3/8/08

जोधा-अकबर

प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर म्हणतात की जोधा-अकबर चित्रपट ऐतिहासिक नाही. चित्रपटाची कथा केवळ एक प्रेम-कहाणी आहे. मी हे मान्य करायला तयार आहे. मला प्रश्न असा पडतो की हिंदी चित्रपटात प्रेम-कहाण्यांचा इतका दुष्काळ पडला आहे की एक क्रुर मुसलमानी सत्तेच्या नायकावर एक मन-घडन प्रेम-कथेवर आशुतोष गोवारीकरांना चित्रपट काढावसा वाटला. मला या चित्रपटावर आक्षेप बरेच आहेत पण त्याही पेक्षा मला दु:ख याच वाटत की एका मराठी माणसाने भारताला दार्-उल-हब्र (म्हणजे संपूर्ण मुसलमान) करण्याची आण वाहिलेल्या सुल्तानी अमलावर प्रेम-कहाणी लिहावी. जर का ऐतिहासिक घटनांवर प्रेम कथा दिग्दर्शित करण्याची एवढीच नितांत आवश्यकता गोवारीकर साहेबांना वाटली तर पृथ्वीराज-संयुक्ता किंवा बाजीराव-मस्तानी वर त्यांनी चित्रपट काढायला हवा होता. अजुन एक पायरी पुढे जायच असेल तर शिवाजीराजे-सईबाईंवर चित्रपट काढायला हवा होता. शिवबा-सईबाईंबद्दल फारस काहीच साहित्य उपलब्ध नाही. सईबाई शिवाजी राजांची पहिली बायको (संभाजी राजांच्या मातोश्री) व त्यांच्या एकुण कौटुंबिक जीवनाकडे लक्ष दिले तर सईबाईंच्या सहवासातच राजांना संसार-सुख थोड बहुत भोगायला मिळाल. सुंदर पण मन-घडनच जर का चित्रपट दिग्दर्शित करायचा होता तर सईबाईंवर कथा बेतायला काय हरकत होती? अर्थात, देश व धर्म रक्षणात शिवबांना प्रेमं करण्यास फारस वेळ मिळाला नाही यात गोवारीकर साहेबांची काय चूक? एक गोष्ट नक्की की वर सुचविलेल्या कथानकांवर चित्रपट काढण्यात फारसा पैसा गोवारीकर साहेबांना लाभला नसता. पैश्यासाठी लोक वाट्टेल ते करतात, इथे तर आपण केवळ एका चित्रपटाबद्दल बोलतोय. शेवटी सत्तालोलुप हिंदु राजे आपली सत्ता टिकविण्यसाठी मुसलमानी आक्रमकांशी गठ-बंधनं करु लागलेत. या गठ-बंधना अंतर्गत आपल्या घरातील बायका मुसलमानांकडे पोचविण्याच्या कार्याला ते धन्यता मानु लागले. थोडक्यात, घरातील आया-बहिणींना मुसलमानी हारेम मधे या 'राजपुतांनी' विकायला सुरुवात केली. या "वैभवशाली" परंपरेतंर्गत राजा भगवानदासाने आपल्या बहिणीला, जोधा-बाईला, अकबर बादशहाला विकलं. खरतर अश्या या दारुण परीस्थितीवर गोवारीकर साहेबांना प्रेम-कहाणी दिग्दर्शित करता आली याबद्दल तर त्यांच्या प्रतिभाशक्तिची दाद द्यायला हवी. अर्थात, अकबराच्या हारेम मधे अजुन २००-३०० विकलेल्या हिंदु बायका होत्या हा मुद्द्याचा इथे विचार करायचा नाहे. तो फाउल मानल्या जाईल.

मुसलमानी सत्तेचा आरंभ पृथ्वीराजाच्या पराभवानंतर म्हणजे ११व्या शतकात झाला असला तरी अरबी तसंच पर्शियन मुसलमानांचा रक्तरंजित हैदोस सध्याच्या अफगाणी सीमेपाशी ८व्या शतकापासुन चालू होता. मुहम्मद-बिन-कासिम याने सन ७१२ मधे कराची लुटल्याची नोंद आहे. आरंभी सोन आणि बायका हेच केवळ या आक्रमकांच लक्ष असे. त्या काळात लुटीतील आठ टक्के हिस्सा मुसलमानी साम्राज्याच्या खलिफाला द्यायची प्रथा असे. (पुढे हि प्रथा बंद पडली) त्यामुळे लुटलेल्या मंदिरांमधील सोन्याचा आठ टक्के हिस्सा तर खलिफाला जाईच पण पळवुन नेलेल्या बायकांच्या संख्येमधी आठ टक्के बायका सुद्धा अरब देशात खलिफाच्या दासी म्हणुन पाठविल्या जात असे. उरलेल्या बायका सैनिकांमधे वाटल्या जात असत. आता बायकांच पुढे काय व्हायच हे सांगायची गरज नाही. याच संदर्भात राणी पद्मिनीची कथा तर सर्वज्ञातच आहेपण केवळ हिंदू असल्यामुळे त्यांच्यावर हि दारुण परिस्थिती येत असे हे इथे लक्षात घेतल पाहिजे. बायका पळवुन नेण्याची हि पध्दत अगदी पाणीपतच्या युध्दातही कायम होती. अहमदशहा अब्दाली कित्त्येक मराठी कुळीन स्त्रीया अफगाणीस्थानात घेउन गेला. काही वर्षापूर्वी मी काबुल मधे १९७० च्या दशकात भारतीय परदेश विभागात काम केलेल्या एका सरकारी अधिकार्‍याचे पुस्तक वाचले. त्यात त्याला कोणी अफगाणी पुरुषाने त्याच्या अफगाणी कुटुंबात जतन करुन ठेवलेले काही दागिने आणुन दाखविले. त्या दागिन्यां मधे नथ, मंगळसुत्र व कुंकवाची पेटी यासारख्या गोष्टी होत्या.

तरुण मुलांना नोकर बनविण्यासाठी व तरुण पोरींना केवळ यौनसंबधीत दासी बनविण्याचा फार मोठा व्यापार मुसलमानी अंमलात चालु असे। बहुतांश व्यापार अरब देशांशी चालत असे. भारतीय उपखंडातून अरब देशापर्यंतच्या प्रवासा महत्वाचा टप्पा म्हणजे हिंदु-कुश पर्वत होय. ही पर्वतमाला पार करण्याचा प्रवास इतका यातनामय असे की बरीच तरुण मुलं-मुलींनी येथे शेवटचा श्वास घेतं. या मृत हिंदुंची संख्या एवढी होती की 'हिंदुची कत्ल जीथे होते' तो हिंदु-कुश असे नाव या पर्वतमालेला पडले. (या पर्वत-मालेचे मूळ संस्कृत नाव काय होते हे नेमंक मला आठवत नाहीया. पण महाभारतात या पर्वत मालेचा उल्लेख आहे.)

थोडक्यात हिंदु बायका या केवळ दासी म्हणुन उपयोगात आणण्याची पध्दती मुसलमानी अंमलात रुढ होती। दुसरी पध्दत म्हणजे की मुसलमानी सत्तेपुढे पराजय झाला तर मांडलिकत्व पत्करण्या अंतर्गत आपल्या घरातील बायका बरेचशे हिंदु राजे मुसलमानी सुल्तानाच्या हारेम मधे दाखल करत. जोधाबाई याच प्रथे अंतर्गत अकबराची 'बायको' मानल्या जात होती. अर्थात, लग्नानंतर ती मरीयम-ए-ज़माना झाली. आता अकबर कोण होता ते थोडं बघुया.

१२व्या शतकानंतर भारत म्हणजे आक्रमकांची खुली बाजारपेठ झाला होता। कोणीही यावे व दिल्लीत राज्य करावे हाच एक कायदा शिल्लक होता. याच देवाण-घेवाणीत बाबर नावाचा अत्यंत निम्न रक्ताचा व क्रुर इसम मध्य आशियातुन दिल्लीत दाखल झाला. हळु-हळु त्याने हात पाय पसरवायला सुरुवात केली. हिंदुंना मुसलमान करणे, मंदिरे तोडणे (अयोध्येचे राम-जन्मभुमीवर मशीद बांधणार हाच उत्साही सुल्तान!) इत्यादी कार्ये उरकल्यावर स्वतःला मोघली रक्तपिपासु टोळीचा वंशज बनवुन त्याने दिल्लीत मोघली अंमलाची सुरुवात केली. याच घराण्यात अकबराचा जन्म झाला. (औरंगझेब हा अकबराचा नातू) त्याने मोघली सत्तेच्या सीमा दख्खन पर्यंत ताणल्या पण राजपूतांशी भांडण्यात त्याचा बराच वेळ जात असे. यावर उपाय म्हणुन त्याने राजपूतांसमोर एक नवीन करार मांडला. जे राजपूत राजे अकबराचे मांडलिकत्व पत्कारतील व घरातील बायका अकबराच्या हारेम मधे दाखल करतील त्यांच्यावर अकबर स्वारी करणार नाही. जयपुरच्या अंबर राजघराण्यानी या कार्यात सर्वात पहिले पुढाकार घेतला. जे अकबरावर थुंकले त्यांच फारस भल झाल नाही. महाराण प्रताप बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहेच. पण चित्तोडच्या स्वारीत विजय प्राप्त झाल्यावर किल्ल्यातील ३०,००० लोकांची कत्ल अकबराने केली हे फारस कोणाला ठाउक नाहे. (गोवारीकर साहेब ऐकताय का?) अर्थात, हि कत्तल फारशी मोठी नाही. बहमनी सुल्तानांनी कर्नाटक स्वारीत एक लाख लोकांची कत्तल केली. त्या भागातील एकाही माणसाला, बाईला किंवा अर्भकाला जिंदा ठेवला नाही. पण या बहमनी सुल्तांनांचा अकबराशी काही संबंध नाही.

पण थोडक्यात या अश्या वैभवशाली मुसलमानी अंमलातील एक हलक्या रक्ताचा अकबर राजा व तलवारील पाणी नसलेल्या घराण्यात जन्म घेतल्यामुळे नाईलाजास्तव त्याची बायको झालेल्या जोधाबाईवरच प्रेमकहाणी चित्रपट दिग्दर्शित करण्याचे आपल्या गोवारीकर साहेबांना कसं सुचल? कोणा मुसलमानाला हि सुल्तान आपले वाटत असतील म्हणुन त्याने चित्रपट दिग्दर्शित केला हे मी मानु शकतो.(मुघल-ए-आज़म) पण ज्या मातीने या मुसलमानी सत्तेला यशस्वीरीत्या आव्हान देण्यार्‍या मर्द-मराठ्यांच्या पिढ्यांन्-पिढ्या जन्मी घातल्यात्याच मातीत हे गोवारीकर कसे जन्मले? पण येथे मुद्दा गोवारीकरांच्याही बराच पुढे जातो. पैशांचा जो मुद्दा मी लेखाच्या आरंभी मांडला तो इथे फार महत्त्वाचा ठरतो. गोवारीकरांनी नसतं दिग्दर्शन केलं तर दुसर्‍या कोणी केलं असत. पण दिग्दर्शन कोणीही केल तरीही अकबराचा इतिहास तर बदलत नाही. हा असला घृणास्पद, रक्तानी बटबटलेला इतिहास बाजुला ठेउन कोणी त्याच काळावर आधारित प्रेमकहणी लिहु शकतो किंवा त्यावर आधारीत चित्रपट काढण्यासाठी पैसा देउ शकतो (लेखक व निर्माते) येथे भारतीय समाजाचा पराभव आहे.

"चित्रपट केवळ कलेचे माध्यम आहे पण शिवाजीराजे आमच्या मनात कायम आहे असल्या शंढ बाता करण्यात काही हशील नाही." कारण गेल्या शंभर वर्षात शिवाजीराजांवर एकही हिंदी चित्रपट प्रकाशित झालेला नाही. महाराणा प्रतापांवरही नाही किंवा गुरु गोबिंदसिंहजी वरही नाही. जो होउन गेला तो इतिहास पण तो विसरुन, आपल्याच पूर्वजांवर झालेल्या अनन्वीत अत्याचारांकडे कानाडोळा करुन मुसलमानी आक्रमकांवर चित्रपट काढण्याची किंवा तो बघण्याची हिंमत करणार्‍या भारतीय समाजाची लाचारी वाखण्याजोगीच आहे. अनेक गोवारीकर झालेत आणि पुढे अनेक होतीलही पण या भारतीय समाजाच्या मूढत्वावर काही उपाय आहे का, हे सांगण अशक्य आहे.

12 comments:

Unknown said...

या विषयाशी संबंधीत काही ससंदर्भ लेखांचे दुवे खाली देत आहे, त्या लेखांतील मुद्यांचा तटस्थपणे व गांभीर्याने विचार करावा ही विनंती.

दुवे:

'जोधा -अकबर' च्या निमित्ताने

जोधा-अकबरची स‌ुरस कहाणी!

राणी पद्मिनीची भाकडकथा

(आपणही आपल्या लेखनास संदर्भ दिला असता तर बरे झाले असते)

Chinmay 'भारद्वाज' said...

मृण्मय,



आपण दिलेल्या लेखांबद्दल काय बोलावं मला सुचत नाहीया. आपणांस वाटत असेल की मला सत्यकथांना भाकडकथा मानणार्‍या भाकडकथांचा सुळसुळाट झाल्याला बरीच वर्ष झालीत. राणी पद्मीनी खोटी, मुसलमानी सत्ता भारताचा वैभवशाली इतिहास आणि अकबर आपला खरा राम (कारण, राम तसाही खरा नाहीच, बरोबर?) इत्यादी मुद्दे मांडतांना तुमच्या 'विसोबा' इसमाने कुठलाच संदर्भ दिलेला नाही. तसंच या 'विसोबा' ने वाचलेली पुस्तक कशावरुन सत्य मांडितात हे सुध्दा कशावरुन?

आधीचे मुसलमान सुल्तान व नंतरचे मुसलमान सुल्तान इतके क्रुर होते कि त्यात अकबर बरा हे मान्य. दगडापेक्षा वीट मऊ हेच बरोबर. पण जिझिया कर उठवला म्हणुन तुमच्या सारखे 'हुशार' व्यक्ती अकबराला महान मानित असतील तर कृपया आपले विचार आपल्यापाशीच ठेवावेत हीच विनंती.



माझे संदर्भ-:

स्लेव ट्रेड इन ईस्लामिक इंडिया

राजा शिवछ्त्रपती

विकीपीडिया

Unknown said...

आपल्या उत्तराबद्दल आभारी आहे. मी उल्लेख केलेल्या तीन लेखांत त्यांचे संदर्भ दिलेले आहेत.तसेच, या लेखांतील मते ही लेखकांची वैयक्तीक नसून त्यांनी अन्य संशोधकांचे संशोधन सादर केले आहे, आपण त्यातील मुद्यांचा प्रतिवाद त्यांच्या लेखांना प्रतिक्रीया देऊन अवश्य करावा.
* 'जोधा -अकबर' च्या निमित्ताने - संदर्भः 'आकलन' (नरहर कुरुंदकर)
* जोधा-अकबरची स‌ुरस कहाणी! - संदर्भ -
- भारताचा शोध - पं. जवाहरलाल नेहरू; अनु. साने गुरुजी, ना. वि. करंदीकर; कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे; पहिली आवृत्ती 1976, पृ. 285.
- निवडक लोकहितवादी - संपादक - डॉ. निर्मलकुमार फडकुले, डॉ. ल. रा. नसिराबादकर; फडके बुकसेलर्स, कोल्हापूर; दुसरी आवृत्ती, जुलै, 1989, पृ. 123-125.
* राणी पद्मिनीची भाकडकथा - संदर्भ - इतिहास - सत्य आणि आभास - निनाद बेडेकर, सत्याग्रही विचारधारा, दिवाळी 1998

(कै. कुरुंदकरांचा व्यासंग प्रचंड होता, त्यांच्या निष्कर्षांना आक्षेप घेण्याची माझी पात्रता नाही, तसेच श्री. निनाद बेडेकर हे मान्यवर इतिहास संशोधक आहेत)

आता, आपल्या संदर्भांविषयी:
बाबासाहेब पुरंदरे यांचा राजा शिवछत्रपती ग्रंथ मी वाचलेला आहे. त्यात अकबराचा त्यांनी आदरानेच उल्लेख केल्याचे स्मरते. (त्यात त्यांनी अनेकदा अकबर व औरंगजेबाची तुलना करून अकबराला श्रेष्ठ ठरवलेले आहे)
तसेच बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहीलेले पत्र दिलेले आहे, ज्यात खुद्द महाराजांनी अकबराची थोरवी वर्णिलेली आहे.
पुरंदऱ्यांच्या ग्रंथात त्यांनी (बहुदा प्रकरण ३ मध्ये) अल्लाऊद्दीन खिलजीच्या चितोड मोहीमेचे वर्णन केले आहे (राजपुतांची अयोध्या बुडाली) मात्र त्यात राणी पद्मिनीचा उल्लेख असल्याचेही मला स्मरत नाही.
Wikipedia हा मान्यताप्रात संदर्भ नाही असे प्रत्यक्ष Jimmy Wales ने स्पष्ट केलेले आहे. तसेच त्यावरील अकबराविषयीच्या लेखात आपण दिलेली माहीती आढळली नाही.
'स्लेव ट्रेड इन ईस्लामिक इंडिया' या ग्रंथाबद्दल मला काहीही माहीती मिळू शकली नाही, या ग्रंथाच्या उपलब्धतेसाठी आपण सहाय्य करू शकल्यास आनंद होईल.

श्री. आजानुकर्ण यांनी आपल्या लेखात जिझिया कर रद्द करण्याचा अन्वयार्थ स्पष्ट केलेला आहे. (जिझिया कर रद्द करणे म्हणजे मुसलमान हे देशाचे जेते नसून इथलेच नागरिक आहेत व बिगरमुसलमान हे जित लोक नसून ते देखील याच देशाचे प्रजाजन आहेत अशी भूमिका घेणे आहे).
ही भूमिका एका धर्मवेड्या अथवा जुलुमी राजाची नक्कीच नाही.

आपल्या अकबरविषयीच्या लेखाच्या आपण दिलेल्या व उपलब्ध झालेल्या मुळ स्रोतांत आपण दिलेली माहीती आढळली नाही. उलटपक्षी राजा शिवछत्रपती मधील अकबराची माहीती आपल्याशी जुळत नाही. याविषयी आपल्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल.

अवांतर:
१. श्री. बेडेकरांनी अल्लाऊद्दीन खिलजीचे चितोड आक्रमण अमान्य केलेले नाही, त्यांनी केवळ राणी पद्मिनीच्या अस्तीत्वाबद्दल शंका उपस्थित केलेली आहे.
२. औरंगजेब हा अकबराचा पणतू होता (अकबर -> जहाँगीर -> शहाजहान -> औरंगजेब)
३. महाराणा प्रतापांवर १९६१ साली निर्माण झालेला 'जय चितोड' हा चित्रपट त्यातील लताच्या गाण्यांमुळे स्मरणात आहे. तसेच त्यांच्यावर एक हिंदी मालीकाही पुर्वी प्रसारित होत असे.

Chinmay 'भारद्वाज' said...

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. मी दिलेली कुठली माहिती तुम्हास आक्षेपार्ह आहे हे मला नीटस लक्षात आलेल नाही. मी जे संदर्भ दिलेत ते कोणत्या वाक्यांसाठी आहेत हे मी स्पष्ट करतो. आशा करतो की तुमचे गैरसमज दूर होतील.

जोधा-बाईचे नाव अकबराच्या हारेम मधे दाखल झाल्यावर मरीय-ए-झमाना झाले हे मी वीकीपिडीयातून घेतले.

दख्खनात लाख भर (की चार लाख) लोकांची केलेली कत्तल हे मी शिव-छत्रपती पुस्तकात वाचलेलं आठवत. "सुल्तानी अंमलाची ऐन मध्यरात्र" अस काहीस प्रकरणाच नाव आहे. आता कत्तल करणारी बादशाही गंगु हसन बहमनी होती की अजुन कोणी हे मला पुनश्च वाचाव लागेल. पण माझी प्रत सध्या भारतात असल्यामुळे मला ते लगेच शक्य नाही. एक लाख लोकांची कत्तल हा मुद्दा इथे अधिक महत्त्वाचा आहे असं मला वाटत.

हिंदु-कुश पर्वतमालेचं नाव हिंदु-कुश कशावरुन पडले असावे याबद्दल मला संदर्भ द्यायची गरज वाटली नाही. अर्थात, हे सगळं खोटं आहे व इस्लाम हा शांतीचा धर्म आहे आणि हिंदु लोकांनी स्वतः आत्महत्या करुन आता ती लोक मुसलमानांना नाव ठेवता आहेत हे म्हणणारेही तुम्हाला भेटतील. पण मला त्यांचे संदर्भ देउ नयेत ही विनंती.

पंडित नेहरुं बद्दल माझे मत फारस चांगल नाही. चीन युध्द त्यांच्यामुळे आपण हारलो. हिंदु-द्वेष्टा व स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारताचा पंतप्रधान बनण्यास, उपलब्ध पुढार्‍यांमधे सगळ्यात कमकुवत असलेलं हे व्यक्तीमत्व मला फारस रुचत नाही. या दिग्गज पुरुषांस शिवाजी राजे दरोडेखोर वाटायचे हे मला तुम्हांस सांगायला नको. बहुधा त्यांनी हे मत "भारताचा शोध" मधेच प्रकाशित केलेले आहे. त्यांना अकबर आपला "बाप" वाटत असेल तर मला त्याबद्दल आश्चर्य नाही.

तुम्ही दिलेले इतर संदर्भांवर मी प्रतिक्रीया देणे उचित नाही कारण मी या इतिहासकारांचे कुठलेही साहित्य वाचलेले नाहे. पण भारतात इतिहासकार हे मुसलमानांना थोर दाखविण्यात पटाईत आहेत हे नक्की. अरुण शौरींच "एमिनंट हिस्टोरीयन" अवश्य वाचावे.

अकबर धर्मवेडा नव्हता की होता याचे माप कसे करायचे. त्याची तुलना औरंगझेबासोबत करायची की बाबर सोबत करायची की मुहम्मद बीन कासिम सोबत करायची की अल्लाउद्दीन खिलजी सोबत करायची? या सैतानांच्या तुलनेत अकबर नक्कीच चांगला होता. म्हणुनच माझ्या आदल्या प्रतिक्रीयेत मी 'दगडापेक्षा वीट मऊ" हे म्हटले आहे. तुम्हास शिवकालीन कुतुबशाही बादशहा बद्दल माहितीच असणार? खरतर त्याच्यावर त्याच्यावर चित्रपट काढण्यास काहीही हरकत नाही.

राणी पद्मिनी खोटी मानली तरी मुसलमानांना घाबरुन कोणी जोहार केलाच नाही हे प्रतिपादन आपली इतिहासकार करतात का? कारण, इथे मुद्दा जोहारचा आहे. कृपया मला कळवावे.

(क्रमश:)

Chinmay 'भारद्वाज' said...

औरंगझेब हा अकबराचा नातू. माझी चूक ध्यानात आणुन दिल्याबद्दल आपला आभारी आहे.

"स्लेव ट्रेड इन इस्लामिक इंडिया" बद्दल मी अधिक माहिती लौकरच उपलब्ध करुन देइन. मध्यंतरीत श्री राम स्वरुप यांची पुस्तक वाचावीत ही नम्र विनंती.

महाराणा प्रताप बद्दल निघालेल्या एकुलत्या एक चित्रपटाबद्दल माहिती पुरविल्याबद्दल धन्यवाद.

आपण दिलेल्या विसोबांचे लेख मी आधीही वाचले आहेत. ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांनी लिहिलेलीच नाही अस काहीस या व्यक्तीस वाटत. पण शैव-वैष्णव वादांचे थोडे आकलन होउन जर का श्री विसोबांना ज्ञानेश्वरी बद्दल प्रश्न उपस्थित करावेसे वाटत असतील तर त्यावर नेमकं उत्तर काय हे मला माहिती नाही. एवढच निवेदन करु शकतो की आद्य शंकराचार्यांच्या रचना वाचाव्यात व गोविंदाष्टकम मधील "शैवम् केवल शांतं प्रणमत गोविंदं परमानंदम् ॥ या ओळीचा अर्थ नीट लक्षात घ्यावा. तसेच, शिव-लिंग हे पुरुषाचे लिंग असुन हिंदु त्याची पुजा का करतात असा कुठलासा लेख ही यांनी लिहिलेला आहे. या विषयाबद्दल मला अजुन बोलायची ईच्छा नाही. याच्यावर बरीच वादावादी मी अनेक लोकांशी केलेली आहे. गुगल करुन या विषयाबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल.

आता माझ्या लेखाबद्दल - हा लेख लिहिण्यामागे माझा हेतू वाचकांना मुस्लीम इतिहासाबद्दल माहिती पुरविणे कधीच नव्हता. विषय संगतीत ही माहिती पुरविणे आवश्यक होते एवढच. पण किमान ६०० वर्ष आपल्याच अंगणात हिंदुंचा झालेला अनन्वित छळ ज्या आक्रमकांनी केला त्या आक्रमकांवर चित्रपट कसे काढु शकतो हे मला आकलनी पडत नाही. या लेखाद्वारे मी त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मुसलमान येण्याआधी भारत बर्‍यापैकी प्रगत होता, लोक बर्‍यापैकी सुखी होते. भारतात मोठ-मोठाली विद्यापीठे होती (तक्षशीला, नालंदा, दिल्लीचे संस्कृत विद्यापीठ ईत्यादी) आणि मुसलमानांच्या आक्रमणा नंतर सगळ गुडुप झालं. गांधार प्रदेशात तर गेल्या हजार वर्षात नीटशी शांतत प्रस्थापित झालेली नाही. प्रगत भारत कुठे मागे पडला कोणालाच उमगल नाही. आणि अश्या केविलवाण्या इतिहासात आपल्याला प्रेम-कथा कश्या दिग्दर्शित कराव्याश्या वाटतात हे प्रकरण थोडं अचंबित करण्याजोग आहे. आपल्या इतिहासाबद्दलच प्रचंड उदासिनता भारतीयांमधे दिसते. गोवारीकर साहेब म्हणतात की ही कथा कल्पित आहे (थोडक्यात, भाकडकथा आहे!) म्हणुनच मी माझ्या लेखात त्यांना मला सुचलेल्या प्रेम-कहाण्यांबद्दल सुझाव दिलेत.

लेख लिहिण्यामागे हाच माझा प्रमुख उद्देश होता.

मी चित्रपट-गृहांवर दगडफेक करणार्‍यापैकी नाही. व्यक्तीस्वातंत्र्या अंतर्गत कोणास औरंगझेबावर चित्रपट काढावसा वाटला (टिपू सुल्तावर काढला आहेच) तर त्या बापुड्यानी खुशाल काढावा. मी बळजबरीने कोणावर आपली मते लादण्यात विश्वास ठेवत नाही. पण याच व्यक्ती स्वातंत्र्या अंतर्गत कोणी या विषयावर निषेध व्यक्त करत असेल तर त्याच्यावर "हिंदू अतिरेकी" असली लांच्छ्नही फेकली जाउ नयेत ही माझी अपेक्षा आहे.

आपण वेळ काढुन माझा लेख वाचलात व प्रतिक्रीया दिल्याबद्दल आपले पुनश्च आभार.

Anonymous said...

आपली दीर्घ प्रतिक्रीया वाचली. त्यानंतर आपला लेखही पुन्हा वाचून पाहीला. यावेळी मला आपली भुमीका अधिक चांगल्या प्रकारे समजली आहे असे मला वाटते. माझ्या प्रतिक्रीयेस आपण दखलपात्र मानले याबद्दल आभार.

विसोबांच्या सर्वच लेखांशी मी सहमत आहे अथवा असेनच असे नाही. या विषयाशी जे लेख संबंधीत वाटले, त्यांचाच मी केवळ उल्लेख केला आहे.

आपल्या सर्वच मुद्द्यांना माझा आक्षेप नाही. माझा मुख्य मुद्दा अकबराचे वेगळेपण अमान्य करून त्याला अन्य आक्रमकांच्या माळेत गोवणे हा होता आणि तो मी नीट स्पष्ट केला नसावा. अकबराविषयी जी काही सामान्य माहीती मला आहे, त्यावरून तो एक सहिष्णु राज्यकर्ता होता अशी माझी धारणा आहे. धर्माबद्दलचे त्याचे विचार त्या काळाच्या तुलनेत अत्यंत वेगळे होते. त्याला केवळ दगडापेक्षा वीट मऊ असलेला आक्रमक म्हणणे अयोग्य वाटते. मी याच अनुषंगाने आपणापाशी संदर्भांची पृच्छा केली होती. अकबराच्या प्रशासकीय धोरणांमागे किंवा साम्राज्यविस्तारामागे धार्मिक प्रेरणा होत्या असे मला जाणवलेले नाही. आपल्याला जर तसे जाणवले असेल, तर ते कशामुळे हे जाणून घेणे हा माझा मुळ उद्देश होता. त्याच्या पुर्वीच्या व नंतरच्या राज्यकर्त्यांनी जे केले, त्यामुळे अकबरालाही वर्ज्य मानावे असे का?

श्री. गोवारीकरांच्या चित्रपटाबद्दल मला असे वाटते की अकबराला एक प्रतिक म्हणून वापरून त्याना स्वदेस सारखाच एक नैतिक शिकवण देणारा चित्रपट काढायचा असावा. प्रेमकथा हा काही त्यांचा प्रांत वाटत नाही. काही तत्व धरून लढणारा नायक त्यांच्या पुर्वीच्या चित्रपटांतदेखील (बाजी, लगान, स्वदेस ई.) आलेला आहे. लगान व स्वदेस मध्ये तो आपल्याला पटलेल्या तत्वांसाठी लढा देतो. गोवारीकरांचा अकबरही असाच आहे. त्याला त्यानी प्रेमकथेची जोड देऊन पाहीले असावे. जर त्याना सहिष्णुतेचा गौरव करायचा होता असे मानले तर अकबराची निवड वावगी वाटत नाही. पण हे माझे अंदाज आहेत.

अवांतर १: Eminent Historians चा रोख मुख्यतः वर्गसंघर्षच्या दृष्टीकोनातुन इतिहासाची फेरमांडणी करणार्‍या मार्क्सवादी इतिहासकारांवर आहे असा माझा समज आहे.

अवांतर २: माझ्या वाचनात अल्लाऊद्दीन खिलजीच्या स्वारीत जोहार झालाच नाही असे कधीच आलेले नाही.

Waman Parulekar said...

कृपया आपण जे लिहीले आहे ते कशाच्या आधारे लिहीले आहे ते स्पष्ट करा. संदर्भ द्या तरच विश्वास ठेवता येइल. आजची पीढी ही सुजाण आहे, काहीही सांगून ती विश्वास ठेवणार नाही.

Chinmay 'भारद्वाज' said...

मृण्मय,

विसोबांच्या लेखांवर आपल्या काही प्रतिक्रिया मी वाचल्या म्हणुनच त्यांच्या लेखांबद्दल मी एवढे सविस्तर लिहिले.

दगडा पेक्षा वीट मउ हे मी पुनश्च प्रतिपादन करतो आहे. अकबर त्याच्या इतर मुसलमानी आक्रमक भाउ-बंदांसारखा रक्तपिपासु नव्हता याचा अर्थ त्याच्यावर लगेच चित्रपट काढायल हवेत अस नव्हे. तुम्ही मला सांगा की अकबराच्या जमान्यात भारताची काय प्रगती झाली? कुठले शोध लागलेत, कुठल्या विद्यापीठांची स्थापना झाली? धर्माची कुठल्या प्रकारे प्रगती झाली? कींवा भारतीयांचे आयुष्य कुठल्या प्रकारे सुविधाजनक व सुरक्षित झाले? प्रगती या शब्दाच्या व्याख्ये अंतर्गत मोजल्या जाणार्‍या किमान गोष्टींपैकी कुठली गोष्ट अकबराच्या जमान्यात झाली ते मल तुम्ही सांगा? एवढ नक्की की शतकानुशतके हिंदुंची कत्तल करुनही हिंदु जिवंतच होते तेंव्हा हिंदुस्थानावर राज्य करायचे असेल तर हिंदुंशी भांडण्या पेक्षा त्यांच्याशी गठबंधन केलेले बरे हे या अकबराने बरोब्बर ताडले.

आपल्या म्हणण्यानुसार जर का अकबर एवढाच सहिष्णु व उदार राजा होता तर आसाम च्या अहोम राजांनी त्याचे मांडलिकत्व न पत्कारता त्याच्याशी युध्द का केलीत? महाराणा प्रताप ने त्याच्याशी युध्द का केले? आपल्या विचार प्रणाली नुसार अकबर थोर, महान व भारताचा एकुलता एक सहिष्णु राजा होता (त्याच्यावर याच कारणांसाठी चित्रपट काढणे आवश्यक आहे. बरोबर?) तर आसाम चे अहोम किंवा महाराणा प्रताप देशद्रोही नव्हे का? आणि याच अकबराच्या पिल्लावळांशी भांडण घेतलीत तर आपले शिवबा पण देशद्रोहीच नाही का ठरलेत?

आपल म्हणण की गोवारीकरांना अकबर नैतिकतेचा पुतळा भासला. हिंदु बायकांना हारेम मधे दाखल करणारा अकबर नैतिक, जिझिया कर मागे घेतला म्हणुन अकबर नैतिक, पुरातन सरस्वती मंदिराच्या अवशेषांवर फतेहपुर-सिकरी बांधणारा अकबर नैतिक! मला हे गणित काही कळत नाही एवढच मी म्हणेन.

भारताच्या दारुण व रक्तरंजित ईतिहासात एक सुल्तान असा मिळाला की त्याने कमी हिंदुंना मारले व कमी मंदिरे पाडलित. म्हणुन आजचे गोवारीकर त्यांच्यावर प्रेमकथेची फोडणी घालुन चित्रपट काढणार व आपल्या सारखे गोवारीकराचे समर्थन करणार हा प्रकार मला थोडा लाजिरवाणा वाटतो. पण हे माझे मत आहे.

व्यक्तिस्वातंत्र्यातंर्गत आपल्याला व मला, दोघांना गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याची मुभा आहे. त्यामुळे दोघांची या विषयावर सहमती नाही यावर निदान सहमत होउया व विषयांस पूर्णविराम देउया.



एमिनंट हिस्टोरियन हे वर्गसंघर्षाशी संबधित कम्युनिस्ट मूर्खांबद्दल नाही. चोर, नालायक व भारत द्वेष्टे कम्युनिस्ट लोकांबद्दल हे पुस्तक आहे. या दिशद्रोह्यांनी भारतीय ईतिहासाला असत्याच्या वर्खात बांधुन भारतीय शिक्षणप्रणालीत कसे घुसविले आहे याबद्दल हे पुस्तक पुरावे देतो. आपण अवश्य वाचावे हि विनंती.

तसेच श्री राम स्वरुप व श्री सीताराम गोयल यांचीही पुस्तके वाचावित.

मुसलमानी अत्याचारांबद्दल वाचुन कंटाळा आला तर गोव्यातील ख्रिश्चन पाद्रि लोकांनी केलेल्या 'मनोरम' घटनांबद्दल पुस्तके अवश्य वाचावित.



@वामन परुळेकर,

कशाबद्दल पुरावे हवे आहेत तुम्हाला? एवढा लेख वाचुन व त्यावरीत विस्तृत प्रतिक्रीया वाचुन कुठल्या पुराव्यांची कमी जाणावली तुम्हांस यावर थोडे विशेषण करावे ही विनंती.

मी काही बोलत नाही व आजची पीढी सुजाण तर नक्कीच नाही.

prasad bokil said...

I read the article and comments.
I am not a great scholar of history but just want to throw different light on it.

I got opportunity to study Mughal paintings. I was suspicious about studying them before but it definitely broadened my viewpoint.

Art is always for political propaganda. It shows the viewpoint of rulers and authorities. And believe me what we get from the paintings at Akabar's time speak the history.

Another thing:
Although the film is not historical it talks about a couple with inter religion marriage but following their own religions and giving respect to other's. That's the positive message. It is better to project wrong but positive history than the right but harmful.

Digambar Sawant said...

सहा सोनेरी पाने - वि. दा. सावरकर वाचावे

Chinmay 'भारद्वाज' said...

@प्रसाद बोकील

आपल्या प्रतिक्रीये बद्दल मी आपला आभारी आहे. लिहिलेल्या लेखाचा उद्देश या विषया बद्दल संवाद सुरु करण्याचा होता तो मिळत असलेल्या प्रतिक्रिया बघुन अंशतः सफल होतो आहे असे म्हणण्यास काही आपत्ती नाही.

आपण प्रस्तुत केलेल्या मुद्द्यांचा माझ्या दृष्टीने उत्तर देण्याचा प्रयत्न मी पुढे करतो आहे.

राजे, ईतिहास आपण लिहित नाही की ती आपली वैयक्तिक संपत्ती सुध्दा नाही. जे आहे ते आहे. जे घडल ते घडल. आता ते आपल्याला रुचतय की नाही हा प्रश्नच इथे उपस्थित होत नाही. पृथ्वीराजाने मुहम्मद घुरीला पहिल्याच झटक्यात का जीवे मारल नाही? मुसलमानी आक्रमकांपुढे हिंदु राजे संघटीत का झाले नाहीत? स्वतःला सिंह म्हणवणार्‍या राजपुतांनी घरातील आया-बहिणींना मुसलमानी आक्रमकांना का विकायला सुरुवात केली? या सारख्या प्रश्नांची उत्तरे आवडत नसतील तरी अघटितच वस्तुस्थिती आहे. आणि ती वस्तुस्थिती स्विकारणे अपरिहार्य आहे.

जवळ-जवळ सहाशे वर्ष मुसलमानी आक्रमकांनी भारतीय उपखंडात सैतानी थैमान घातला. लाखो लोकांची क्रुरपणे हत्या केली. विद्यापीठांची होळी केली. शेकडो सुंदर मंदिरे धुळीस मिळविली. का तर त्यांचा धर्म हे करण्याची परवानगी देतो म्हणुन.

आपणांस मुघल कलाकृती आवडल्यात म्हणुन तुम्ही रक्तरंजित ईतिहास विसरायला तयार असाल तर भविष्यातील पिढ्या गोत्यात येतील एवढ नक्की. ईतिहासाची पुनरावृत्ती कालांतरानी होतेच आणि होईलच. मुहम्मद बिन कासिम ने पेशावर पहिल्यांदा लुटल्याला बाराशे वर्ष होऊन गेलीत तरी आपला समाज शंखपणा सोडायला तयार नाहीया हा दैवी चमत्कारच मानावा लागेल. आणि आपण पुनःश्च ईतिहास जगण्याकडे वाटचाल करतो आहे या विचाराने अंगावर शहारे येतात.

मी लिहिलेल्या मुद्द्यांपैकी काही गोष्टी खटकत असतील तर कृपया कळवावे.

धन्यवाद.



@दिगंबर

आपल्या प्रतिक्रीये बद्दल मी आपला आभारी आहे. आपण सुचविलेले सावरकरांचे साहित्य मी अवश्य वाचीन.

Unknown said...

this is waste of time