१०वीत आमच्या मराठी बाल-भारती पुस्तकात आम्हाला 'महापुरुषाचा पराभव' नावाच धडा होता। लेखकाचे नाव मला आठवत नाही पण त्याच्या मते महान व्यक्तींचा पराभव(म्हणजे त्याच्या तत्वांचा)होण्यात त्यांचे अनुयायी फार मोठे भागीदार असतात. स्वातंत्र्योत्तर काळात नेतेगीरीच आणी व्यक्ती-पुजेचं जे पीक आलय आणी महात्म्यांच्या तत्वांची जी खरेदे-विक्री चालते, ते बघता लेखकाच म्हणण चांगलच पटत. पण 'पराभव' म्हणजे नक्की काय?
आपल्या देशात थोर लोकांची कमतरता नाही. पण कोणी जन्मत: महान नसत. ती व्यक्ती तीच्या कर्माने महान ठरते. त्याच्याकडे सांप्रत परिस्थिती कडे वेगळ्या दृष्टीनी बघण्याची शक्ती असते. त्या दृष्टी-द्वारे तो समाजावरची संकटे दूर करण्याचा किंवा सामाज उध्दाराचा प्रयत्न करतो. पण त्याच्या कार्यामुळे तो व्यक्ती महान ठरतो, व्यक्तीमुळे कार्य महान ठरत नाही. समाजात नेहमी चांगल्या वाईट गुणांची चढा-ओढ चालू असते आणी जेंव्हा वाईट गुण जोरा करतात तेंव्हा जी व्यक्ती चांगल्या गुणांना यश मिळवुन देते ती व्यक्ती महान. पण परत, येथे ज्या तत्वांसाठी ती व्यक्ती कष्ट करते ती तत्वे अधिक महत्वाची. छत्रपतींनी स्वराज्य प्राप्तीच्या कार्याला नेहमी श्रींची ईच्छा असे म्हटले. कारण त्यांच्या दृष्टीने त्यानी आरंभिलेले कार्य हे कुठल्याही व्यक्तीपेक्षा अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच छत्रपतींच्या अकाली मृत्युनंतरही स्वराज्याचा लढा केवळ चालु न रहात अजुन फोफावत गेला.
जेंव्हा कार्यापेक्षा व्यक्तीला अधिक महत्व दिले जाते त्याच क्षणी महापुरुषाचा पराभव होतो. महापुरुषाच्या जीवनाच्या उत्तरार्धात किंवा त्याच्या मृत्यु नंतर अनुयायी त्याने आरंभिलेले कार्य पुढे चालु ठेवण्या ऐवजी त्या महा पुरुषाची पुजाच करण्यात धन्यता मानतात. त्याहुन वाईट म्हणजे त्याची तत्वे काळानुरुप न बदलता ती कुजवुन समाजाचे नुकसान करतात. भारतीय समाज माणसाल 'देव' बनवण्यात निपुण आहे. त्यामुळे कुठल्याही महात्म्याला एकदा का फुलांचा हार चढवुन कोनाड्यात बसवला कींवा जागो-जागी त्याचे पुतळे उभे केलेत की झाल, त्यानंतर कोणीही जुन्या होत असलेल्या तत्वांना बदलवु शकत नाही.
व्यक्ती-पुजेचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गांधी आणी त्यांच्या नंतरची नेते मंडळी. अर्थात या परिस्थितीला गांधीजी किती जवाबदार आहेत याचा स्वतंत्रतेने विचार करावा लागेल. पण अहिंसेच्या तत्वांचा त्यांच्य जीवन काळातच फाळणीच्या नर-संहारात सपशेल पराभव झाला असला तरी ते 'महात्मा' कधीच बनल्यामुळे त्यांच पांढर उपरण स्वच्छच राहिल. त्यांच्या मृत्यनंतर तर अहिंसेचा अतीरेक झाला. अहिंसेच्या तत्वाचा इतका पगडा नेहरुंवर होता की अस म्हणतात की त्यांनी सेना-प्रमुखांना प्रश्न विचारला की भारत हा शांती-प्रधान देशा असतांना सेनेची काय आवश्यकता आहे? अर्थात चीन युध्दा नंतर त्यांचे मत-परिवर्तन झाले ! याच्या उलट गांधींचे पट्ट-शिष्य या नावखाली आपल्या विनोबा भावे आणी-बाणीच्या काळातल्या हिंसेला आवश्यक ठरवुनही 'आचार्य' बनले.
जरी भारत आर्थिक प्रगती करत असला (जी कौतुकास्पदच आहे) तरी आपल्या समोर असलेल्या ज्वलंत सामजिक प्रश्नांची उत्तरे आपल्या कडे नाहीयात. चांगल काय आणी वाईट काय याचाच आपल्या समाजाला भ्रम झाला आहे. पश्चिमी संस्कृतीच्या झंझावात आपल्या समाजाची बिन-शिडाची नाव वाट फुटेल तीथे वहातेय. तरीही व्यक्तीपुजा तेजीत आहे आणी या भानगडीत भारताच्या भविष्याचा विचार करायला फारसा कोणाकडे वेळ नाही. यातुन बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे ते मला माहिती नाही. पण ज्यांना व्यक्ती पुजे ऐवजी कार्य पुर्तीचे महत्व अधिक पटते त्यांनीच काही केले तर परिस्थिती बदलु शकते नाहीतर प्रेक्षक होउन नुसता 'तमाशा' बघत रहायचा.
5 comments:
मित्रा मलाही हा धडा होता. जनार्दन वाघमारे हे त्या लेखकाचे नाव. अप्रतिम धडा होता. त्याच्या मते महान व्यक्तींचा पराभव(म्हणजे त्याच्या तत्वांचा)होण्यात त्यांचे अनुयायी फार मोठे भागीदार असतात.हा त्याचा सारांश आहे.
lekhakache nav "Kaka Kalelkar" hote not Janardan Waghmare.
Best article
करेक्ट जनार्धन वाघमारे, लेखक होते, राज्यसभेवर हि होते काही दिवस आणि विचारवंत, लेखक होत... लातूरचे होते ते
The author was P G sahasrabuddhe
Post a Comment