"हां, काय झालं हे नीट सांगा मला?"
"सकाळपासुन जीव घाबरतोय म्हणत होते. गॅसेस झाले आहेत म्हणालेत म्हणुन फारस लक्ष दिलं नाही. नेहमी सारख दुपारचं जेवले सुद्दा नाहीत. दुपारचा चहा घ्यायला बोलावलं तर खोलीतच धाडकन कोसळलेत. खुप जोराची धाप लागली होती. ताबडतोब घेउन आलो आपल्या दवाखान्यात. "
"आपण कोण यांचे? "
"मी यांचा मुलगा."
"ह्रदय रोगाची काही पूर्व तक्रार. आधीच्या डॉक्टरांनी लिहुन दिलेली काही कागद पत्र? "
"आज सकाळ पर्यंत चांगले ठणठणीत होते. आज पर्यंत कधी डॉक्टरांकडे वारी झाली नाही यांची."
"अच्छा. हार्ट-अटॅक आहे. नशीबच आहे कि एवढ्या अटॅकने सुद्धा वाचलेत ते. तुम्ही काळजी करु नका. अन्गीओप्लास्टी करावी लागेल. बहुतांश वेळा रुग्ण या प्रक्रिये नंतर बरा होतो"
"बरं." पण साहेब तुम्ही तर अजुन त्यांना नीट तपासले सुद्दा नाहीया. टेस्ट सुध्दा झाल्या नाहीयात"
"भिंतीवर जे प्रमाण पत्रक दिसतय त्यावर कोणाचे नाव आहे?"
" आपले"
"मग, ऐका मी काय उपचार सांगतोय ते. आज संध्याकाळी करु शकतो मी शस्त्रक्रिया. पन्नास हजार खर्च येइल."
"पण साहेब, लौकरात लौकर शस्त्रक्रिया केलेली बरी नाही का?"
"आत्ता टेबलवर पन्नास हजार ठेवा. मी ताबडतोब करतो शस्त्रक्रिया"
"एवढे पैसे कुठुन आणु मी एकदम".
"तुमची पैशांची सोय झाली की कळवा. आणि पन्नास हजार फक्त शस्त्रक्रियेचे लागतील. त्यांतर ई.क.उ. मधे ठेवण्याचे वेगळे व औषधांचे ही वेगळे"
"तरी साधारण खर्च किती येइल"
"एकुण खर्च एक ते दिड लाखाच्य घरात जाईल"
"साहेब, स्वतःला विकायला काढल तरी एवढे पैसे मिळणार नाही"
"अहो, शासकीय रुग्णालयात सुद्दा उपचार होतात. तिथे दाखल केले तरी चालेल"
"अस नका म्हणु. आपले फार नाव ऐकलय. हे २२००० ठेवा व लौकरात लौकर शस्त्रक्रिया करा. मी संध्याकाळ पर्यंत उरलेल्या पैशांची सोय नक्की करतो"
-- -- -- -- -- -- --
"डॉक्टर साहेब, कशी झाली शस्त्रक्रिया?"
"यशस्वी झाली. पण पुढले २४ तास थोडी काळजी आहे. हे २४ तास गेलेत म्हणजे झाले."
"म्हणजे पुढल्या २४ तासात जीव जाउ शकतो"
"शस्त्रक्रिया जरी मी करित असलो तरी कर्ता-करविता वरचा आहे"
"बरोबर आहे तुमचं. सकाळपासुनच घरचा गणपती पाण्यात कुडकुडतोय."
"बरं, उरलेले पैसे भरुन टाका लौकर."
"पैसे कुठे पळुन जातायत साहेब. बसा शांतपणे. थोडं खाजगी बोलायच होत"
"म्हणजे" डॉक्टर साहेब बुचकळयात पडलेत. " अहो, अजुन बरीच रुग्ण आहेत या दवाखान्यात" ते थोड खवचट पणे म्हणालेत.
"माहितीय साहेब. पण हा कागद वाचता का जरा?"
कागद वाचुन डॉक्टर साहेबांचा चेहरा पांढरा फटक पडला.
"पाणी मागवु का साहेब?"
"आं....म्हणजे...."
"एक काळ होता की लोकं डॉक्टरांना देव मानित असतं. पण आता स्मशानातला जल्लाद बरा. पैश्यांसाठी मागे लागतो पण मुडदा तरी नीट जाळतो. वडीलांचा सकाळी घरीच मृत्यु झाला. शासकिय रुग्णालयात घेउन गेलो होतो तरी पण तेथे डॉक्टरांनी मृत्यु-पत्रक दिले. पण वडिलांच्या आजारपणात डॉक्टर या जमातीने आम्हाल इतके लुटले कि म्हटल कि हि लोकं अजुन कुठल्या थरा पर्यंत जाउ शकतात हे तरी बघु. पण खरच सांगतो कि तुम्ही माझ्या अपेक्षेपेक्षा ही वरचढ ठरलात. मेलेल्या व्यक्तिला तुम्ही केवळ दाखल नाही केल तर त्या मढ्यावर शस्त्रक्रिया करण्याच ढोंग ही केलत. "
भिंतीवरच प्रमाण पत्रक शेवटच वाचुन घ्या. कारण आता ते लौकरच जप्त होणार आहे."
"अहो असं नका करु. इतक मोठं रुग्णालय चालविणे म्हणजे गंमत नाही. तसच मी बर्याच रुग्णांना विनामुल्या उपचार देतो. मग पैशांची चणचण भागवायला असलं काही करावं लागत. कृपया पोलिस कडे जाउ नका. आपण यातुन काही तरी मार्ग नक्कीच काढु शकतो."
"दहा लाख रुपये नगद तुम्ही टेबलवर ठेवलेत कि माझे वडिल अंतिम संस्कारास मोकळे" क्षणार्धात समोरुन उत्तर आले.
डॉक्टर साहेब चकितच झाले. काय चाललय हे डॉक्टर साहेबांना कळेनासे झाले. पण त्यांनी बँकेला घाईने फोन फिरवण्यास सुरुवात केली.
(अंशतः सत्य घटनेवर आधारित.)
2 comments:
sundar post chinmay!!
एक काळ होता की लोकं डॉक्टरांना देव मानित असतं. पण आता स्मशानातला जल्लाद बरा. पैश्यांसाठी मागे लागतो पण मुडदा तरी नीट जाळतो. ...
You said it...aksharshaha khara ahe...meDical Daku sale!!!
Post a Comment