8/8/08

धार्मिक साम्राज्यवाद

सध्या मी श्री अनंत काकबा प्रियोलकर यांनी लिहिलेले 'गोवा इंक्विझिशन' हे पुस्तक वाचतो आहे. पोर्तुगिज लोकांनी गोव्यात हिंदु समाजावर जे अनन्वित अत्याचार केलेत त्यांचा हे पुस्तक लेखा-जोखा आहे. पुस्तकातील घटना वाचुन मला रात्री नीट झोप येत नाही. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी भुता सारख्या डोळ्या समोर फिरतात. परकीय आक्रमकांनी भारतात मांडलेला हैदोस माझ्या साठी नवा नव्हे. मी मुसलमानी लोकांनी भारतात उभा केलेल्या रक्तरंजित इतिहास बराच वाचला आहे. थोडक्यात, धर्माच्या नावाखाली हे परकीय लोक कुठल्या थराला जाऊ शकतात याची मला पूर्ण जाणीव आहे. निदान अस मला वाटत असे. दु:खद बाब हि की मी चूक ठरलो. नुसत्या नंग्या तलवारी नाचवत, अल्ल-हो-अकबरच्या सैतानी आरोळ्या देत भारत नेस्तनाभूत करणारे मुसलमान, अत्याचारांच्या बाबतीत या पोर्तुगिजांच्या तुलनेत 'जच्चे-बच्चे' मानायला हवेत. उघडपणे रक्ताचे पाट वाहवण्याच्या ऐवजी कायदे संमत करुन लोकांचे धर्मांतर करण्यात पोर्तुगिजांचा हात कोणी धरु शकत नाही. आणि कायदे तोडल्यास, कायद्यां अंतर्गतच कत्ले-आम करण्यास ते मोकळे होते. संपूर्ण भारत जर का त्यांच्या अधिपत्या खाली असता तर काय झाले असते या विचाराने अंगावर शहारे येतात. बहुतेक काहीच राहिले नसते. दक्षिण अमेरिकेत त्यांनी मूळ रहिवास्यांपैकी फक्त एक टक्का लोक जिंवत ठेवले आहेत. उरलेल्यांना एकतर मारुन टाकले किंवा जबरदस्ती लग्न करुन मूळ रहिवास्यांचे रक्तच बदलवुन टाकले.

भारतात घातलेल्या हा थैमान भारतापूर्तीच सिमित नव्हता. युरोपिअन साम्राज्यावादाने असला थैमान जगाच्या प्रत्येक काना-कोपर्‍यात घातला. उत्तर व दक्षिण अमेरिकेत तेच घडले. ऑस्ट्रेलियातही तेच घडले. अफ्रिकेत तस करता येणं अशक्य होत म्हणुन तिथुन काळ्या लोकांना गुलाम बनवुन जगाच्या काना-कोपर्‍यात जाउन विकण्याचे काम या लोकांनी केल. सतराव्या व अठराव्या शतकात गुलाम-विक्रीचा धंदा फार नफ्याचा होता. जवळ जवळ दिड ते दोन करोड गुलाम अमेरिका खंडात विकल्या गेलेत. या गुलामांना ज्या दशेत अटलांटिक महासागर पार करुन अमेरीका खंडात नेण्यात येत असे याचे वर्णन कुठे वाचायला मिळाले तर प्रत्येकाने अवश्य वाचावे. मेंदु सुन्न होतो. अत्याचार करण्यात स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरीकेत पोर्तुगीज लोकांशी जणु चढा-ओढीची स्पर्धा होती. कोण जास्त लोकांना मारतो, कोण अधिक लोकांची धर्मांतर करतो या अभिमानाच्या गोष्टी असव्यात. फ्रेंच लोकांनी मध्य व उत्तर अफ्रिकेत तेच धिंगाणे केलेत. ब्रिटिश लोकांनी सध्य स्थितीत अमेरिका व कॅनडा मानल्या जात असलेल्या देशांमधे तसेच ऑस्ट्रेलिया खंडातील मूळ रहिवाश्यांना नाहिस केल. थोडक्यात हा नर-संहार सगळीकडे झाला. आशिया खंडात मुसलमानी लोकांनी केला (चेंगिझ खान पासुन तर मोहम्मद गझनवी पर्यंत) तर इतर खंडांमधे युरोपीय गोर्‍या लोकांनी केला.

मनात असा विचार येतो की सत्ता-पिपासु राज्यकर्ते असला संहार नेहमीच करत आले आहेत. आपली सत्त प्रस्थापीत करण्याच्या उद्योग मनुष्य जात जन्माला आल्यापासुन करते आहे. म्हणजे गेल्या हजार वर्षातील संहार हा याच मालिकेतील पानं आहेत. त्यात काही नविन नाही. पण गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. नीट निरिक्षण केले तर भीषणता अधिक जाणवते. मी फार मोठ्या भौगोलिक प्रदेशाच्या इतिहासावर तसेच विविध संस्कृतीच्या लोकांवर भाष्य करतो आहे त्यामुळे मतभेदांना बराच वाव आहे. पण जगाच्या इतिहास पटलावर गेल्या हजार वर्षातील घटनांचा विचार केला तर साम्राज्यवाद पडसाद ठळकपणे जाणवतातच पण या साम्राज्यवादाच्या मूळाशी धर्मांधता होती हे लक्षात घेतले तर साम्राज्यवादाचे अत्याचार आकलनी पडतात.

मी माझ्यासाठी किंवा माझ्या फायद्या साठी लोकांना हिंसा करण्यास उद्युक्त केल तर या हिंसेची व्यापकता माझ्या जीवनकालापर्यंतच सिमित राहिल. मी मेल्यावर किंवा माझ्या वंशजांचा र्‍हास झाल्यावर माझ्या विचारप्रणालीचाही अंत होईल. पण या ऐवजी मी असा प्रचार सुरु केला की हि हिंसा आवश्यक आहे आणि त्याने देव प्रसन्न होतील किंवा लोकांचे धर्मांतर करणेच कर्तव्य आहे आणि धर्मांतरा साठी त्यांच्यावर राज्य करणे आवश्यक आहे आणि ती लोकं ऐकत नसतील तर त्यांना मारुन टाकणेच पुण्य कर्म आहे तर असली विचार प्रणाली शतकानुशतके टिकुन रहाते. आणि रंगमंचावर जशी पात्र बदलत असतात तसे सत्ता-पिपासु राज्य कर्ते किंवा धर्मांध जनता बदलली तरी इतरांवरचे अत्याचार चालूच रहातात.

युरोपातील राज्यकर्ते बदलत असले तरी पोर्तुगिज, स्पॅनिश आणि ब्रिटिश लोकांनी मांडलेला हैदोस जवळ-जवळ तीन शतके सर्रास चालूच होता. पुढेही तो चालूच राहिला असता पण युरोपीय लोक जिथे-जिथे गेलीत तेथील मूळ रहिवासी नामशेष झाले त्यामुळे अत्याचार करायला कोणी फारस उरल नाही. गुलाम म्हणुन आणलेल्या काळ्या लोकांचा तर अगदी २०व्या शतकातही छळ चालूच होता. मुसलमानी लोक ८ शतकापासून जग पादाक्रांत करायला निघालेत. ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी झालीत. जगाला दार-उल्-हब्र करणे हे पुण्यकर्म आहे हि समजुत असल्यामुळे राज्यकर्ते बदललेत, खलिफा नाहिसे झालेत तरी अत्याचार चालूच रहिलेत. दोन्ही घटनांमधील साम्य स्वधर्माचा आत्यंतिक आणि अनाठायी अभिमान, स्वधर्म प्रचाराची पराकोटीची ओढ आणि राजकारण व धर्म यातील पुसट रेखा ही आहेत. साम्राज्यवाद केवळ भूमी पादाक्रांत करून नैसर्गिक संपत्तीवर अधिपत्य गाजविण्यापूर्ती सिमित नव्हता. मूळ रहिवाश्यांना शारीरकरीत्या गुलाम करण्या सोबतच मानसिक रित्या गुलाम करण्याचा मुख्य उद्देश त्या मागे होता. आणि मानसिक गुलामगिरी धर्मांतराद्वारे करणे रास्त होते. १५ व्या व १६ व्या शतकात पोपचे अप्रत्यक्ष धिपत्य युरोपातील मोठ्या प्रदेशासोबतच अमेरिका खंडांवरही होते. खलिफा बनण्यासाठीची चढाओढ ही मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अधिपत्या गाजविता येण्यासाठीच होती. पण खलिफा पध्दती पोप संस्थेच्या तुलने तेवढी यशस्वी ठरली नाही.

गंम्मत अशी की प्रत्यक्ष साम्राज्यवाद नाहिसा झाला असला तरी धार्मिक साम्राज्यवाद तेवढ्याच तीव्रतेने चालू आहे. ख्रिश्चन पाद्री अजुनही अशिक्षित जनतेमागे धर्मांतर करण्याच्या कामात गर्क आहे. मुसलमान लोक अजुनही दार्-उल-हब्र ची स्वप्ने बघतात आणि जागो-जागी स्फोट घडवुन आणतात. हा जगात 'शांतता' पसरविण्याचा अभद्र आणि बिभित्स खेळ कधी संपणार आहे कोण जाणे?

No comments: