8/28/08

शिवाजींच्या शोधात

शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गैरसमाजाचे जणु गेल्या काही वर्षात पीक आलेले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा जो तो हवा तसा वापर करतो आणि वैयक्तिक फायद्यासाठी शिवाजींनी केलेल्या महान कार्याचा हवा तसा अर्थ लावतो. या भानगडीत मराठी लोकांचा मोठा हिस्सा आहे. याचा परिणाम असा झाला की ही महान व्यक्ति केवळ महाराष्ट्रापुर्तीच सिमित राहिली. या गैरवापराचे आणि गैरसमजाचे अनेक पैलु मला गेल्या काही वर्षात लक्षात येता आहेत त्या वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात मी करतो आहे. ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य भारताला 'यवन-तुर्कांच्या' पंज्यातून सोडविण्या साठी वेचले त्याच भारतात हा व्यक्ति आज महाराष्ट्रा पलिकडे चोर-लुटारू म्हणुन ओळखल्या जातो हे आपल्या मराठी पिढीचे अपयश आहे. उत्तर भारतात तर 'पवित्र' मुघलांविरुध्द लढण्याचा पातक जणु शिवाजींनी केलेले आहे या दृष्टीने त्यांच्याकडे बघितल्या जाते. याला ऐतिहासिक आणि ऐतिहासिक - राजकीय तसेच सांप्रत - राजकीय अशी अनेक कारण आहेत. ऐतिहासिक कारणांचा विचार आपण पुढल्या लेखात करुया आणि राजकीय कारणांचा विचार या लेखात कर या.

सुप्रसिध्द इतिहासकार श्री जादुनाथ सरकारांनी मी "द हाउस ऑफ शिवाजी" या पुस्तकाच्या शेवटी महाराष्ट्रा बद्दल फार सुरेख लेख लिहिला आहे. त्यांच्या मते गेल्या हजार वर्षाच्या गुलामगिरीत महाराष्ट्राची जमात जणु सूर्यासारखी भारतीय इतिहासावर वर झळकते. तलवार आणि लेखणी सातत्याने आणि तितक्याच कुशलतेने चालविण्याचा मान फक्त मराठी लोकांनाच जातो. शिवाजी महाराजांनी फुंकलेल्या स्वातंत्र्य रणदुंदुभीचे पडसाद टिळक-सावरकरांद्वारे आपल्याला वीसाव्या शतकातही ऐकु येतात. पण इंग्लीश सत्तेने भारतीय जनमानसाचा चेहरा-मोहराच बदलवुन टाकला त्यामुळे हे पडसाद महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतीयांना घोंगाट वाटु लागले. भारतीय विचारसरणी बदलली तरच भारत आपला खर्‍या तर्‍हेनी गुलाम होईल हे इंग्रजांनी बरोब्बर हेरले. त्यासाठी त्यांनी दोन आघाड्यांवर काम सुरु केले. एकतर भारतीय इतिहासाला वाट्टेल तसा आकार द्यायचा आणि दुसर म्हणजे भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल लाज वाटेल याची व्यवस्था करायची. या अंतर्गत शिवाजी कसा वाईट माणुस होता आणि त्याच हिंदु राष्ट्र कल्पना कशी खोटी होती. तो साधा चोर-लुटारू होता आणि अत्यंत स्वार्थी असा त्याने मुघलांशी टक्कर केवळ स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी केली इत्यादी धादांत खोट्या कल्पना आणि समजुती त्यांनी भारतीयांच्या मनावर बिंबविण्यास आरंभ केला. थोडक्यात शिवाजी महाराज हे सार्वभौम राजे नसुन मघली सत्तेत पुंडाई करणारा साधा सरदार होता हे भारतीयांच्या मनात बिंबविले की भारतीय जमात परकीय सत्तेविरुध्द उठाव करण्यास कशी असमर्थ आहे आणि परकीय सत्ते मुळेच आत्ता पर्यंत भारतीयांचा विकास झालेला आहे हे दर्शविणे सोपं जात. या प्रकल्पात इंग्रज बरेच यशस्वी ठरलेत. बहुतांश ऐतिहासिक पुस्तकात शिवाजींना हिन मानल्या जात. माझ्या वाचनात १८४० साली लिहिलेल्या कोण्या इंग्रज अधिकार्‍यानी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत आली. पुस्तक लहानस आहे आणि त्यात औरंगझेब कसा मुघल सत्तेच्या विनाशास कारणीभूत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्या पुस्तकातही शिवाजींना शूर म्हटल आहे पण शिवाजी केवळ चोर दरोडेखोर असेच म्हटले आहे. अमेरिकेत उपलब्ध असलेल्या (आणि माझ्या वाचनात आलेल्या) जागतिक इतिहासावर भाष्य करणार्‍या बहुतांश पुस्तकात शिवाजींचा उल्लेखही नसतो. मुघलांचा जरूर असतो. आणि मुघलांनंतर सरळ ती पुस्तके इंग्रजी सत्तेवर येतात. कहर म्हणजे मुघल सत्तेचा शेवट म्हणे १८५७ साली झाला अस सरळ सरळ सगळ्या पुस्तकात छापलेलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या विलियम डर्लिम्पेल यांनी लिहिलेल्या "द लास्ट मुघल" या पुस्तकाचा सूरही असाच आहे.

लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की ही सगळी पुस्तके इंग्रजीतच आहेत. मराठी लोकांवर अर्थातच याचा परिणाम झाला नाही पण उत्तर व पूर्व भारतात शिवाजींना चक्क चोर म्हटल्या जात ते या कारस्तवच. आणि जाब विचारला तर वर सांगितल्या प्रमाणे इंग्रजी पुस्तकांचा पुरावा दिल्या जातो. युरोप-अमेरिकेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच सोडा पण भारताच्या पहिल्या पंत-प्रधान नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात (द डिस्कवरी ऑफ ईंडिया") शिवाजींचा उल्लेख चोर-दरोडेखोर असा केला आहे. आत नेहरू शंख माणूस होता हा भाग निराळा मानला तरी पुस्तकात शिवाजींबद्दल असला लिहिण्याची त्यांची हिम्मत झालीच कशी? शिवकालीन इंग्रज आणि पोर्तुगिजांची पत्रांमधुन महारजांबद्दल लिहिल्या गेल्याचे सूर १८ व्या व १९ व्या शतकातील इंग्रज इतिहासकारांच्या पुस्तकांतुन उमटतात. या दरम्यान इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या किंवा इंग्लंडमधेय शिकलेल्या भारतीय मध्यम वर्गीय (महाराष्ट्रा व्यतिरिक्त) व्यक्तिंनी लिहिलेल्या पुस्तकातून परत तेच दिसते. त्यामुळे नेहरूंनी जे लिहिले ते नविन नव्हते फक्त त्या विकृत, नेभळट आणि शंढ विचारसरणीचे रोपटे नेहरू पुन्हा स्वंतत्र्य भारतात पुन्हा रोवत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांची पकड भारतीय इतिहासावर संशोधनावर अजगरासारखी आहे आणि भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल मुळीच स्वाभिमान वाटु द्यायचा नाही हेच या मिंध्या श्वान जातीच्या कम्युनिस्टांच लक्ष आहे. इंग्रजाची हि नीती भारतीय कम्युनिस्ट पुढे नेता आहेत हि परिस्थिती थोडी हास्यापद, फार घातकी आणि विकृत आहे. या गुलामगिरीच्या मनोरुग्णांनी शिवाजींना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून नामशेष केल किंवा एक साधा राजा ज्याने मुघलांविरुध्द लढा दिला यापूर्तीच त्यांना सिमित केल. त्यामूळे झाल काय की शिवाजींनी मुघलांविरुध्द लढा का दिला आणि त्यात त्यांचा तिळमात्र स्वार्थ कसा नव्हता हे महाराष्ट्रा पलिकडे कोणालाच कळत नाही. मराठा साम्राज्याच्या सीमा आज भारताच्या सीमा आहेत. याचा अर्थ शिवाजींचे भारतीय इतिहासात किती अधिक महत्त्व आहे हे महाराष्ट्रेतर जनतेला कळत नाही. पण हा भाग सांप्रत राजकारणत मोडतो आणि यावर आपण पुढल्या भागात चर्चा करु या.

शिवाजी महान होते यात काही वाद नाही. मग त्यांना सर्व भारतीयांसमोर महान सिध्द करण्याचा अट्टहास का हा प्रश्न उभा रहाण सहाजिक आहे. राजे सार्वभौम सत्तधीश होते. त्यांनी विशिष्ट कारणांस्तव स्वतःचा राज्याभिषेक केला. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मुळीच नव्हता. या अपूर्वाई ला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा मुसलमानी सत्तांविरुध्द लढा आणि मुख्यत्वे मुघलांविरुध्दच्या लढ्यामागे विशिष्ट विचार प्रणाली होती. त्यांच्या जन्माआधी उत्तर भारतीय उपखंड मुसलमानी सुलतानांचे पाय धुण्यात निपुण झाला होता तर दक्षिणी भारतात भाऊ-बंदकित व्यस्त आणि परकीय आक्रमकांनी घातलेल्या विध्वंसाशी विन्मुख होता. अश्या परिस्थितीत भारतीयत्वाचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी तलवार उचलली आणि जन-मानसात स्वाभिमान जागृत केला. गेल्या तीनशे वर्षात महाराष्ट्रात झालेल्या समाजोत्थनाचे मूळ महाराजच आहे. पण त्यांचे कार्य महाराष्ट्रापूर्तीच सिमित नाही ते कार्य संपूर्ण राष्ट्राची धरोहर आहे. आणि ही गोष्ट्र महाराष्ट्रेतर समाजास समजवण्यासाठी प्रयत्न करण्यात वावग काहीच नाही.

No comments: