वीणा-वादिनी वाग्देवीच्या चरणी। घालितो शब्दांचे लोटांगण॥ घेऊन पदरी शारदेने। करावे त्यांसी पावन॥
9/7/13
ता.क. - परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन
9/4/13
परदेशातील स्वातंत्र्यदिनी झालेले अंतर्मुख मन
माझा क्रिकेटशी संबंध फक्त क्रीक-इंन्फो वरील लेख वाचण्यापूर्तीच आहे. मी शेवटली पूर्ण मॅच सन २००३ च्य वल्ड कप ची बघितली असणार. भारत २०१२ विश्व चषक जिंकल्याच मला माहिती होत (मी फक्त तेंडुलकरची बॅटिंग बघितली आणि तो बाद झाल्यावर रागाने रिमोट फेकुन झोपायला गेलो!) पण त्या दिवशी बायको सोबत जेवायला गेलो होतो तर दुकानाच्या मालकाने जिलब्या आणुन दिल्यात, भारत विजयी ठरला म्हणुन. जणु काही त्याच्या घरच लग्न आहे या थाटात तो येणार्यांना जिलब्या वाटत होता. अमेरिकतल्या मोठ्या शहरांमधे तर जल्लोषाने हा क्षण मनविल्या गेला. हा वि़जय मनविणार्यामधली बहुतांश जन नुकतेच भारतातून अमेरिकेत दाखल झालेली आहेत. या लोकांच अजुनही भारतात जाण-येण होत असत, बहुतांशांची लग्नहि भारतातलीच. पण जी लोक साधारण २५-३० वर्षांपूर्वी अमेरिकेत आलीत त्यांचा आता भारताशी संबंध कमी होत गेल्याच दिसत. हि लोक दिवाळी जोरात साजरी करतात पण आता भारतातील घडामोडींशी त्यांचा फारसा संबंध नसतो. क्रिकेट, राजकारण इत्यादी विषयांवर खुप वर्ष अमेरिकेत राहिलेल्या भारतीयांना फारसा जिव्हाळा नसतो. आणि का असावा? आपण आता कायमचे अमेरिकेतच रहाणार आणि आपल्या पुढल्या पिढ्या सुध्दा अमेरिकेन असणार हि सत्याची जाणीव झाल्यावर भारत देशाशी संबंध तुटतो. मग मंदिर बांधुन, धार्मिक संस्था टाकुन परंपरा जपण्याचा आणि पुढल्या पिढीवर संस्कार बिंबविण्याचा प्रयत्न सतत केल्या जातो.
स्वातंत्र्य उत्सवाची मिरवणुक निघाली तर त्यात भारताचा झेंडा अग्रगण्य होता पण त्या सोबत गणपतीची आवश्यकता होती. जन-गण-मन सगळ्यांनी ताठ उभ राहुन गायल पण गणपती बाप्पा मोरया चा गजर त्याच्या मागोमाग झाला. स्वातंत्र्य उत्सव साजरी करणे म्हणजे भारत देश आणि भारतीय समाज याचा संगम होय. कालनीय उत्क्रांतीच्या पायर्या चढतांना परदेशी भारतीय हा सोनेरी दोराचा आधार घेतो एवढच.
भारत ही एक सतत बदलणारी व्याख्या आहे. कालचा भारत वेगळा होता आणि उद्याचा भारत फार वेगळा असणार पण भारताची एक प्रतिमा मनात बंद करुन नविन किनारे गाठणार भारतीय माणुस या समाजनिष्ठे मुळे सदैव भारतीयच रहाणार ही आनंदाची गोष्ट नाही का?
8/15/13
चुक-भूल देणे घेणे
8/6/13
पेशवाई आणि शिवशाही - एक संक्षिप्त आढावा (भाग १)
7/28/13
पेशवाईच्या सांन्निध्यात
मराठी दरबारात महाराजांनी कुठलेही पद वांशिक केले नव्हते. म्हणजे पंत-प्रतिनिधींचा वंशज त्याच पदावर बसेल असे नाही. हि प्रथा सर्वप्रथम छत्रपती शाहु महाराजांनी सन १७१२-१३ ला रूढ केली. बाळाजी विश्वनाथ भट या हुन्नरी, शूर आणि तल्लख डोक्याच्या माणसाला त्यांनी पेशवा बनविले. बाळाजी विश्वनाथ यांच्या पूर्वायुष्याची फारशी माहिती उपलब्ध नाही. पण मराठी राजकारणात आणि मुख्यतः मुघली सत्तेशी चाललेल्या संघर्षात त्यांनी तलवार आणि बुद्धी दोहोंचे पाणी दाखवले. सन १७१२ (१८?) चा दिल्लीचा तह ज्यात मुघल मराठ्यांचे मांडलिक झाले त्यात बाळाजी विश्वनाथांनीच मराठी दरबाराचे नेतॄत्व केल. सन १७२० ला त्यांच्या मृत्यु नंतर शाहु महाराजांनी त्यांच्या मोठ्या मुलाला - बाजीराव विश्वनाथ भट, पेशवेपद बहाल केल. या पेशव्याला आपण थोरले बाजीराव नावाने ओळखतो. पेशवाईची खरी सुरुवात थोरल्या बाजीरावांच्या काळात झाली अस म्हणायल हरकत नाही. मुत्सद्दीपण, अलौकीक शौर्य, माणस जोडण्याचा जन्मजात गुण आणि अविरत कष्ट करुन राज्य जोडण्याची वृत्ती बघता छत्रपती शिवजींचे खरे वंशज थोरले बाजीरावच. मराठा दरबाराची भरभराट, राज्यवर्धन, राज्याचा जरब आणि उत्कृष्ट प्रतीचे पुढल्या पिढीचे सरदार हे सगळ थोरल्या बाजीरावांच्या जमान्यतच घडल.
१७ व्या शतकातल्या मराठी रक्ताची रग अंशतः या काळात उतरली तर भारत खरच विश्वसत्ता बनेल.
पेशवाईतील काही घटनांवर विस्तृत लेखन करण्याचा मानस आहे. संधी मिळताच या कामाचा श्री करीन.
8/20/12
निवडक सुबोध ज्ञानेश्वरी - भाग १
महिन्याभरात मी चौथ्या अध्यायावर पोचलो. अर्थात हि कुठली शर्यत नव्हती पण माझ्या आवडीच्या काही निवडक ओव्या मी इथे प्रस्तुत करु इच्छितो.
तैसेच देवा मज झाले। हे मन भ्रान्तीने ग्रासले।
तरी कृष्णा तू करी विचार। योग्य तेच आम्हा सांग सत्वर।
तू गुरुबंधु पिता।तूच आमची इष्टदेवता।
जैसा शिष्याचा गुरुवर। सर्वथा न करी अव्हेर।
किंवा अपत्यास सोडून माता। जरी जाईल अच्युता।
तैसा सर्वतोपरी आम्हास। देवा तूच एक आहेस।
तरी आम्हास काय उचित। आणि जे नाही धर्मविपरीत।
---
--
(क्रमशः)
3/18/12
एका म्हातारीची गोष्ट
'एका म्हातारीची गोष्ट' ही माझी लघु-कथा अक्षर वांग्मय या साहित्यिक मासिकाच्या यंदाच्या अंकात प्रकाशित झाली. कुठल्या मासिकात प्रकाशित होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. श्री अरुण प्रभुणे आणि मासिकाचे प्रकाशक श्री नानासाहेब सूर्यवंशी यांचा मी आभारी आहे.
ब्लॉगच्या वाचकांनाही ही कथा आवडेल अशी मी आशा करतो.
कळावे. लोभ असावा.
आपला,
चिन्मय भारद्वाज
http://prabhune.com/ArunP/Arun.htm
=====
बुलढाण्याच्या दरिद्री रेल्वे स्टेशन दुपारच्या वेळी अस्ताव्यस्त लोळत पडल होत. सकाळच्या येणार्या गाड्या येउन गेल्या होत्या. दुपरच्या यायल थोडा अवकाश होता. थंडीच्या दिवसातल असुनही ते उन बोचत होत. सावली बघुन रुळांच्या खोबणीत काही कुत्री निवांत पहुडली होती. आलुबोंड्यांच्या ठेल्याला चिकटून एक म्हातारी शुन्यात नजर लाउन बसली होती. तीच्या मळक्या रखरखीत तळव्यांमधे दहा रुपयांची नोट कशीबशी तग धरून मिटलेली होती. ती अगदीच रिकामी होती. हातात एकही बांगडी नाही ना गळ्यात काही. कपाळही अगदी ठणठणीत. मांडीला टेकुन उभा असलेला खांदाभर उंचीचा दांडू सोडला तर तिच्याकडे काहीच नव्हत. तिची नजर जरी शुन्यात मग्न असलेत तरी मनात विचारांची घाई-गडबड उडालेली दिसत होती. अचानक ठेलेवाल्यानी "आलु....बों....डे.......!" अशी आरोळी मारली. ती म्हातारी अक्षरशः जागची हलली.
"का रे ५० मैलात एक गाडी नाही आणि तुझी परवाची बोंडे ती कुत्रीही सुंगणार नाही, हाका कोणाला मारतोस?"
त्या ठेलेवाल्याने दूर्लक्ष केल. धूळ झटकावी तस त्याने बोंड्यांवर फडक मारल आणि अजुन एक आरोळी मारत त्याने घसा खाकरला.
"मुंबई-नागपूर वेळेवर आहे का रे?"
"कुठली?"
"चार ची"
"हाओ" नागपूरी ठेक्यात त्याने हो म्हटल.
तिने प्लॅटफोर्म वरच्या मोठ्ठ्या घडळ्यावर नजर टाकली. चारला जेमतेम दहा मिनिटे होती. ती काठीचा आधार घेत उभी झाली आणि घाई-घाईनी आईस-क्रिमच्या ठेल्याकडे चालायला लागली. तो पर्यंत दूरून गाडीने पोंगा मारला. रुळावरची सगळी कुत्री गायब झाली होती. त्यांनाही टाईम-टेबल पाठ असाव.
"अरे एक आईस-क्रीम देतोस का रे?"
"कुठल?"
"गाडी येतेय रे लौकर दे" अस म्हणत तिने ती अर्धमेली नोट त्याच्या समोर झटकली.
"हो पण कुठल?"
"ते..ते वाल दे"
त्याने झाकण उघडुन तिच्या समोर आईसक्रिम ठेवल.
"अरे सील कशाला उघडलस. बंद वाल दे"
"आधी नाही का सांगायच"
"अरे माझ्या साठी नाही या रे. नातवासाठी आहे. उघडा डब्बा बघुन उष्ट आहे म्हणाला तर म्हणुन सील बंद हव."
तेवढ्यात प्लॅटफॉर्म वर गाडी लागली.
"लौकर दे रे"
"दहा रुपये द्या अजुन"
"अजुन दहा रुपये कसले?"
"दुसर्या डब्ब्याचे"
"अरे पण सील काढायला तुझ्या बा नी सांगितल होत का?" म्हातारी तापत बोलली.
"ये लेना है तो लो" तो पोरगा खेकसला.
तेवढ्यात दुकानाचा मालक आला.
"इसको बोलो सील-बंद डब्बा देने को" म्हातारी विनवणीच्या सुरात म्हणाली.
एव्हाना लोक गाडीतून उतरून इकडे-तिकडे फिरायला लागली होती. उत्सवमूर्ती आल्यावर जशी धांदल उडते तशी खाण्याच्या आणि सटर-फटर गोष्टी विकणार्यांची धावपळ चालली होती. सगळे ठेलेवाले बेंबीच्या देठापासुन बोंबा-बोंब करत होते.
मालकाने म्हातारीला बघुन मोठ्ठा उसासा टाकला आणि फ्रिज मधुन आईसक्रीम चा सील बंद डब्बा तिला दिला.
म्हातारी लगबगीने ते आईसक्रीम घेउन ट्रेनचे डब्बे पालथे घालायला लागली. तिचा जेमतेम एक डब्बा चालून होई तोवर ट्रेन हळु हळु पुढे सरकायला लागली होती. तिचे डोळे घाबरे झालेत. तिला अपेक्षित ते कोणीच दिसेना.
"सुरेश....अरे सुरेश" अश्या तिने मोठ्याने हाका मारायला सुरुवात केली.
बघता बघता ट्रेन दिसेनाशी झाली. थोडेफार उतरलेले पाहुणेही पांगलेत. स्टेशन घडी पूर्ववत घालावी तस पुन्हा पहिले सारख अस्ताव्यस्त पसरल.
म्हातारी हातात वितळणार्या आईसक्रीमचा डब्बा घेउन एकटीच पाठमोर्या ट्रेनला बघत उभी होती.
'ट्रेन चुकली असेल पोराची. पुढल्या गुरुवारी येइल नक्की' अस काहीस पुटपुटत ती दाराकडे चालू लागली. हातातल आईसक्रीम तिने कचर्याच्या ढिगात भिरकाउन दिल.
भिकार्याच्या पोरानी ते बघितल. त्या घाणीत उडी मारुन ते आईसक्रीम त्याने शोधल. त्या बरबटलेल्या जागेत फतकर मारुन त्याने ते तो मटकवायला लागला.