8/12/25

आक्रोश - भाग २ (आक्रोश म्हणजे नेमके काय करायचे?)

भारतात पहिला मुसलमानी हल्ला इस्लाम धर्माच्या स्थापने नंतर काही दशकातच झाला. एक तर दक्षिणेत केरळ मध्ये अरब मुसलमान व्यापारी पोचले होते. म्हणजे, जे अरब व्यापारी केरळ मध्ये येतच होते, ते आता मुसलमान झाले होते. पण त्यांनी काही केरळ पादाक्रांत केले नाहीं. भारतीय उपखंडात इस्लामने घातलेल्या विध्वंसाची सुरुवात  मोहम्मद बिन कासीम नावाच्या अरब आक्रमकाने केली. कासीम ने सिंध प्रांतावर हल्ला केला आणि लूट-पाट केली. त्या नंतर सिंध, पंजाब, सध्याचे अफगाण येथील हिंदू राजांनी सातत्याने होणाऱ्या अरब इस्लामी आक्रमणांचा यशस्वी प्रतिकार तब्बल पाचशे वर्षे केला. अरब आणि इस्लाम भारतात येऊ शकला नाहीं. पण थोडा थोडा भूभाग हिंदू राजांच्या हातातून जाऊ लागला. घुर प्रदेश, जो मध्य अफगाणिस्तानात आहे, तो मुसलमानी होत गेला. पुढे मोहम्मद घोरी हा याच प्रदेशातून दिल्ली वर चालून आला होता. खोकर हे हिंदू राज्य सिंध-पंजाब-अफगाणिस्तान भागात पसरले होते आणि खोकर हे अगदी पुरातन काळापासून या प्रदेशाचे आहेत. खोकर हिंदू राजाने आक्रमक मुसलमानांचा अत्यंत प्रखर प्रतिकार केला आणि अनेक शतके भारत सुरक्षित ठेवला. अगदी मोहम्मद गझनी ने सुद्धा नमूद केले आहे कि हिंदुस्थान जिंकायला खोकर जाट यांना हरवणे आवश्यक आहे पण अति कठीण आहे. खोकर जाट योद्धे हे एक उदाहरण झाले पण पृथ्वीराज चौहानच्या पराजयापर्यंतच्या पाच शतकात अनेक राजे, राज्य आणि अगणित हिंदू योद्ध्यांनी हिंदू धर्म आणि भारत सुरक्षित ठेवला. 

पण तरीही शेवटी  इस्लामी राज्य दिल्लीत मुसलमानी शासक कसे स्थापन झाले? बरं, एकच सत्ता नव्हती. अनेक आक्रमक सत्ताधारी झालेत. कुतुबुद्दीन ऐबक, लोधी, खिलजी, घोरी, गझनी, बख्तियार, इल्तुमिश, काफूर, तैमूर आणि शेवटी खालच्या रक्ताची मोघल, अशी असंख्य मुसलमानी सुलतान आलेत. त्यांनी आपापसात युद्ध केलीत, गळे कापलेत, पण जेंव्हा विक्रमादित्य हेमू दोन वर्षासाठी दिल्ली चा राजा झाला तेंव्हा सगळे मुसलमान एकत्रित आलीत आणि हेमूला मारले. आपापसातली भांडणे बाजूला ठेऊन दक्षिणेतील सगळी मुसलमान एकत्रित आलीत, विजयनगरचा सर्वनाश करायला. विजयानगरच्या शेवटच्या रामराजाने एका मुसलमानाला सेनापती म्हणून पण नेमला होता. त्या मुसलमान सेनापतीनेच ऐन युद्धात रामराजाचा गळा कापला आणि मुसलमानी सत्तांना विजय मिळवून दिला. अशी असंख्य उदाहरणे आहेत. पण नेमके असे का होत आले आणि अजूनही का होते आहे? 

मुसलमानांची हि कार्यपद्धती फार सूचक आहे कारण त्यांचे अंतिम लक्ष, निदान त्यांच्या साठी तरी, अत्यंत स्वच्छ  आहे. इस्लाम धर्माचा विजय, म्हणजे इस्लामेतर धर्माचा संपूर्ण, अगदी मुळापासून, सर्वनाश. आणि इतर धर्मियांनी एकतर इस्लाम स्वीकारायचा आणि नाहीं तर एक तर त्यांना मारायचे किंव्हा गुलाम म्हणून विकायचे. आणि जर का कुठे मुस्लिम समाज संख्येने कमी असेल तर बहुसंख्य होईपर्यंत वाट्टेल त्या मार्गाने खट-पट करायची आणि ज्या क्षणी बहुसंख्य झालेत, इतर धर्मियांची दुर्दशा सुरु. याची संपूर्ण कल्पना आपल्या पूर्वजांना होती. म्हणूनच त्यांचा लढा स्वच्छ होता. शिवाजी महाराजांच्या (पत्र-व्यवहाराच्या) भाषेत 'यवन-तुर्क' यांना हाकलाणे होते. धर्म संस्थापन होते. विजयानगर असो किंव्हा चोला असो किंव्हा वूडीयार असो कि केरळ चे मार्तंड वर्मा, हि सगळी राज्ये आणि राजे गर्वाने हिंदू होते. ज्या काळात, मुसलमानी सत्ता मोरक्को ते मलेशियापर्यंत पसरली होती. हिंदू जनता जिझिया देत होती. आणि मुसलमानी राजे हिंदूंना तुच्छ, निम्न मानीत, त्या काळात हे राजे हिंदू धर्माचे सरंक्षण आणि संवर्धनास तत्पर होते. मग १९४७ नंतर उर्वरित भारतात हिंदू बहुसंख्य असून आपण आपल्या धर्माची एकतर लाज बाळगतो किंव्हा केवळ मंदिरांच्या वाऱ्या करून वेळ घालवितो. यातून स्वाभिमान, सशक्तीकरण, किंव्हा ज्ञान यातील काहीच निर्माण होत नाहीं. म्हणूनच आपल्या डोळ्यासमोर काश्मीर प्रदेशातून हिंदू निर्वंश झालेत पण त्याची प्रतिक्रिया फारशी उमटली नाहीं. 

हा सगळं इतिहास पुन्हा इथे मांडून काय साधायचा आहे? हा सगळं इतिहास गूगल वर उपलब्ध आहे. लाइब्ररीत शेकडो पुस्तके या विषयावर मिळतील. आणि खूप साऱ्या लोकांना थोडा बहुत का होईना हा इतिहास माहिती पण आहे. पण लोक मानसात हा इतिहास लुप्त आहे. उर्दूत जेहेन शब्द आहे. जेहेन चा अर्थ मन. हिंदू जनतेच्या जेहेन मध्ये हा इतिहास नाहीं. कारण हा इतिहास मनी रुजला असेल तर कृतीतून तो विचार प्रस्तुत होईल. तसे होतांना दिसत नाहीं. 

इस्लाम धर्मियांच्या अगदी विरुद्ध आपली - हिंदूंची कार्यप्रणाली आहे. आणि मुख्यतः, भारतीय स्वातंत्र्य नंतर तर हिंदू लोक जणू गुंगीचे औषध घेऊन लोळतायत. मला वाटतं कि खोकर लढवय्यांपासून तर मराठा साम्राज्यापर्यंत हिंदू समाज आणि राज्यकर्ते या आक्रमकांना ओळखून होते. म्हणूनच इतक्या अमानुष आक्रमणानंतर आणि अनन्वित धार्मिक अत्याचारांनंतरहि भारतीय उपखंड हिंदू बहुसंख्यच होता. पण १९३० नंतरच्या राजकीय नेत्यांनी भारताची फाळणी करून पहिल्यांदा भारतीय उपखंडात असे प्रदेश निर्माण केले जिथे हिंदू अल्पसंख्य झालेत. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान, म्हणजे पुढचा बांग्लादेश, येथे लगेच जणू हिंदू-द्वेष्टे मध्य युगीन इस्लामी सुलतान पुन्हा उदयास आलेत. पाकिस्तानमध्ये सन १९४८ ला २०% हिंदू होते. आज १% उरले आहेत. पळवून लावलेत, उरलेल्यांना मुसलमान केले आणि बाकीच्यांना मारून टाकले. पण हिंदूंना ठेवले नाहीं. सिंधू नदीच्या पात्रात गेल्या पाच हजार वर्षात पहिल्यांदा कोणी हिंदू स्नान करायला उरला नाहीं. बांग्लादेश मध्ये हिंदू संख्या अशीच झपाट्याने कमी होत गेली आहे. थोडक्यात, आपल्या डोळ्यासमोर भारतीय उपखंडातील एक तृतीयांश भागात हिंदू नाहीस झालेत. तरी भारतीय हिंदू इस्लामला सर्वधर्म समभाव सारख्या अत्यंत वाह्यात विचारसरणीचा आधार घेऊन खो देतात. 

हिंदू जनतेने धर्म वाचवायला काय करावे? मंदिरे, आरत्या, सण-वार, मंत्र-श्लोक यांच्यात काही अर्थ नाहीं. जर का इतिहास माहिती नसेल तर. धर्माची लॉकेट, टॅटू यांच्यात काही अर्थ नाहीं जर का इतिहास माहिती नसेल तर. आपला धर्म वाचवायचा असेल तर इस्लामचा नीट अभ्यास करायला हवा. मग त्यामुळे आपल्या धर्माचा अभ्यास काही काळ नाहीं केला तरी चालेल.  इतिहास नुसता वाचायचा नाहीं तर आत्मसात करायला हवा. कृतीतून काही सिद्ध व्हायला इतिहासाचे चिंतन, मनन आणि ध्यान करायला हवे. एकत्रित होणे आणि घोळका करण्यातला हा महत्वाचा फरक आहे. पाठ्यपुस्तकात इतिहास शिकविला जात नाहीं इत्यादी वायफळ बकवास बाजूला ठेवा. शिवाजी महाराजांना किंव्हा त्यांच्या मावळ्यांना काही CBSE अभ्यासक्रम नव्हता इतिहास शिकायला. हरिहर-बुक्का यांना दिल्ली ला नेऊन मुसलमान केले होते. ते तिथून पळून पुन्हा दक्षिणेत आले आणि विजयानगरची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी इतिहासाची डिग्री घेतली नव्हती. स्वाभिमान, स्वधर्माभिमान आणि आत्मविश्वास शिकायला पाठ्यपुस्तके किंव्हा कोर्सेस ची आवश्यकता नाहीं. 

भारताला स्वातंत्र्य राजकीय दृष्टीने मिळाले आहे पण ऐतिहासिक स्वातंत्र्य लाभले नाहीं. तैमूर, घोरी, गझनी, खिलजी आणि अकबर-औरंग्या आता नव्या रूपाने पाकिस्तान-बांग्लादेश मध्ये पैदा झाले आहेत आणि आपल्या सीमेवर पुन्हा आक्रमणे करायला तयार आहेत. आपले अस्तित्व, आपली संस्कृती, आपली विचारसरणी, आपले कौशल्य, आपले तत्वज्ञान, आपला इतिहास, आपल्या वास्तू, आपले शिल्प, आपले देव, आपला धर्म नामशेष करायला ते अजूनही सरसावले आहेत. त्यांनी लढा चालू ठेवला आहे. आपला interval च संपत नाहीं या! 

घरा-घरातून हा इतिहास जिवंत ठेवायला हवा तरच पुढल्या पिढीला तो नमूद होईल. या पिढीने छोटीशी का होईना पावले उचललीत तर पुढली पिढी अजून पुढे जाईल. आणि मग ऑप सिंदूर सारखे जिंकलेली बाजी पुन्हा हरणार नाहीं. 

---

संदर्भ:

मोहम्मद बिन कासीम चे सिंधवर आक्रमण:

https://en.wikipedia.org/wiki/Arab_conquest_of_Sindh

केरळमध्ये इस्लाम:

https://www.newindianexpress.com/cities/kochi/2024/Jul/11/unravelling-keralas-islamic-history 

खोकर जाट आणि त्यांचा प्रखर लढा

1) https://rootshunt.com/aryans/aryankingsandcountriesinkurukshetra/kukkur.htm

2) https://historyfinder.in/sultanate-of-delhi/

3) https://www.clearias.com/muhammad-ghori/

4) https://jatchiefs.com/history/

         5) https://www.amazon.in/Heroic-Hindu-Resistance-Muslim-Invaders/dp/8185990182

विक्रमादित्य हेमू आणि पानिपतचे दुसरे युद्ध

https://en.wikipedia.org/wiki/Second_Battle_of_Panipat

हरिहर राय आणि बुक्का राय, विजयनगरचे साम्राज्य, तालिकोटची लढाई आणि राज रामरायाचा त्याच्या मुस्लिम सैन्याकडून झालेला शिरच्छेद

1) https://satyashodh.com/britishhistoriansandtragedyofindia.htm

2) https://goa.pscnotes.com/history-booster/kingdom-of-vijaynagar-2/

3) https://ijcrt.org/papers/IJCRT1033073.pdf

4) https://serialsjournals.com/abstract/75050_ch_6_-_ashwin_srinath.pdf

केरळ चे राजा मार्तंड वर्मा, आणि  त्रावणकोर राज्य 

1) https://unacademy.com/content/railway-exam/study-material/ancient-history-of-india/a-short-note-on-the-state-of-travancore/

2) https://testbook.com/ias-preparation/battle-of-colachel

पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदू लोकसंख्या

1) https://www.nytimes.com/2020/08/04/world/asia/pakistan-hindu-conversion.html

2) https://www.newslaundry.com/2015/01/09/the-vanishing-hindus-of-pakistan-a-demographic-study-2

--

ता.क. - इतिहास केवळ तारखा, युद्ध आणि करार नसतात. किंव्हा इतिहास म्हणजे केवळ घटनांचा कालक्रम म्हणूनही वाचायचा नसतो. इतिहास एकमार्गी आणि एक दिशेने वाचला तर माहिती मिळेल पण आकलन होणार नाहीं. इतिहास चौफेर वाचून तो प्रतिसाद आणि पडसादांच्या दृष्टिकोनातून समजायला हवा. उदाहरणार्थ. औरंग्याने महाराजांचा अवमान केला हि घटना झाली. आणि ती सन १६६६ ला झाली हा कालक्रम झाला. पण त्याचे परिणाम काय झालेत? हा इतिहास झाला. सन १७३९ ला नादीरशहाने दिल्लीवर हल्ला केला आणि तीस हजार कवट्यांचा ढीग रचला हि घटना झाली. पण पुन्हा असा संहार होऊ नये म्हणून अहमदशहा दुर्रानी किंव्हा अब्दाली ने पुन्हा दिल्लीवर स्वारी केली तेंव्हा मराठे धावून दिल्लीच्या रक्षणास गेले हा इतिहास झाला. इतिहास असा समाजाला कि वर्तमान कळण्यास मदत होतेच पण त्यासोबत भविष्याबद्दल माहितीबंध आराखडा मांडल्या जाऊ शकतो. उदाहरणार्थ,  १९४७ची फाळणी हि एक घटना झाली. धर्माच्या जोरावर पाकिस्तान बनविले. बहुतांश हिंदूंना (पश्चिम पाकिस्तानातून) हद्दपार केले पण त्या तुलनेत भारतातील मुसलमान फारसे भारत सोडून गेले नाहीत. त्यामुळे आज एक तृतीयांश भारतीय उपखंडात हिंदू नगण्य आहेत पण संपूर्ण भारतीय उपखंडात मुसलमान सगळीकडे आहेत, हे भविष्य निश्चित झाले.