणकरांच्या कविता आयुष्याकडे बघण्याचा एक नविन दृष्टीकोन देतात. इंदिरा संत किंवा शांताबाई शे़ळके शब्दांशी जणु लडिवाळ करुन मनाच्या अनभिज्ञ काना-कोपर्यांची सैर करुन आणतात. ग. दि. माडगुळकरांच्या कविता म्हणजे सुग्रास अन्नाची मेजवानीच. 'एक तळ्यात होती बदके अनेक' असो किंवा जोगिया असो, सरस्वतीच त्यांच्या घरची पाहुणी होती. गीत-रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केले. जणु रामाचा पुनर्जन्म महाराष्ट्रात झाला. आपल्या प्रतिभेने समाजाची करमणुक करणे हेच केवळ साहित्यिकांचे कार्य नव्हे. समाजासमोर ते सध्य परिस्थितीचा आरासा ठेवतात. गोमांतक किंवा महाराष्ट्र चळवळीत आचार्य अत्र्यांच्या लेखणीला तलवारीहुन अधिक धार होती. जाती संस्थेच्या आणि समाजाच्या पराकोटीच्या कर्मठपणाची विष-फळे विजय तेंडुलकरांनी रेखाटलेली व्यक्तिमत्वे आपल्याला चाखवतात. मरगळलेल्या समाजाला दंडुक्यानी मार बसल्याचा भास 'एक तुतारी द्या मजला आणुनी' या केशवसुतांच्या कवितेनी होतो.
जितकी नावे लिहावित तितकी कमी आहेत. आणि त्यांच कौतुक करण्या इतपत माझ्याकडे शब्दांच भांडार नाही. मी अजुन महाराष्ट्रातील संत परंपरेच्या साहित्याबद्दल काहीच लिहिलेलं नाहिया! तेवढी माझी पात्रता नव्हे.थोडक्यात साहित्यिकांना समाजाचे मानबिंदु मानायला हरकत नाही. ते समजाच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. समाजाच्या अस्तित्वाला साकार करतात. समाजाच्या अनुभवांना बोलत करुन ते इतिहासाल जन्म देतात. त्यांच्या कल्पनाशक्तिला वाचा देणारी ही मराठी-माउली धन्य आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारा मराठी समाज धन्य.
माझ्या सामान्य जीवनात मला जे काही दिसत त्याला शब्दात बांधतांना मला धाप लागते. इंटरनेटच्या माया-जाळात मला थोडी प्रसिध्दी मिळाली तर मला नाकाखाली पारंब्या लोंबकळल्याचा भास होऊ लागला. अश्या साहित्याच्या उत्तुंग राज-महालाच्या पायथ्याशी मला जागा मिळाली तरी पुरेसे आहे. पण मी तिथेही सध्या पोचु शकत नाही हीच वस्तुस्थिती आहे या विचारानी मला थोडं वाईट वाटल. मला येणार्या यत्किंचित अनुभवांनाही जी भाषा प्रेमाने कवटाळते आणि प्रोत्साहन देते त्या भाषेत माझा जन्म झालाय हे काही कमी आहे?
6/18/08
॥प्रलोभनं॥
या यज्ञाची ईष्टदेवता। कान्होबाची भक्ती॥१॥
कुंड धर्माचा बांधुनी। अर्पिल्या कर्माच्या काष्ठा॥
देवून भक्तीचे तूप। पेटविला हा यज्ञाग्नी॥२॥
बुध्दी ज्ञानपर। हृदय भक्तीपर॥
अवयव कर्मोत्सुक। करावे रे ॥३॥
या देहातच चक्रपाणी। तोच शोधूनी॥
मोक्ष अवघाची। प्राप्त झाला रे॥४॥
मोठी मोठी निरूपणे वाचुनी। घेतले हे हातात कार्य॥
या पामरात नसे शक्ती। नेण्यास पूर्णत्वास हे यज्ञकर्म॥५॥
प्रारब्ध कर्माची फळे। भोगण्यास असमर्थ॥
करूनी चुकांची पुनरावृत्ती। दुष्फळ संचित कर्म॥६॥
सांगतात तुकोबा आम्हास। देहात वसे चक्रपाणी॥
हा देहच षड्-रिपुंच्या तावडीत। सांगावी काय राम-कहाणी॥७॥
यात भर कलियुगाची। प्रलोभनांचा नसे तुटवडा॥
या षड्-भुतांची शक्ती अचाट। गिळंकृत करिती भू-मंडळा॥८॥
या षड्-भुतांची वाढे शक्ती। या देहाची जर्जर दशा॥
जैसे राहू-केतू ग्रासती। खग्रास ग्रहणे सूर्या॥९॥
विझविती यज्ञाग्नी। या षड्-भुतांचा अंधःकार॥
भक्ती विफल कर्मे निष्फळ। वाढे सर्वत्र बुभु:कार॥१०॥
या कलियुगात। मनाच्या व्यथेस ना ठाव॥
मन मनालाच फसवुन। प्रलोभनांचे शोधी गाव॥११॥
प्रलोभन-ग्रस्त मनास। औषध काही ना मिळे॥
प्रलोभनांच्या ताटव्यात। पुनर्जन्माचा साप दंश करे॥१२॥
प्रलोभनांच्या जंजाळात। अजून किती गुंतायचे॥
देवघराच्या उंबरठ्यावर। किती जन्म ताटकळायचे?॥१३॥
या चेष्टेचा। अंत कधी ना कळे॥
या जिवा-शिवाच्या खेळाचा। हेतू काय ना उमजे॥१४॥
चिन्मय करी सर्वांस विनंती। हे किंतु नाही नवखे॥
अंतरी केशव-प्रीतीची बांसरी। शब्द केवळ भौतिक रूपे॥१५॥
6/14/08
फिनिक्स
गोष्टी कधी कश्या बदलतील हे सांगण नेहमीच कठीण असत. खुपदा असही होत की आपली काही चूक नसते तरी बराच त्रास अंगावर पडतो. खुप तमाशे केले तरी काही फरक पडत नाही. आगीत पडल की नाचुन थोडीच अंगाला चटके लागण थांबत. आमचं दुकान भेंडी बाजारात होत तरी आम्हाला कधी कशाची भीती वाटली नाही. आजु-बाजुला मुसलमानच होते पण आमच्या दुकानांच्या लाईनीत सगळ्या हिंदुंचीच दुकान होती. आमच्या कडचे बरेचशे पोरे मुसलमानच असत. भेंडी बाजा़र तसा भाई लोगचाच इलाका आहे. आम्ही छोटा शकील, दाउद इब्राहिमला आमच्या डोळ्यांनी बघीतल आहे. तेंव्हा पण तेंव्हा त्यांच्या सारखे बरेच भाई लोक तिथे हिंडत असत. एका जमान्यात हाजी मस्तानचा खुप वचका होता. पण तो बाबांच्या जमान्यात. दाऊद इब्राहिम सारख्या घाणेरड्या लोकांपुढे हाजी मस्तान काय किंवा वरदराजच काय, देव माणुस होता. स्मगलिंग करा किंवा हातभट्टीची दारु विका पण खाल्ल्या थाळीत छेद तर नका करु. ज्या देशात रहाता त्याच्याशी तर गद्दारी करायला नको. अयोध्याच्या राम मंदिराचा मुद्दा जेंव्हा पेटायला लागला तेंव्हा आमच्या दुकानाच्या इलाक्यात माहोल तंग होऊ लागला. डिसेंबर मधे ती इमारत पडली त्याच्या भूकंप आमच्या बुडाखाली आला. मुंबई सोबत आमची जिंदगीपण पेटली. आजु-बाजुला मुसलमानच असल्यामुळे आमच दुकान सहाजिकच लॉक-डाउन झाल. हळु-हळु दंगली वाढत गेल्या. आमच्या मुलुंडमधे शांतता होती पण दुकानच्या चिंतेनी मन रमत नव्हत. जानेवारीच्या शेवटाला दुकाना पर्यंत पोचता आल. दुकानात काहीच वाचल नव्हत. व्यवस्थितरित्या दुकान उघडुन सगळा माल चोरुन घेउन गेले होते. कुर्हाडीने लॉक तोडल. मग दिवसा-ढवळ्या माल हलवत होते. नंतर सगळीकडे रॉकेल टाकुन आग लावली. आमच्या कडे काम करणार्या पोर्यानी हे सगळं सांगितल. वीस-तीस वर्ष जुनं फर्निचर, बुकं, सगळ-सगळं जळुन गेल. भिंतीवर धमक्या लिहिलेल्या होत्या. हे सगळं बघुन बाबांच्या छातीत दुखायला लागल म्हणुन त्यांना आधी हॉस्पीटल मधे घेउन गेलो पण नशिबानी हार्ट-अटॅक वगैरे काही नव्हता. आजु-बाजुची सगळीच दुकानं जाळुन टाकली होती. तेंव्हा आगीचे इंन्शुरंस होत पण ते लोक म्हणाले की दंगलीमधे झालेल्या नुकसानाची भरपाई ते करत नाहीत.
दुकानात अक्षरशः काहीच शिल्लक राहिल नव्हत. काय कराव सुचतच नव्हत. धंदा म्हणला म्हणजे पैसा सतत खेळता असतो. आमचं सगळ्यांच जे काही बचत होती त्यावर किती दिवस काढायचे. आमच्या नुकसानी बद्दल सरकार कडुन पंचवीस हजार मिळालेत. लाखो रुपयांच्या मालाची होळी झाली आणि शिमग्याला पंचवीस हजार मिळाले. परत डागडुजी करुन करुन माल भरायच म्हटल तरी गिर्हाईक कधी परत येणार माहिती नव्हत .घरचा धंदा असल्यामुळे सहाजिकच शिक्षणाकडे आम्ही भावांनी फारस लक्ष दिलं नव्हत. आम्ही आम्ही दोघे मोठे भाई बी. कॉम होतो पण त्याल कोणी भीक घालत नाही. मी आमच्याच अकांउटंट कडे नोकरी धरली. महिन्याला अडीच हजार पगार होता. काही दिवसांपूर्वीच मी नवा दुकान टाकायच्या खटपटीत होतो आणि आता दाण्याला मोताद झालो होतो. पण परिस्थिती नुसार बदललो नाही तर मोडुन जातो. त्या घडीला घरी दोन्ही वेळेसच जेवण सगळ्यांना मिळायला हव हे महत्त्वाच होत. माझ्या भावानी सेल्समनची नोकरी मिळविली. कपडा मार्केट शी संबंधीतच होती.
पण आम्हा सगळ्यांच्या डोक्यात दुकानच घोळत होत. हाताशी काहीच पैसा नाही. बरं मागची थक-बाकी राहिली होती ती वेगळीच. ज्यांची देणी होती ते पाठीशी लागली होती व ज्यांच्याकडुन घेणी होती ती ओळख दाखवीत नव्हती. हळु-हळु लक्षात येत होत की पुन्हा दुकान चालु करायच तर भेंडी बाजारात ते करण अशक्य होत. जळलेल्या दुकानात आता पहिले सारख सुरक्षितही वाटेनास झाल. एक नविनच गेम सुरु झाला. कोणी तरी येउन दुकान विकता का विचारणार. नाही म्हटल तर धमक्यांचे फोन येणार. काहे दिवसांनी साले पोट्टे लोक येउन दम द्यायला लागले. चाकु-सुरे तर खिशात कंगव्या सारखे ते लोक बाळगत होते. शेवटी एकानी येउन पोटाशी नवी रिव्लॉवर लावली. विषाची परीक्षा कशाला करावी? सर बचा तो पगडी पचास म्हणुन एका बाटग्यालाच दुकान विकुन टाकलं. मातीला जास्त किंमत मिळाली असती. महिन्याच्या आत सगळा ठणठणाट झाला.
कपड्याचा सोडुन अजुन कुठल दुकान टाकयची हिंमत होत नव्हती. दुसर्या तर्हेची दुकान चालविण्याचा मुळीच अनुभव नव्हता. आणि इलेक्ट्रोनिक्स सारख दुकान टाकायला भांडवल कुठुन आणणार? मुंबईत नवी जागा विकत घेउन नवा धंदा टाकायचा म्हणजे लाखो रुपये लागणार. माझ्या सासुरवाड गुजरात मधे होत. ते लोकं मला म्हणत होते गुजारत मधे येउन त्यांच्या धंद्यात हात-भार लावायला. पण इथे आई-बाब आणि भावंडांना एकदम टाकुन जाणं अशक्य होत. त्यातुन एका भावाच अजुन शिक्षण व्हायच होत.
बुकं सांभाळण्याची काम करण्यात फारसा काही अर्थ नव्हता. पण अजुन काय कराव सुचत नव्हत. डोळ्यासमोर नुसताच अंधार होता. जुन्या ओळखींनी नोकर्या मिळत होत्या पण त्या अकांउटंट सारख्याच होत्या. अशीच काही वर्ष गेलीत. पोरग बालवाडीत जायची वेळ आली. खर्च वाढत होते, महागाई वाढत होती आणि उत्पन्न मात्र तेवढच होत. तेंव्हा कंप्युटर क्षेत्राचं वारं थोड-थोड वाहु लागली होती. मी घरा जवळच्या एका इंस्टीट्युट मधे छोटे कोर्सेस करायला सुरुवात केली. ते साले लोक लुबाडत होते. मायक्रोस्फॉट वर्ड शिकविण्याचे हजार रुपये घेत होते. अर्थात हे कळायलाही काही दिवस लागले. मी आपला कोर्सच सर्टिफिकीट घेउन मारे नोकर्या शोधायला जायचो आणि जास्तीत जास्त सेक्रेटरीच्या नोकर्या उघडायच्यात. कंप्युटर क्षेत्रातील कंपन्या फक्त इंजिनिअर लोकांनाच नोकर्या देत असत. खर सांगायच तर इंजिनिअर झालेल्या पोरा मधे आणि माझ्यात काहीच फरक नव्हता. या मोठ्या कंपन्यात नोकर्या मिळाल्यात कि तिथेच सगळं शिकविल्या जात. पण मी आत इंजिनिअर नाही त्याला कोण काय करणार? शेवटी मी ठरवलं कि कितीही कठीण गेलं तरी कोडिंग शिकायच. मी परत क्लासेस सुरु केले. पण कोडिंग गम्मत थोडीच असते. मला चांद-तारे दिसायला लागले. लॉजिक काय ते कळेना, लँग्वेज कशी लिहायची ते जमेना. लुप काय हे साध कळायला महिना लागला. क्लास मधे शिकविणारा साला ढ माणुस होता. थोड पुस्तकाबाहेरच प्रश्न विचारले कि त्याची त्-त्-प्-प् व्हायची. दिवसभर काम करुन मी संध्याकाळभर इंस्टीट्युट मधे कंप्युटर समोर बसुन असे. तासोघंटी स्क्रीनकडे बघत बसायचो. पण जागवरुन हलायचो नाही. इथे बुडाखाली आग लागलेली असली आणि डोळ्यासमोर शुन्य अंधार असला म्हणजे काय स्थिती होते हे सांगण अशक्य आहे. हळु-हळु गोष्टी कळु लागल्या. न-कळुन होणार कस! बिल्डिंग मधल्या इंजिनिअर होत असलेल्या काही मुलांचीही मी मदत घेतली. जमिन-आस्मान एक केल आणि कोडिंग मागुन-पुढुन शिकलो.
इंस्टीट्युटची परीक्षा झाल्यावर मला अचानक खुप छान वाटु लागल इतका अभ्यास केल्यावर ती परीक्षा म्हणजे टाईम-पास होता. पण मला कॉन्फीडंट वाटु लागल. पुढे जायला माझ्यात बळ आल. अजुन हवी तशी नोकरी मिळाली नव्हती पण ती न मिळण्याच्या कारणांवर मी मात केली होती. कंप्युटर मला येत नाही किंवा येऊ शकत नाही असं कोणी म्हणु शकत नव्हत. मी सगळ्या मोठ्या कंपन्यांमधे अर्ज करायला सुरुवात केली. अर्थात, कोणीच भीक घातली नाही. बाबांनी सल्ला दिला कि कुठल्यातरी लहान कंपनीत आधी अनुभव घे. मी मग लहान कंपन्यांमधे अर्ज करु लागलो. पण नशिब अजुन साथ देत नव्हत. नशिबाला बोल देउन काय फायदा? एवढ भरलेलं घर,साथ देणारी बायको आणि मेहनत करण्यासाठी धड-धाकट शरीर. अजुन काय हव माणसाला?
मी डोक शांत ठेवल। जे करायला हव ते सगळं मी केल होत आणि करत होत. आता पुढे काय होणार ते होणार. आमच्या दुकानाचा असा सत्यानाश होइल अस कुणी स्वप्नातही बघितलं नव्हत. पण तस घडल. काहीही घडल तरी पुढे जाण्या शिवाय काही मार्ग नसतो. बाटग्यांचा राग करत आणि झालेल्यावर रडत बसलो असतो तर पोरं-बाळ उपाशी पडली असती. कोणी मदतीला येइल याची वाट बघण्यातही फारसा अर्थ नसतो. स्वतःच किंवा स्वतःच्या कुटुंबाच आपल्यालाच बघाव लागत. मी आणि माझ्या मधल्या भावानी घर चालत ठेवण्यासाठी धड-पडाट चालविला होता. तो महत्त्वाचा.
शेवटी दुबईतल्या एका लहान भारतीय कंपनीत ओळखीनी मला नोकरी लागली कोडिंगच काम होत. पगार फार नव्हता पण तीथे टॅक्स नसतो आणि रहाण्या-खाण्यासाठी पगारा व्यतिरिक्त भत्ता मिळणार होता. थोडक्यात, मिळालेला पगार घरी पाठवता येणार होता. ओळखीनी नोकरी मिळाल्याचं मनात खटकत होत. माझ्या कडे स्कीलस् होते. ओळखीची गरज नव्हती. पण आता या बद्दल विचार करण्याची मुभा मला नव्हती. मुंबईतच नोकरी शोधा अस पत्नी म्हणत होत्या पण अजुन वाट बघण शक्य नव्हत. संधी, मग ती कुठल्या का रित्या असो, सारखी मिळत नाही. काही वर्ष जरी अनुभव मिळाला तरी मग मोठ्या देशी कंपनीत नोकरी मिळण्याचे चान्सेस वाढणार होते.
आज घर स्थिर आहे. पोरगा कॉलेज मधे जाइल पुढल्या वर्षाला तर त्याच्या फी चे पैसे मी देउ शकतो. धाकट्या भावाचही शिक्षण नीट झाल. मधल्या भावालाही दुबईत चांगली नोकरी मिळवुन दिली. सेल्स च्या संबंधीतच होती. कमिशन बेसिस मधे टक्केवारी जास्त होती त्यामुळे पैसा जास्त मिळणार होता. त्याचाही संसार नीट मार्गाला लागला.
या सगळ्या घटना थोड्या पिक्चर मधल्या सारख्याच झाल्यात. थोडी नाच-गाणी असती तर मजा आली असती! शेवटही गोड झाला. नेहमीच होतो अस नाही. माझ नशिब अजुन काही नाही. अजुनही आठवण येते आणि परत धंदा करावासा वाटतो. पण ते कधी जमणार माहिती नाही. फारसा विचार करण्यातही अर्थ नाही पण झालेल्या गोष्टींचे चटके मधेच जाणवतात. आमच्या कुटुंबा पैकी कोणाचच काही चुकल नव्हत की त्या साथी एवढी शिक्षा का मिळावी? आयुष्यात आपल्या हातात किती कमी गोष्टी असतात हे मात्र लक्षात आल. शेवटी जेवढं जमेल तेवढ करायच.
मी सगळी शक्ती पणाला लावली होती आणि अजुनही लावतो आहे. बाकी सगळ वरच्याच्या हवाली.
6/7/08
गीता-माऊली
सनातन संस्थेत तत्त्व अनेक। जणु मोगर्याच्या फुलांची रास॥
यावर थोरांची निरुपणे। दरवळे चोहिकडे याचा सुवास॥१॥
पाय फुटले कि अर्भक। धावु लागती वाट फुटेल तिथे॥
तशी स्थिती होते। वाचु लागताच हि निरुपणे ॥२॥
या पामराची मती कुंठित। कळण्यास हा गुढार्थ।
झाकलेली हि शिवज्योती। षड्-रिपुंच्या घोंगडीत*॥३॥
माझ्या सख्या कान्होबास। आहे आमुची काळजी॥
आम्हा प्रश्नांकितांचे शंकानिवारण। करतो युध्दारंभी॥४॥
ऐन युध्दक्षेत्री। कृष्ण अर्जुनास सांगी॥
कर्म-भक्तिचे ज्ञान। भगवद्-गीते रुपी॥५॥
भ्रांत मिटली। युध्द क्षेत्राचे धर्म क्षेत्र झाले॥
कौरवांचे पतन झाले। गीतार्थाने॥६॥
गीतार्थाचे मूळ कठोर कर्मपर। रुप ज्ञानमय गोजिरे॥
गंध भक्तिपर गोड। दरवळे चोहिकडे॥७॥
या गीतेचे रुप काय वर्णावे। जणु आईचे प्रेम कथावे॥
शब्दांचे घडेच्या घडे भरावे। तरी ते अपुरेच॥८॥
या गीता वृक्ष-वल्ली। श्रांत-जन अनेक येती॥
धर्म-मोक्षाचे चिंतन करिती। ईप्सित फळे चाखुन॥९॥
युगा मागुनी युगे गेलीत। गीतार्थ गंगा वाहे अखंड॥
सर्वजन यात नाहुन। सत् चित् नित्य आनंदघन॥१०॥
कान्होबाची भक्ति ऊतु आली हृदयी। लिहिले हे शब्द प्रेमापोटी॥
अन्यथा या अर्भकाची बुध्दी जडभारी। थोरांनी हे साहस घ्यावे पदरी॥११॥
माझ्या राया भगवंता। धन्य झाला चिन्मय जन्मुन भारता॥
मोक्ष होतो जीथे प्राप्त। श्रवुन निव्वळ श्रीकृष्णा उधृत भगवद्-गीता॥१२॥
4/29/08
एक नम्र विनंती
प्रिय वाचक वृंद,
माझी जुन च्या पहिल्या आठवड्यात एक महत्त्वाची परीक्षा आहे। त्यामुळे मला लेखन करण्यास फारस वेळ मिळत नाहीया. मी दोन-चार लेख व एक्-दोन गोष्टी अर्धवट लिहुन ठेवल्या आहेत पण परीक्षा संपल्यावर लिखाण पूर्ण करुन लगेच मी त्या रुद्र शक्तिवर प्रकाशित करीन.
हे संकेतस्थळ जुन पर्यंत कृपया आठवणीत ठेवावे ही आपणांस नम्र विनंती।
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला,
चिन्मय 'भारद्वाज'
4/13/08
जय महाराष्ट्र!
महाराष्ट्र गेले साठ वर्ष औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे। सुरुवातीला मुंबईचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा झाला. पण पुढे मराठी नेते मंडळीने पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास कौतुकास्पदरित्या केला. सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि थोड्या बहुत प्रमाणात नागपुर अशी विकसित औद्योगिक केंद्रे आहेत. उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्रासारखे राज्य अजुन कुठे सापडणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा सुरळीत चालते व बहुतांश ठिकाणी रात्री ११ नंतरही पोरी-बाळी घराबाहेर हिंडु शकतात. स्त्री-मुक्ती व दलितांची प्रगती या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवरच आहे. थोडक्यात, इतर राज्यांच्या तुलनेत (गुजरात वगळता) महाराष्ट्रात नोकर्या आहेत, सुरक्षितता आहे व सामान्य जनांसाठी कष्ट करुन पुढे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. अजुन काही कमी असेल तर मुंबई हे हिंदि चित्रपट उद्योगाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे इतर राज्यातुन जर का महाराष्ट्रात येणार्या लोकांची रीघ लागत असेल तर त्यात नवलाईची गोष्ट काही नाही.
लोकतंत्राच्या अंतर्गत भारतीय कुठल्याही राज्यात जाउन स्थायिक होउ शकतात। त्यामुळे बिहार मधुन कोणी मुंबईस येत असेल तर तसे करणे त्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांतर्गत मोडते. तसेच या स्थलांतरास विरोध करणे ढेकुण पणा तर आहेच पण त्यापेक्षाही अधिक असली विचार सरणी ही भारत-विरोधी मानायला हवी.
अर्थात, दिसत तसं नसत म्हणुनच जग फसत। गोष्टी इतक्या सोप्या असत्या तर राज ठाकरेंना कोणाचाही पाठींबा मिळाला नसता. अजुन निवडणुका दूर आहेत पण माझ्या मते हे असले सगळे धिंगाणे करुनही त्यांना बर्यापैकी जागा मिळतील. कारण त्यांनी उठविलेले मुद्दे विचार करण्यायोग्य नक्कीच आहेत. फक्त त्या मुद्द्यांचे निदान मूर्खपणाचे आहे. बिहारी लोक मुंबईत येउन हिंदी अवश्य बोलु शकतात पण त्यांनी मराठी शिकण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्यांनी छट पुजा दादर मधे करायला हवी पण गणेश उत्सवात तेवढाच भाग घ्यायला हवा. आणि बहुतांश प्रमाणात अस होत याची मला खात्री आहे. पण राज ठाकरें सोबतच समाजवादी पक्षा सारख्या मतांचा धंदा मांडणारे पक्ष पाणी गढुळ करुन टाकतात.
माझ्या संकेतस्थळावर मागे मी "मराठी माणुस कुठे हरवला?"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा "भूक लागली" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे? मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्यक्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार? बिहारी?.
या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार राज ठाकर्यांनी केला असणार हे मी अगदी मानायला तयार आहे. या प्रश्नांचा कोणी तरी विचार करायलाच हवा, उत्तरे शोधायलाच हवीत. थोडक्यात, राज ठाकरे पूर्ण चूक नाहीत व पूर्ण बरोबर नाहीत. खेदजनक वस्तुस्थिती अशी की सगळ्यांना सोबत घेउन प्रगतीच्या दिशेनी जाण्या ऐवजी, सगळ्यांना सळो का पळो करुन समाज विभाजनाकडे त्यांची वाटचाल झपाट्याने सुरु आहे
इथे अजुन एक लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे ज्या मराठी माणसाबाबत बोलतात तो मराठी माणुस फक्त खर्यात मुंबई निवासी आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रात रहाणारा मराठी माणुस आहे? (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो?) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात। मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रा बाहेर येत सुध्दा नाहीत. राज ठाकरेंच्या मते मराठी माणुस दिसत नाही यात जरी तथ्य असलं तरी यावर उपाय महाराष्ट्रातून बिहारी-उत्तर प्रदेशींना काढुन टाकणे हा नक्कीच नव्हे. मुंबईत बिहारी भैय्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टॅक्सी चालकां पासुन ते दुधवाल्यां पर्यंत तीच लोक सगळीकडे दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लोकं मराठी लोकांच्या नोकर्या हिरावुन घेतायत. मुंबईत सगळ्यांना पुरुन उरेल इतक काम आहे व त्यामुळेच ही लोक मुंबईला येतात.
खर सांगायचं पर-राज्यीय लोकांचा या भानगडीशी काही संबंध नाही. स्वतः शिवसेना सत्तेत असतांना (तेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते) त्यांनी काय दिवे लावले? कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किंवा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात? दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर राज ठाकर्यांना सापडले की मगच आपण मराठी भाषिकांच्या विकासाबद्दल विचार करण्यास मोकळे होऊ.
* कृपया माझे या विषया संबंधीत "येथे मराठेचिया नगरी" आणि "मराठी माणुस कुठे हरवला?" हे दोन लेख अवश्य वाचावेत. *
3/16/08
कॉपी
९व्या इयत्तेची सहा-माही परीक्षा जवळ येत होती पण त्याच्या अभ्यासाच्या तयारीच्या नावानी शंख होता. त्याने आता जवळ जवळ अभ्यास करणे बंद केले होते. बास्केटबॉल व एन्.सी.सी. तून त्याला मुळीच फुरसत मिळत नसे आणि थोडा वेळ मिळालाच तर उनाडक्या करण्यात, मस्ती करण्यात तो गुंग असे. थोडक्यात, वेळ वाया घालवण्यात व अभ्यास न करण्याची कारणे शोधण्यात तो पटाईत झाला होता. घरी बरंच चिंतेच वातावरण होत. आई-वडिलांना काय कराव सुचत नव्हत व आजी या शंखाला शिस्त लावण्यात थकुन गेली होती. खर तर तिने स्वतःची, नातेवाईकांची व शेजार-पाजारची बरीच मुलं वाढवली होती. पण 'या सम हाच' अस काहीस तीला या आपल्या सगळ्यात धाकट्या नातवा बद्दल वाटु लागले होते. शाळेतही शिक्षकांना कळेना की हा विद्यार्थी जर का हुशार आहे तर अभ्यास का करत नाही ते. इंग्रजीच्या बाईंनी तर त्याला एकदा बाजुला घेउन विचारलं होत की घरी काही अडचणी आहेत का म्हणुन. एकेकाळी त्याचा वर्गात चांगलाच वरचा क्रमांक येत असे. आता मात्र घसरगुंडी थांबत नव्हती.
आमचे 'गुरु-महाराज' बहुधा निश्चिंत असतं पण सहा-माही परिक्षेचं थोंड टेंशन त्यांना जाणावु लागल होत. नुकताच तो शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सातार्याला जाउन आला होता. घरच्यांनी सहा-माही होईस्तोवर बास्केटबॉल खेळण्यास बंदी आणली होती. त्यामुळे त्याला आता बराच वेळ असे. 'पढाई फटाकसे खतम कर डालते है।' असला काहीसा विचार करुन तो अभ्यासाला तर लागला होता पण इतर गोष्टींप्रमाणे लक्ष देण्याची सवय लावावी लागते, अभ्यास करण्याचा सुध्दा सराव लागतो. पुस्तक हातात घेउन त्याच्या झोपाच बर्याचदा चालु असत. 'आज हा विषय संपवु, उद्या तो मग रिविजन' असले हवेत आराखडे बांधुन, परीक्षेची तारीख जवळ आली तरी त्याचा बहुतांश अभ्यास राहिलाच होता.
परीक्षा सहा-माही असल्यामुळे विद्यार्थ्यांना विशिष्ट पध्दतीने बसविल्या जात असे. एका बाकावर आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी बसत असत. कॉपी करु न देण्यासाठी विद्यार्थ्यांना या पद्धतीने बसविले जाई. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या मागे आणि पुढे रोल नंबर च्या हिशोबाने त्याच्या वर्गातील मैतर बसलेला असे. परिक्षा चालू असतांना वर्गात शिक्षक असायचे पण त्या व्यतिरिक्त इतर चपराशी, मुख्याध्यापिका किंवा तत्सम व्यक्तीगण वर्हांड्यातुन फेर्या मारत असत. एकुण बंदोबस्त चोख होता पण बिलंदर लोक कॉपी करायचेच. कोणाला उत्तीर्ण होण्याची धास्ती असे तर कोणाला पहिला क्रमांक न येण्याची. बरेचशे तर उगाचच काही तरी 'धाडस' दाखवायच म्हणुन कॉपी करत. कॉपी करण म्हणजे जवळ चिठ्ठ्या वगैरे ठेवण्याचा प्रकार दुर्मिळ असे. बहुतांश वेळा पुढल्याला किंवा मागल्याला विचारणे असलाच प्रकार असे. जिभकाटेच्या जवळ मात्र चिठ्ठ्या सापडल्या होत्या. त्याला शाळेतुन काढुन टाकलं होत.
सुरुवातीचे पेपर अपेक्षेपेक्षा बरेच चांगले गेलेत त्यामुळे तो आनंदात होता. सगळे प्रश्न सोडविल्या गेले होते. आता ते चूक का बरोबर असले भलते-सलते विचार करण्याच्या भानगडीत तो पडत नसे. अजुन महत्त्वाच म्हणजे समोर बसत असलेल्या सतीश ने या वेळेस चांगलाच अभ्यास केला होता. सतीश त्याचा चांगला मित्र असल्यामुळे आपल्या कथा नायकाचाही बराच फायदा झाला होता. काही अडलं-नडलं तर सतीश त्याची मदत करायचा. कधी कधी सप्लीमेंट बाकावर बाजुला ठेवायचा. एकुण आपली स्वारी खुशीत होती. आता फक्त ईतिहास व भूगोलाचे विषय राहिले होते. 'ये तो अपने बाए हात का खेल है'। असे त्याला वाटत होते.
अर्थात, आज ना उद्या कयामत येणारच होती, ती ईतिहासाच्या रुपाने आली.
त्याने सतीशला ढोसायला सुरुवात केली. "अबे, पहिल्या चार पैकी किंवा दुसर्या पाच पैकी किती प्रश्न येतात"?
एकदम इतका मोठा प्रश्न विचारल्यामुळे बराच आवाज झाला असावा? वर्गाच्या दुसार्या टोकाला बसलेल्या मुली ही मागे वळुन बघु लागल्या. बाई निवांतपणे बसुन काही तरी वाचत होत्या.
"पागल है क्या बे? मारेगा मुझे भी।" सतीश म्हणाला.
इथे मात्र तो तव्यावर पडल्यासारखा तडफडत होता. "बता ना बे जल्दी"
सतीश ने बोटांनी सांगितले की कुठले प्रश्न त्याने सोडवले आहेत ते.
त्याला हुश्श झालं. त्याने त्याच्या प्रश्न पत्रिकेवर त्या प्रश्नांवर रेघा मारल्यात व वीस पैकी तेरा व पंधरापैकी नऊ असे आकडे लिहिलेत. या आकड्यांना काय अर्थ होता ते त्यालाच माहिती.
"बोलु नका रे. आपापला पेपर सोडवा" बाई उगाचच ओरडल्यात.
"पेपर दिखा मुझे"
"अबे! दोन्-दोन पानांची उत्तर आहेत. एवढ दाखवणार आहे का तुला?"
"क्युं?"
" याने?"
"बस भाई, यही दोस्ती है तेरी"
"पागल झाला का बे?" सतीश म्हणाला.
" अरे कोण बोलतय रे मागे" बाईंनाही संवाद ऐकु गेला असावा. सतीशने अजुन काही न बोलता आपली सप्लीमेंट बाजुला काढुन ठेवली. तो त्यातील उत्तरे बघुन लिहु लागला. पण उत्तरे खरच लांब-लांब होती त्यामुळे सतीशचे आंग व कोपर यातुन त्याला नीटस दिसेना.
"बाजुला हो बे थोडा"
"अजुन बाजुला झालो तर पडीन मी बाका वरुन"
बरीच धुसर-पुसर चालू होती. बाजुला बसलेला दहावीचा पोरग शेवटी मधे पडला.
"अभी किसी ने और आवाज किया तो देख लुंगा पेपर के बाद"
"अस नको करु ना बे. तीस मार्कांच येत नाही या मला. काय करु सांग" तो म्हणाला.
"अभ्यास"
यावर काही उत्तर त्याच्याकडे नव्हते. वर्गातील बरीच मुलं मागे वळुन बघत होती. बाई निवांतच होत्या.
तो सतीशला सारखा पेन नी टोचु लागला. शेवटी सतीशला प्रकरण असह्य झाल. त्याने त्याच्या दोन सप्लीमेंट बाजुला काढल्यात व पायाखालुन त्याच्याकडे सारल्यात.
"घे. डोकं नको खाऊ."
हे अनपेक्षित होत. त्याला आता अजुनच भीती वाटायला लागली. तरी त्यानी खालती वाकुन ती सप्लीमेंट उचलली. खिडकीतुन कोणी बघतय का हे बघीतल व बाकाच्या कप्प्यात सप्लीमेंट ठेउन तो उत्तर भराभरा लिहु लागला. वर्गात परत शांतता पसरली.
बाई अजुनही निवांतच होत्या. चश्मा लाउन झोपल्या होत्या की मुलांवर त्यांचा नको तेवढा विश्वास होता कोण जाणे.
"झाल का रे लिहुन?" सतीशने विचारल.
"हो संपलच"
हवी असलेली उत्तर लिहुन तो अजुन काही मिळतय का हे बघत होता. तेवढ्यात कोणी तरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.
त्याचं हृदयच धडधडायचं थांबल. त्याने हळुच मागे वळुन बघीतल. बाजुला बाई उभ्या होत्या. त्याने आवंढा गिळला. समोर बघीतल तर सतीश ताठरला होता. त्याचीही हालचाल थांबली होती.
"अरे, अशी सप्लीमेंट मांडीवर घेउन लिहिशील तर मागचे लोक बघीतील ना" बाई त्याला म्हणाल्या.
बाईंनी त्याच्या मांडीवर असलेली सप्लीमेंट हातात घेतली व त्या उत्तर वाचु लागल्या. बाईंच्या हातात सप्लीमेंट गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की सतीशने काळ्या शाईने उत्तर लिहिली आहेत व तो निळ्या शाईच्या पेनने उत्तर लिहित होता. त्याला काय करावं सुचेना. जणु त्याला सगळं ब्रह्मांड दिसु लागलं. पकडल्या गेलो तर काय थापा मारायच्या याचा तो विचार करु लागला. पण थापा काय मारणार इथे अक्षरश: रंगे हात पकडल्या जाण्याची पाळी आली होती. बाईंनी उत्तरांवरुन नजर फिरवली व सप्लीमेंट परत त्याला दिली.
"बरोबर लिहिली आहेत उत्तर. पण अभ्यास कमी केलेला दिसतोय यंदा. अजुन केला पाहिजे अभ्यास. अरे, पुढलं वर्ष १०वीच ना? आत्तापासुनच सवय लावली पाहिजे अभ्यासाची. आणि दोन निळे पेन घेउन यायचे असतात परीक्षेला, हे असं वेगवेगळ्या पेनने लिहिशील बोर्डात तर कॉपी केली म्हणतील बोर्डवाले!" बाई हळु आवाजात त्याला म्हणाल्यात.
"हो मॅडम" तो कसाबसा म्हणाला व त्याने सप्लीमेंट उचलुन बाकाच्या कप्प्यात टाकली. एव्हाना समोर सतीशची पाठ घामाने भरली होती.
"अरे, मुलं सप्लीमेंट लंपास करतात एका-मेकांच्या. तुझ्या सप्लीमेंट जपुन ठेव" बाई जाता-जाता परत म्हणाल्यात.
"हो मॅडम"
बाई गेल्याबरोब्बर त्याने सप्लीमेंट सतीशकडे सरकावली. "बता ना था ना बे मॅडम आ रही है कर केत्याचं हृदय भात्यासारखं वर-खाली करत होत.
घंटा झाली. सगळी मुले आपापले पेपर बाईंना देउन घरी जाउ लागले. तो अजुनही काहीच बोलत नव्हता.
"थ्यँक्यु यार" तो सतीशला म्हणाला.
"आज तर आपल्या दोघांची वाट लागली असती." सतीश म्हणाला. जे झालं त्याच्याकडे बघता सतीश बराच शांत होता. आपल्या हिरो चा त्याला फारसा राग आलेला दिसत नव्हता. त्यानी खरी 'दोस्ती' निभावली आज.
त्याने काहीच न बोलता नुसताच आवंढा गिळला. "अभ्यास करायला हवा यार"
"तु १०वीचा क्लास लावला आहे का बाईंकडे?" सतीशने विचारले.
त्याने नुसतीच मान डोलावली.
3/8/08
जोधा-अकबर
मुसलमानी सत्तेचा आरंभ पृथ्वीराजाच्या पराभवानंतर म्हणजे ११व्या शतकात झाला असला तरी अरबी तसंच पर्शियन मुसलमानांचा रक्तरंजित हैदोस सध्याच्या अफगाणी सीमेपाशी ८व्या शतकापासुन चालू होता. मुहम्मद-बिन-कासिम याने सन ७१२ मधे कराची लुटल्याची नोंद आहे. आरंभी सोन आणि बायका हेच केवळ या आक्रमकांच लक्ष असे. त्या काळात लुटीतील आठ टक्के हिस्सा मुसलमानी साम्राज्याच्या खलिफाला द्यायची प्रथा असे. (पुढे हि प्रथा बंद पडली) त्यामुळे लुटलेल्या मंदिरांमधील सोन्याचा आठ टक्के हिस्सा तर खलिफाला जाईच पण पळवुन नेलेल्या बायकांच्या संख्येमधी आठ टक्के बायका सुद्धा अरब देशात खलिफाच्या दासी म्हणुन पाठविल्या जात असे. उरलेल्या बायका सैनिकांमधे वाटल्या जात असत. आता बायकांच पुढे काय व्हायच हे सांगायची गरज नाही. याच संदर्भात राणी पद्मिनीची कथा तर सर्वज्ञातच आहेपण केवळ हिंदू असल्यामुळे त्यांच्यावर हि दारुण परिस्थिती येत असे हे इथे लक्षात घेतल पाहिजे. बायका पळवुन नेण्याची हि पध्दत अगदी पाणीपतच्या युध्दातही कायम होती. अहमदशहा अब्दाली कित्त्येक मराठी कुळीन स्त्रीया अफगाणीस्थानात घेउन गेला. काही वर्षापूर्वी मी काबुल मधे १९७० च्या दशकात भारतीय परदेश विभागात काम केलेल्या एका सरकारी अधिकार्याचे पुस्तक वाचले. त्यात त्याला कोणी अफगाणी पुरुषाने त्याच्या अफगाणी कुटुंबात जतन करुन ठेवलेले काही दागिने आणुन दाखविले. त्या दागिन्यां मधे नथ, मंगळसुत्र व कुंकवाची पेटी यासारख्या गोष्टी होत्या.
तरुण मुलांना नोकर बनविण्यासाठी व तरुण पोरींना केवळ यौनसंबधीत दासी बनविण्याचा फार मोठा व्यापार मुसलमानी अंमलात चालु असे। बहुतांश व्यापार अरब देशांशी चालत असे. भारतीय उपखंडातून अरब देशापर्यंतच्या प्रवासा महत्वाचा टप्पा म्हणजे हिंदु-कुश पर्वत होय. ही पर्वतमाला पार करण्याचा प्रवास इतका यातनामय असे की बरीच तरुण मुलं-मुलींनी येथे शेवटचा श्वास घेतं. या मृत हिंदुंची संख्या एवढी होती की 'हिंदुची कत्ल जीथे होते' तो हिंदु-कुश असे नाव या पर्वतमालेला पडले. (या पर्वत-मालेचे मूळ संस्कृत नाव काय होते हे नेमंक मला आठवत नाहीया. पण महाभारतात या पर्वत मालेचा उल्लेख आहे.)
थोडक्यात हिंदु बायका या केवळ दासी म्हणुन उपयोगात आणण्याची पध्दती मुसलमानी अंमलात रुढ होती। दुसरी पध्दत म्हणजे की मुसलमानी सत्तेपुढे पराजय झाला तर मांडलिकत्व पत्करण्या अंतर्गत आपल्या घरातील बायका बरेचशे हिंदु राजे मुसलमानी सुल्तानाच्या हारेम मधे दाखल करत. जोधाबाई याच प्रथे अंतर्गत अकबराची 'बायको' मानल्या जात होती. अर्थात, लग्नानंतर ती मरीयम-ए-ज़माना झाली. आता अकबर कोण होता ते थोडं बघुया.
१२व्या शतकानंतर भारत म्हणजे आक्रमकांची खुली बाजारपेठ झाला होता। कोणीही यावे व दिल्लीत राज्य करावे हाच एक कायदा शिल्लक होता. याच देवाण-घेवाणीत बाबर नावाचा अत्यंत निम्न रक्ताचा व क्रुर इसम मध्य आशियातुन दिल्लीत दाखल झाला. हळु-हळु त्याने हात पाय पसरवायला सुरुवात केली. हिंदुंना मुसलमान करणे, मंदिरे तोडणे (अयोध्येचे राम-जन्मभुमीवर मशीद बांधणार हाच उत्साही सुल्तान!) इत्यादी कार्ये उरकल्यावर स्वतःला मोघली रक्तपिपासु टोळीचा वंशज बनवुन त्याने दिल्लीत मोघली अंमलाची सुरुवात केली. याच घराण्यात अकबराचा जन्म झाला. (औरंगझेब हा अकबराचा नातू) त्याने मोघली सत्तेच्या सीमा दख्खन पर्यंत ताणल्या पण राजपूतांशी भांडण्यात त्याचा बराच वेळ जात असे. यावर उपाय म्हणुन त्याने राजपूतांसमोर एक नवीन करार मांडला. जे राजपूत राजे अकबराचे मांडलिकत्व पत्कारतील व घरातील बायका अकबराच्या हारेम मधे दाखल करतील त्यांच्यावर अकबर स्वारी करणार नाही. जयपुरच्या अंबर राजघराण्यानी या कार्यात सर्वात पहिले पुढाकार घेतला. जे अकबरावर थुंकले त्यांच फारस भल झाल नाही. महाराण प्रताप बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण चित्तोडच्या स्वारीत विजय प्राप्त झाल्यावर किल्ल्यातील ३०,००० लोकांची कत्ल अकबराने केली हे फारस कोणाला ठाउक नाहे. (गोवारीकर साहेब ऐकताय का?) अर्थात, हि कत्तल फारशी मोठी नाही. बहमनी सुल्तानांनी कर्नाटक स्वारीत एक लाख लोकांची कत्तल केली. त्या भागातील एकाही माणसाला, बाईला किंवा अर्भकाला जिंदा ठेवला नाही. पण या बहमनी सुल्तांनांचा अकबराशी काही संबंध नाही.
पण थोडक्यात या अश्या वैभवशाली मुसलमानी अंमलातील एक हलक्या रक्ताचा अकबर राजा व तलवारील पाणी नसलेल्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्याची बायको झालेल्या जोधाबाईवरच प्रेमकहाणी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे आपल्या गोवारीकर साहेबांना कसं सुचल? कोणा मुसलमानाला हि सुल्तान आपले वाटत असतील म्हणुन त्याने चित्रपट दिग्दर्शित केला हे मी मानु शकतो.(मुघल-ए-आज़म) पण ज्या मातीने या मुसलमानी सत्तेला यशस्वीरीत्या आव्हान देण्यार्या मर्द-मराठ्यांच्या पिढ्यांन्-पिढ्या जन्मी घातल्यात्याच मातीत हे गोवारीकर कसे जन्मले? पण येथे मुद्दा गोवारीकरांच्याही बराच पुढे जातो. पैशांचा जो मुद्दा मी लेखाच्या आरंभी मांडला तो इथे फार महत्त्वाचा ठरतो. गोवारीकरांनी नसतं दिग्दर्शन केलं तर दुसर्या कोणी केलं असत. पण दिग्दर्शन कोणीही केल तरीही अकबराचा इतिहास तर बदलत नाही. हा असला घृणास्पद, रक्तानी बटबटलेला इतिहास बाजुला ठेउन कोणी त्याच काळावर आधारित प्रेमकहणी लिहु शकतो किंवा त्यावर आधारीत चित्रपट काढण्यासाठी पैसा देउ शकतो (लेखक व निर्माते) येथे भारतीय समाजाचा पराभव आहे.
"चित्रपट केवळ कलेचे माध्यम आहे पण शिवाजीराजे आमच्या मनात कायम आहे असल्या शंढ बाता करण्यात काही हशील नाही." कारण गेल्या शंभर वर्षात शिवाजीराजांवर एकही हिंदी चित्रपट प्रकाशित झालेला नाही. महाराणा प्रतापांवरही नाही किंवा गुरु गोबिंदसिंहजी वरही नाही. जो होउन गेला तो इतिहास पण तो विसरुन, आपल्याच पूर्वजांवर झालेल्या अनन्वीत अत्याचारांकडे कानाडोळा करुन मुसलमानी आक्रमकांवर चित्रपट काढण्याची किंवा तो बघण्याची हिंमत करणार्या भारतीय समाजाची लाचारी वाखण्याजोगीच आहे. अनेक गोवारीकर झालेत आणि पुढे अनेक होतीलही पण या भारतीय समाजाच्या मूढत्वावर काही उपाय आहे का, हे सांगण अशक्य आहे.
3/1/08
श्री गणेश वंदना - भाग ३
त्या पटातील अलंकार। ते च वाण तेजस्वी॥
कौतुके पाहता काव्यनाटका। त्याच रुणझुणती क्षुद्रघंटिका।
त्यांचा अर्थ-ध्वनी ऐका। मंजुळवाणा॥
पाहू जाता मार्मिकपणे। जी त्यांतील श्लेषस्थाने।
तीच घागर्यातील रत्ने। करगोट्याच्या॥
व्यासादींच्या मती। मेखलासम शोभती।
त्यांची सरळता झळाळे अती। पदरासमान॥
ज्यांस षड्दर्शने म्हणती। तेच सहा भुज असती।
त्यातील भिन्न अभिप्राय असती। शस्त्रासमान॥
तर्क तोचि परशू घोर। न्यायशास्त्र हा अंकुश तीव्र।
वेदात्न तो सुरस मधुर। मोदक शोभे॥
गणपतीच्या रेशमी वस्त्रांना ग्रंथांमधील सुंदर पदरचनांची उपमा देतांना ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की वस्त्रांना शोभतील असेच अलंकार गणपतीचे आहेत. येथे वाण शब्दाचा अर्थ लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रात सुवासिनी स्त्रीयांची वाण भरण्याची पध्दत आहे. वाण म्हणुन बहुधा मुठभर गहु, शेंगा इत्यादी गोष्टींनी ओटी भरल्या जाते. येथे गणपतीच्या वस्त्रांना व अलंकारांना वाणाची दिलेली उपमा अप्रतिम तर आहेच ज्ञानेश्वर महाराजांची कल्पनाशक्ती प्रगल्भ असुनही सामान्य जीवनाच्या किती निकट आहे हे बघुन मन विस्मित होते. ज्ञानेश्वरीची महानता यातच दडलेली आहे. श्रुती व स्मृती या दोहोंचा अपूर्व संगम गीतेत होतो. गीतेतील श्लोक गेय तर आहेच पण प्रत्येक शब्दात तत्त्वज्ञान ठासुन भरलेल आहे. ते सहजा-सहजी सामान्य बुध्दीस झेपत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील प्रगाढ तत्त्वज्ञान केवळ मराठीत उतरविले नाही तर अत्यंत रसाळ भाषेत ज्या कल्पना व उपमा सामान्य जनास सहज रुचतिल त्यांचा वापर करुन मराठी मनं पावन केलं.
गणपतीच्या गळ्यातील रुण-झुणणार्या क्षुद्र-घंटांना भारतीय साहित्य व कलेला (काव्य व नाटके) उपमा देतांना महाराज पुढे म्हणतात की या घंटांचा मंजुळवाणा अर्थ-ध्वनी ऐका। येथे अर्थ-ध्वनी शब्द परत मला फार आवडला. मागे आपण अर्थ-शोभा या शब्दाबद्दल बोललो होतो त्याच पठडीत अर्थ-ध्वनी शब्दाचा उपयोग येथे केला आहे. पण भारतीय साहित्य व कला केवळ इंद्रियांनाच सुखावणार नसुन त्यातील विचार हे अर्थपूर्ण आहेत हे ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शविले आहे. महाभारत कथन करण्याचे कार्य आदि व्यासांनी तर लेखनाचे कार्य गणपतीने केले. या अपूर्व संगमातुनच महाभारत व गीतेची निर्मिती झाली. या संगमाचे वर्णन करतांना महाराज गणपती आदि व्यासांच्या मती मेखले सारखा झळाळत होता असे म्हणतात. मेखला म्हणजे तेजस्वी कंबर-पट्टा. (थायलँड मधील एका नदीचेही नाव मेखला आहे!)
गणपतीचे षड्-भुजांना महाराज षड्दर्शनांची उपमा देतात।
वैषशिखा (कानद)
न्याय (गौतम)
सांख्य (कपिल)
योग (पातंजली)
मिमांसा (जैमिनी)
वेदांत (बाद्रायण)
या सहा तत्त्वज्ञानांचा षड्दर्शनां मधे समावेश होतो। हि षड्दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानांचा पाया आहे। प्रत्येक विषयावर लिहिण्याचे ईप्सित येथे नाही. पण यातील वेदांत तत्त्वज्ञान आपण सर्वांस अधिक परिचित आहे. वर्तमान परिस्थितीतील भारतीय समाजाचे धर्म, अर्थ, काम व मोक्ष या बद्दलचे विचार हे आद्य शंकराचार्यांनी प्रसार केलेल्या अद्वैत सिंध्दांतांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पण हा वेदांत सिध्दांत मूळ बाद्रायण ऋषिंनी प्रस्थापित केला होता.
याच ओवीत पुढे महाराज म्हणतात की ही सहा तत्त्वज्ञाने गणपतीचे सहा हात आहेत व या तत्त्वज्ञानातील अभिप्रेत अर्थ हे गणपतीच्या हातातील अस्त्र आहे. तर्काला महाराज परशुची उपमा देतात. परशु म्हणजे परशुरामांचे आवडते अस्त्र. येथे तर्काला परशुची उपमा देण्यामागे काय उद्देश असावा यावर भाष्य करणे थोडे कठिण आहे. परशु एका घावात दोन तुकडे करतो त्याच प्रमाणे जो तर्क कुठल्याही विवादाचे सत्य-असत्य असे दोन तुकडे करतो असा अर्थ अपेक्षित असावा असं मला वाटत. पुढे महाराज म्हणतात की गणपतीच्या हातातील मोदक म्हणजे वेदांत सिध्दांत होय.