महाराष्ट्र नव-निर्माण सेना सध्या महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर वादळ उठवित आहे। विवाद नविन नाहीत व त्यावरचे निदान 'ढ' पणाची लक्षणे आहेत. आपल्या समाजात सध्या कुठलाही विवाद चूक किंवा बरोबर याच दोन दृष्टीकोनातून बघण्याची पध्दत रुढ आहे. काही विवाद जरी या पठडीत मोडत असले तरी बरेचशे मुद्दे चूक किंवा बरोबर यामधील लक्ष्मण रेषेत वावरतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले दंगे-धोपे निषेधार्थ आहेत यात काही वाद नाही. गजबजलेल्या राजकीय पडद्यावर आपल्या पक्षाची केवळ जाहिरात करण्या हेतु कोणी जर सामाजिक संपत्तीचे नुकसान करत असेल किंवा कोणास जीवे मारत असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना सरळ कारागृहाचा रस्ता दाखवायला हवा. अर्थात, दु:खदायक गोष्ट ही की अनेकदा या पध्दतीचा वापर आपल्या समाजात झाला आहे. व कारागृह तर दूर पण आपल्या समाजाने असल्या राजकीय नेत्यांना निवडुन सुध्दा दिले आहे.
महाराष्ट्र गेले साठ वर्ष औद्योगिकीकरणात आघाडीवर आहे। सुरुवातीला मुंबईचा महाराष्ट्राला प्रचंड फायदा झाला. पण पुढे मराठी नेते मंडळीने पश्चिम महाराष्ट्रात औद्योगिक विकास कौतुकास्पदरित्या केला. सध्य परिस्थितीत महाराष्ट्रात मुंबई व्यतिरिक्त पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि थोड्या बहुत प्रमाणात नागपुर अशी विकसित औद्योगिक केंद्रे आहेत. उच्च शिक्षणासाठी तर महाराष्ट्रासारखे राज्य अजुन कुठे सापडणार नाही. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सरकारी यंत्रणा सुरळीत चालते व बहुतांश ठिकाणी रात्री ११ नंतरही पोरी-बाळी घराबाहेर हिंडु शकतात. स्त्री-मुक्ती व दलितांची प्रगती या बाबतीतही महाराष्ट्र आघाडीवरच आहे. थोडक्यात, इतर राज्यांच्या तुलनेत (गुजरात वगळता) महाराष्ट्रात नोकर्या आहेत, सुरक्षितता आहे व सामान्य जनांसाठी कष्ट करुन पुढे जाण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. अजुन काही कमी असेल तर मुंबई हे हिंदि चित्रपट उद्योगाचे केंद्रस्थान आहे त्यामुळे इतर राज्यातुन जर का महाराष्ट्रात येणार्या लोकांची रीघ लागत असेल तर त्यात नवलाईची गोष्ट काही नाही.
लोकतंत्राच्या अंतर्गत भारतीय कुठल्याही राज्यात जाउन स्थायिक होउ शकतात। त्यामुळे बिहार मधुन कोणी मुंबईस येत असेल तर तसे करणे त्या व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांतर्गत मोडते. तसेच या स्थलांतरास विरोध करणे ढेकुण पणा तर आहेच पण त्यापेक्षाही अधिक असली विचार सरणी ही भारत-विरोधी मानायला हवी.
अर्थात, दिसत तसं नसत म्हणुनच जग फसत। गोष्टी इतक्या सोप्या असत्या तर राज ठाकरेंना कोणाचाही पाठींबा मिळाला नसता. अजुन निवडणुका दूर आहेत पण माझ्या मते हे असले सगळे धिंगाणे करुनही त्यांना बर्यापैकी जागा मिळतील. कारण त्यांनी उठविलेले मुद्दे विचार करण्यायोग्य नक्कीच आहेत. फक्त त्या मुद्द्यांचे निदान मूर्खपणाचे आहे. बिहारी लोक मुंबईत येउन हिंदी अवश्य बोलु शकतात पण त्यांनी मराठी शिकण्याचा किंवा समजण्याचा प्रयत्न करायलाच हवा. त्यांनी छट पुजा दादर मधे करायला हवी पण गणेश उत्सवात तेवढाच भाग घ्यायला हवा. आणि बहुतांश प्रमाणात अस होत याची मला खात्री आहे. पण राज ठाकरें सोबतच समाजवादी पक्षा सारख्या मतांचा धंदा मांडणारे पक्ष पाणी गढुळ करुन टाकतात.
माझ्या संकेतस्थळावर मागे मी "मराठी माणुस कुठे हरवला?"* हा लेख मी प्रकाशित केला होता. ते मुद्दे या विषयाशी निगडित आहेत. पण जर का एवढा कामसु असुनही मराठी माणुस कुठे दिसत नसेल तर त्याला कारणीभूत मराठी माणुसच आहे. मराठी भाषेचेच उदाहरण इथे घ्या. सुशिक्षित मराठी कुटुंबे आपल्या पोरांना इंग्लिश मिडियम मधेच पाठवतात. इंग्लिश मिडियम मधे शिकलं म्हणजे मराठी भाषेचा "भूक लागली" हे सांगण्या पलिकडे फारसा उपयोग रहात नाही. या पिढित मराठी साहित्या बाबत एकुण प्रचंड उदासिनता आहे. साहित्य म्हणजे कथा कादंबर्याच नव्हे तर ज्ञानेश्वर महाराजांपासुन ते पु.ल. देशपांड्यापर्यंत मराठी अनुभवांचा खजिना जणु या इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना बंद होतो. हा पाया नाहिसा झाला की मराठी इतिहासाबद्दल फारस वाटेनासं होत. शिवाजी महाराज केवळ पुतळ्यांपूर्ती व प्रत्येक शहरात असलेल्या शिवाजी नगरांपुर्तीच सिमित रहातात. आता या परिस्थितीस कोण जवाबदार आहे? मराठी माणुस अमेरिकेत कोण अजुन मराठी व्यक्तीस भेटला तर तो इंग्लिश मधेच बोलतो हे मी स्वतः अनुभवल आहे. आता याला कोण जवाबदार? बिहारी?.
या सगळ्या मुद्द्यांचा सारासार विचार राज ठाकर्यांनी केला असणार हे मी अगदी मानायला तयार आहे. या प्रश्नांचा कोणी तरी विचार करायलाच हवा, उत्तरे शोधायलाच हवीत. थोडक्यात, राज ठाकरे पूर्ण चूक नाहीत व पूर्ण बरोबर नाहीत. खेदजनक वस्तुस्थिती अशी की सगळ्यांना सोबत घेउन प्रगतीच्या दिशेनी जाण्या ऐवजी, सगळ्यांना सळो का पळो करुन समाज विभाजनाकडे त्यांची वाटचाल झपाट्याने सुरु आहे
इथे अजुन एक लक्षात घेण्याजोगा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज ठाकरे ज्या मराठी माणसाबाबत बोलतात तो मराठी माणुस फक्त खर्यात मुंबई निवासी आहे की तो संपूर्ण महाराष्ट्रात रहाणारा मराठी माणुस आहे? (कोणी बंगाली मराठी बोलत असेल तर तो मराठी माणसांमधे गणल्या जातो की तो बंगालीच समजल्या जातो?) कारण स्वानुभाव वरुन एवढ नक्की सांगु शकतो की नागपुरला (महाराष्ट्राची उपराजधानी) अगदी मराठी लोक सुध्दा हिंदिच जास्त बोलतात। मराठी चित्रपट पश्चिम महाराष्ट्रा बाहेर येत सुध्दा नाहीत. राज ठाकरेंच्या मते मराठी माणुस दिसत नाही यात जरी तथ्य असलं तरी यावर उपाय महाराष्ट्रातून बिहारी-उत्तर प्रदेशींना काढुन टाकणे हा नक्कीच नव्हे. मुंबईत बिहारी भैय्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. टॅक्सी चालकां पासुन ते दुधवाल्यां पर्यंत तीच लोक सगळीकडे दिसतात. पण याचा अर्थ असा नव्हे की ती लोकं मराठी लोकांच्या नोकर्या हिरावुन घेतायत. मुंबईत सगळ्यांना पुरुन उरेल इतक काम आहे व त्यामुळेच ही लोक मुंबईला येतात.
खर सांगायचं पर-राज्यीय लोकांचा या भानगडीशी काही संबंध नाही. स्वतः शिवसेना सत्तेत असतांना (तेंव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते) त्यांनी काय दिवे लावले? कुठल्या दृष्टीने त्यांनी मराठी भाषेचा किंवा भाषिकांच्या विकासा हेतु योजना केल्यात? दुकानावरच्या इंग्रजी पाट्यांना काळ फासणे ही काही 'नव-निर्मितीची' लक्षणे नव्हेत. हे पर-भाषिक किंवा पर-राज्यिय लोक म्हणजे कोणी परकीय नव्हेत. हे आपलेच आप्तजन आहेत. येथे 'पर' हा शब्द वापरणेसुध्दा अनुचित आहे. परभाषिकांना पळवुन लावणे यात पुरुषार्थ की पर-भाषिकांना आपल्या वैभवशाली परंपरेने स्व-भाषिक करणे यात खर यश? या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर राज ठाकर्यांना सापडले की मगच आपण मराठी भाषिकांच्या विकासाबद्दल विचार करण्यास मोकळे होऊ.
* कृपया माझे या विषया संबंधीत "येथे मराठेचिया नगरी" आणि "मराठी माणुस कुठे हरवला?" हे दोन लेख अवश्य वाचावेत. *
4 comments:
Chinmay Dada khup lihiles pan vastusthitila dharun nahi. Tuzya sarkhhya Botchepya Marathi Mansakadun aajun kay aapeksha karnar. Mala tula he sangayche aahe ki Marathi Manasabaddal Marathi Mansech (Tuzya Sarkhi Bulchat)unapura bolat aastat. Tu kay dive lavles re?
Aare Aacharya Atre, S.M.Joshi. Com. Dange, Prabodhankar Thakare, C.D.Deshmukh Ya sarkhya Marathicha swabhiman balagnarya Thor lokannni MAHARAHTRS DHARMA palnyasathi prasangi Nehru, Vinobaji yanchyavarhi Halla Chadhavla hota. yacha aarth Tyanna kahi kalat navte ki te khuje hote?
Tuch motha shahana lagun gelas. Tula Maharashtra Dharma Mhanje kay he suddha mahit nahi.
Tuzyasarkhich botchepi mandali Maharashtrat houn geli kahi aajahi aahet. Yashwantrao chavan Mhanale hote MAHARASHTRAPEKSHA NEHRU MOTHE. Aaj Shivraj patil Mhanatat ki ME RASHTRACH MAHARASHTRACHA NAHI
Yacha aarth kalto kay tula?
Vilasrao sarkha Maratha gadi 1982 pasun Minister aahe pan swabhiman shunnya aahe. Nehmi Delhila javun Italian Baiche paay pakadto aani 6 mahinyachi mudatvaad ghevun hasat yeto. Narayan Ranechehi tech.
Aaj Raj Thakare yaani punha ekda Marathi Mansachya aasmitela phunkar ghatli aahe. Tyanna Rajkaran tar karayche aahech pan te sodun de tyanchya vicharat chuk kay te mala saang.
Lihinyasarkhe khup aahe. Aamhala Bhartabaddal kahich deneghene nahi aase samju nakos. Pan pratekachi vichardhara aaste. Maharashta virodhi vichar, Marathi Asmitela thech pohchavnara vichar ithe thechlach jail. Yachi tadjod karne shakya nahi.
Jay Hind Jay Maharashtra.
ABHAY DESHMUKH
@अभयराव,
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. आपल्या प्रतिक्रीयेला उत्तर द्यायला कुठुन सुरुवात करावी मला सुचत नाहीया. खरतर मला उत्तर द्यायची सुध्दा मुळीच इच्छा नाही. पण आपण माझ्या संकेतस्थळावर येउन अभिप्राय देण्याची तसदी घेतलीत म्हणुन मी उत्तर देण आवश्यक आहे.
महाराष्ट्र धर्म काय आहे हे मला तुमच्या कडुन शिकण्याची मुळीच इच्छा नाही. आचार्य अत्रे किंवा चिंतामणराव देशमुख या सारखी नाव पोपटासारखी तुमच्या तोंडुन बाहेर पडता आहेत पण त्यांचा राज ठाकरेंनी मांडलेल्या बंडखोरीशी काय संबंध आहे या बद्दल तुम्ही कधी विचार केलेला दिसत नाहीया. नेहरु प्रकरणा बद्दल मला फारशी बोलायची इच्छा नाही आणि त्यांचे किंवा तत्सम व्यक्तींचे पाय चाटण्यात भुषणता मानणारे लोकांबद्दल बोलायलाही मी शब्द खर्च करणार नाही. शिवराज पाटील किंवा यशवंतराव चव्हाणांनी काय केल या बद्दल मी माझ्या लेखात भाष्य केलेलं नाहीया. तुम्हां लोकांची भांडण विलासराव देशमुखांशी असतील तर त्यात काही चूक नाही पण त्याचा अर्थ तुम्ही उत्तर भारतीय लोकांच्या नाकात दम आणणार हे अनुचित आहे.
मी मराठी म्हणुन मी उत्तर भारतीयांना मारहाण करणार आणि मी माझा मराठीपणा, बिहारी लोकांना मुंबईतुन हाकलुन सिध्द करणार ही किती बुरसटलेली विचार प्रणाली आहे हे मी माझ्या लेखातुन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, हे कळण्यासाठी तुम्हाला शांत चित्तानी माझा लेख वाचावा लागेल. ती जवाबदारी तुमची.
मुंबई-पुण्यात राहुन ईंग्रजी बोलणार्या मराठी लोक माझ्या मराठा धर्माला अधिक ठेच पोचवतात. छत्रपतींबद्दल थोडीही माहिती नसणारे मराठी लोक मला अधिक दु:ख देतात. मराठी शिकुन काय उपयोग असले शंख विचार करुन आपल्या मुलांना आवर्जुन फक्त इंग्रजी शिकविणार्या पालकांचा मला अधिक राग येतो. या लोकांबद्दल तुम्ही आणि तुमचे गडी-लोक काय करणार आहात हे मला एकदा समजावुन सांगा. सगळ्या बिहार्यांना हाकलल्या नंतरही, मराठी मातीत जन्मलेली आणि मराठीशी मुळीच संबंध नसलेल्या लोकां इथेच असतील. त्यांना ही तुम्ही हाकलणार का? माझा लेख हा तुमच्या सारख्या विचारसरणीच्या लोकांबद्दल आहे. बिहारी-उत्तर प्रदेशी लोकांशी माझं काही देण-घेण नाही.
भारतात प्रत्येक व्यक्तिला कुठेही स्थलांतर करण्याची मुभा आहे. आणि हे करण्यास रोख लावणारे गुन्हेगार मानायला हवे. पण समजा तुमच्या सारख्या लोकांचे मनं राखायला आपण ही बंदी आणली तरी महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा विकास कसा होणार आहे हा माझा सवाल आहे? आणि हा प्रश्न विचारण्यानी मी महाराष्ट्र-विरोधी कसा हे सुध्दा मला या सोबतच समजावुन सांगा.
परकीय आक्रमकांना जमिनदोस्त करणार्या शूर मराठी संस्कृती माझी आहे. तलवारी इतकीच धार ज्यांच्या लेखणीत आहे ती मराठी संस्कृतीचा मी आहे. शक्तिला भक्तिची जोड देणार्या मराठी मातीत माझा जन्म झालेला आहे. हे मी माझं भाग्य मानतो.
स्व-जनांनाच दम दाखवण्यात मर्दुमुकी मानणारे तुम्ही कुठचे हो?
'बुळसट' किंवा 'बोटचेपी' (हा शब्द मी कधी ऐकला नव्हता!) या सारखी विशेषण दुसर्यांना देण फार सोपं आहे.
पण सारासार विचार करुन निर्णयाप्रत पोचायला सर्व बाजुंचा आणि सर्व मुद्द्यांचा विचार विवेकाने करणं आवश्यक असत आणि ते फार कठीण आहे.
Chinmay dada,
Bare zale tumhi mazya pratikriyevar bhashya kele. Aanand vatla.
Kase aahe me kahi Raj Thakare yanchya particha sadasya dekhil nahi. Pan Marathi Manoos ya natyane Mumbai sarkhya shaharat (karane kahika aasenat) Marathi mansachya rojgarachya sandhi (Specially Central Govt. Org. Madhe aani pvt.)madhe nakarlya jaat aahet.
Mala ek kalat nahi tumhi marathi mansachya bhalyacha vichar karaycha sodun] parprantiyacha pulka ka vattoy tumhala?
Tumchya mahiti sathi sangto ki ya Maharashtrane Bhartala khup kahi dile aahe. Mumbai he pratham Maharashtrachi Rajdhani aahe aani tyanantar Bhartachi aarthik rajdhani aahe.
Asa aarop kela jato ki parprantiyamulech Mumbai Mothi zali aahe-
Ya babat maze mhanane aase aahe ki zar parprantiya evdhe kartabgar aahet tar tyanna rojgarasathi etkya door 5000 km var ka yave lagte? Te kashta kartat tar tyanni aasich Mumbai UP BIHAR madhe ka develop keli nahi?
Aaj paryant Maharashtratun durdaivaane ekhi pantpradhan zalela nahi. pan UP BIHAR madhun barech zalet. Tyanna asich mumbai tethe vasavane shakya ka zale nahi? Evdhe hounahi UP BIHAR magasach ka rahile?
Bharatache bahutek aarthsankalp (major part) richvun aajhi bhukekangalach aahet? Yala jababdar kon?
Me pan Bhartacha nagrik aahe. Malahi ya babiche dukhkha vaatate. Pan tyamule Majya gharat ghusun malach aadchan karnarya pahunya baddal mala kahi upay-yojna karayala nako?
Prashna UP BIHAR chya lokanncha nahi pan tyanchchya pravrutticha aahe. Yethe yevun Marathi shikat nahit. Tumhi UP BIHAR madhe javun Marathit bolal kay? kimbhuna tumhala bolta yeil kay? South madhe javun pahile aaselach ki. Tethe hindi bolnarakade lakshyahi dile jaat nahi. Mag Marathi mansanni Marathicha aattahas kela tar kuthe bighadle?
Aaho Marathi Manoos sahishnu aahe mhanun tar ya lokanchi chaltey. He lok yethe aakramanach karat aahet. Tumhala saangto, Maharashtrat Ekhadya politician la MLA chya 2-3 term zalyashivay Minister kele jaat nahi. Pan Kripa-shankar, Nasim-Khan, Nawab-Mallik, Baba-Siddiqui, ya sarkhya UP BIHARI lokaana 1st term madhech Minstry milte he kase? karan me maghe sangitlyapramane (UP BIHARI kendratil sarvpakshiya nete tyanna madat kartat)kendrapudhe zuknaarya netyamulech ha Maharashtra aatma gamavun basala aahe. Aani Mhanunach RAJ Thakare yaani ghetlele bhumika (Jari Tumchya kasotivar khari utarat nasali tarihi)yogyach aahe ase vaatate.
Tyamule Maharashtrat Marathi Manasanchich Masti chalel he lakshat thevle paahije. Maharashtrane aaplya udarmatvaadi sanskritimulech itki pragati keli aahe. UP BIHAR madhe aajhi GUNDA RAJ, MAFIYA RAJ and SARANJAMSHAHIch chalu aahe. Ya rajyamule Maharashtrach nahi tar PUNJAB sarkhi itar rajyehi pareshan zali aahet.
Ek lakshat gyaki aaplyaithe lokshahi rabvili jate, viodhakachyahi vicharacha aadar kela jato. Tyala mat mandu dile jate aani mhanunach Tumhihi marathi virodhi parprantiyachi baju ghevun bolu shakta aahat. Pan Marathi mansala Mumbai madhe tras hotoy to hou naye, Lalu, Amarshinh, Mulayam, Mayavati ya sarkhy netyanni (Tyanchya mulech samany UP BIHARI lokanna rojgarasathi ekde yave lagte)ethe yevun aag lavnyapeksha UP BIHAR cha vikas karava aani UP BIHARI lokanna tethech rojgar milel yachi vyavashta karavi ya baddal konihi (Ekhi parprantiya) bolat nahi ase ka? Maharashtrane pragati keli hi chuk zali kaay?
Kay aahe aaplyithe aasi paramparach aahe ki Marathi lokanich Marathi lokanvirudhdh bolave. Mhanunach Shiv Chchatrapatina shatrupeksha aaplyach lokansobat jast ladhave laagle. He aaple Marathi Mansache durdaiva aankhi dusare kay?
Chinmay dada tumhala dilelya tasadibaddal kshamaswa.
Dhannyavaad.
ABHAY DESHMUKH
Abhay Deshmukh ....
Mast Bollas ....
Aaj Kahi Seculer Marathi Mansan mule Aaplya Marathi Lokana Maharashtratch Maan Khali Ghalun Jagave Lagte Ahe ....
Ani Baherun Aalele Parprantiya Maharashtra War Rajya Karu Pahat Ahe ....
Post a Comment