नामजोशी बाईं त्यांच्या शिकवणसाठी निवडक विद्यार्थ्यांनाच घेत असत. शिकवणीतील सर्व विद्यार्थी हे पहिल्या ईयत्तेपासुनच मराठी माध्यमातुन शिकलेले होते पण नामजोशी बाईंची मराठी विषयावर इतकी जबरदस्त पकड होती की मराठी म्हणजे नक्की काय याचा गंध वर्गातील बहुतांश विद्यार्थ्यांना १०वीच्या वर्गाता पहिल्यांदा लागत होता. नागपूरातील प्रतिष्ठित सोमलवार शाळेत त्यांनी तीस वर्षे शिकविले होते. तसेच सोमलवार शाळेच्या रामदासपेठ शाखेच्या त्या मुख्याध्यापिका पण होत्या. स्पष्ट-वक्त्या आणी शिस्तबध्द या साठी प्रसिध्द असलेल्या मॅडमच्या करारी स्वभावाला शाळेतली अत्यंत नाठाळ आणी उनाड मुल ही घाबरायची. पण त्या जेंव्हा मुख्याध्यापिका होत्या तेंव्हा सध्याच्या शिकवणीतील विद्यार्थि प्रार्थमिक शाळेत शिकत असतील. त्यामुळे नामजोशी बाईंचा दरारा त्यांनी केवळ ऐकला होता, अनुभवला नव्हता. बाईंच वय सत्तरीच्या घरात होत पण शिकविण्याची उर्मी अजुन गेली नव्हती. म्हणुन त्या अजुनही शिकवणी घेत असत.
शिकवणी कधी घरातील बाहेरच्या खोलीत व्हायची तर कधी दुसर्या माळ्यावरी गच्चीच्या शेजारच्या खोलीत होत असे. आज दुसर्या माळ्यावर वर्ग भरला होता. त्या गच्चीच्या कडे जाणार्या दरवाज्या जवळ बसायल्या होत्या व विद्यार्थी त्यांच्या समोर खुर्च्या टाकुन बसले होते. त्यांचे घर वर्धा रोडला तोंड करुन होते. त्यामुळे त्या जीथे खुर्ची टाकुन बसल्या होत्या, त्याच्या मागे दरवाज्यातुन रस्त्यावरची वर्दळ व्यवस्थित दिसत होती. त्या दिवशी बाई थोड्या तापल्या होत्या. काही घरगुती कारणांनी तापल्या असतील. शिकवणीच्या आरंभीच खोलीत मागे बसणार्या व इतर विद्यार्थ्यांच्या पाठी मागे लपणार्या थत्ते ला रागवुन झालेल होतं. त्यामुळे खोली चिडिचुप होती.
बाईंच्या अगदी समोर आज नाईक बसला होत. 'अ' तुकडीत शिकणारा नाईक हा हुशार विद्यार्थी होता. आज बाई एक कठीण धडा शिकवित होत्या. या धड्यावर निदान एक प्रश्न तरी बोर्डाच्या परिक्षेत येत असे पण पाच पैकी तीन प्रश्नच सोडवायचे असल्यामुळे या कठीण धड्यावरील प्रश्न सोडला तरी चालत असे. धडा कळण्यास कठीण जात असेल तर उगाच त्याचे प्रश्न सोडवण्याचा उपद्व्याप करु नका असे बाईंनी आधीच सांगितले होते. नाईकच्या कानात हे एवढच वाक्य फसल कि पोटभर जेवल्यामुळे त्याला सुस्ती आली होती कि त्याला खरच धडा कळत नव्हता हे कळण्यास मार्ग नाही पण तो बाईंच्या अगदी समोर बसुन दरवाज्यातुन बाहेरची वर्दळ मोठ्या तन्मयतेने बघत होता. बाईंनी एक-दोनदा नाईक कडे रोखुन बघितले पण नाईक रस्त्यावरुन जाणार्या म्हशींचा कळपात 'रमला' होता. बाई खुर्चीवर पाय वर घेउन बसत असत. त्यांनी पाय खाली सोडलेत व थोड्या समोर वाकुन त्या शांतपणे म्हणाल्या "नाईक, किती म्हशी आहेत रे कळपात?"
ज्यांना धडा कळत नव्हता त्यांना वाटायला लागले कि 'अच्छा धड्यात म्हशी पण आहेत!'। ज्यांना धडा कळतो आहे अस वाटत होते, ती मुले धड्यामधे म्हशी शोधायला लागलीत पण नाईक मात्र बर्फासारखा गार पडला. "अरे, इतक लक्ष देउन बाहेर बघत होतास तर म्हशी तरी मोजायच्या होत्या" आता वर्गातील मुलांना काय चाललय हे लक्षात आले. "नाही मॅडम, मी बाहेर बघत नव्हतो" नाईकने आपली बाजु मांडायचा बुळबुळीत प्रयत्न केला. "नाईक, तीस वर्ष झाली मी शिकवतेय. माझ लक्ष होत तुझ्याकडे आणि त्यातुन तू मुर्खासारखा माझ्या नाका समोर बसुन बाहेर बघत होतास" बोली भाषेत सांगायच तर नाईकची आता चांगलीच 'सटारली' होती. " तु तुझ नशीब मान की मी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे आणी तु माझ्या हाताच्या लांबी पासुन दूर बसला आहेस ते. नाही तर माझ्या हाताची पाचही बोटे तुझ्या गालावर आत्ता पर्यंत उमटली असती" हे ऐकुन खर सांगायच तर वर्गातल्या प्रत्येक मुलाचीच आता सटारली होती.
जणु काही घडलच नाही अश्या भावात बाईंनी शांतपणे पाय खुर्चीवर घेतलेत व परत धडा शिकवायला सुरुवात केली. ज्यांना धडा कळत नव्हता ती मुले आता अगदी सगळं कळतय असा आव आणुन माना डोलवायला लागलीत. नाईकला बराच घाम आला होता. रस्त्यावरच्या म्हशी हि कधीच पुढे निघुन गेल्या होत्या.
त्या दिवसानंतर नाईक कधीही बाईं समोरच्या खुर्चीवर बसला नाही.
No comments:
Post a Comment