स्वतंत्र भारताची सगळ्यात मोठी शोकांतिका म्हणजे विद्यार्थ्यांना भारतीय इतिहास न शिकविणे. नेहरूंच्या काश्मीर आणि चीन च्या चुका एखाद वेळेस माफ केल्या जाऊ शकतात पण आपल्या देशाचा प्रगल्भ इतिहास पुढल्या पिढी पासून मुद्दाम लपवून जे ठेवल्या गेले, त्याच पाप नेहरू कुठे फेडतील देव च जाणो. भारत ही एक संकल्पना आणि विविध प्रातांनी त्या संकल्पनेला धरून गेल्या हजार वर्षात घडवलेला इतिहास ही केवळ धरोहर नसून, तो इतिहास आपल्याला सद्य परिस्थितीत काही शिकवू शकतो आणि भविष्यात त्याच चुका करणे टाळू शकतो. सशक्त राष्ट्र केवळ सैन्यावर उभरत नसते तर शक्तीशाली सैन्या मागे शक्तीशाली, सुशिक्षित, आणि ज्वाजल्य देशाभिमान असलेला समाज भक्कमपणे उभा असावा लागतो. आणि आपल्या गेल्या हजार वर्षाच्या इतिहासाची कास धरूनच आपण त्या समाजाची निर्मिती करू शकतो. त्यामुळे गेली सत्तर वर्षे आपल्या समाजाला इतिहासांधळे करण्या साठी धडपडणारे सगळ्या शिक्षण मंत्री आणि शिक्षण क्षेत्रात कामे करणाऱ्या विरुद्ध फौजदारी खटले दाखल करायला हवेत.
मी महाराष्ट्रात शिकलो म्हणून नशिबानी आम्हाला शिवाजींचा इतिहास शिकविला गेला पण पेशाव्यंबद्दल एक अक्षर ही शिकवले नाही. अक्षर नाही तर निदान अवाक्षरही शिकविले असते तरी ओळख तरी झाली असती! पण पेशवे नाही, मल्हारराव नाही, अहिल्याबाई नाही, आंग्रे नाही, महादजी नाही आणि एवढच काय तर मी नागपूरचा पण मला रघूजीराजे भोसल्यांबाद्द्ल काडीमात्र माहिती नाही. शिवाजी महाराजां नंतर थेट इंग्रज पण पळशी च्या पहिल्या युद्धात इंग्रजांना त्यांच्याच युद्ध शैलीत पाणी पाजणारा आणि अगदी पाच वर्षे अधिक जगले असते तर आजच्या भारताचा चेहरा-मोहरा बदलविण्याची ताकद असलेला मावळत्या मराठी साम्राज्याचा शेवटचा तारा - यशवंतराव होळकर हे नाव तरी महाराष्ट्रात किती लोकांस ठाऊक आहे?
शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या स्वराज्याच्या वाटेवर पुढी सव्वाशे वर्ष अगणित मराठी योध्यांनी भारताच्या काना कोपर्यात आपल्या बुद्धीचे आणि तलवारीचे घसघशीत ठसे उमटवले. अगदी आपल्या स्वतंत्र भारताच्या सीमारेखा या सन १७७० च्या मारठी सामार्ज्याची सीमा आहेत. पण असल्या सेना धुरंधरांना झाकोळून गांधी-नेहरू नावाचा जप गळी घालणार्या स्वतंत्र भारतात पारातंत्रित माने घेऊन वावरणाऱ्या आपल्या समाजाची कीव येते.
असो. आता देवाच्या (अमेरिकेच्या?) दयेने इंटरनेट चे जाळे सर्वदूर उपलबद्ध आहे. आणि सगळा इतिहास ही विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. त्यामुळे तो वाचून न वाचाणाऱ्याना सांगणे आवश्यक आहे. शिवाजी महाराजां पासून ते यशवंतरावा पर्यंतच्या सेनानायकांनी अफझलखाना पासून ते इंग्रजांचा पराभव केला आणि निघून गेलेत. प्रचार आणि प्रसार ही आपल्या काळातली शस्त्रे आहेत. या शस्त्रांचा नीट उपयोग करून आपल्या काळातील करंटे राजकारणी, घरभेदी मिडीया आणि औरंग्या पाकिस्तान ला हरविणे आपल्यालाच प्राप्त आहे.
- * The Era of Bajirao by Uday S.Kulkarni.
http://www.amazon.in/Era-Baji-rao-Uday-Kulkarni/dp/8192108031
6 comments:
agdi barobar. he jya diwashi ghadel to diwas sonyacha .
खूप छान अभ्यासपुर्ण लेख आहेत तुमचे..असेच लिहित जा.. शुभेच्छा !
खरचं नेहरू गांधी यांनी इतिहास लपवून भारतीयांना नेहमी मवाळ बनव्ण्याचाच प्रयत्न केला
great... __/\__
Good information
too good
Post a Comment