पहलगाम मध्ये झालेले हत्याकांड काही नवीन नाहीं. हिंदूंना हिंदू असण्याबद्दल ठार मारण्याची प्रथा भारतात शेकडो वर्षांपासून आहे. आणि एक अत्यंत 'मानवतावादी' आणि 'शांतीप्रिय' धर्माचे अनुयायी या कामात 'उस्ताद' आहे. पण या नित्य नेमाने घडणाऱ्या हिंदू हत्ये नंतरची 'क्रोनोलॉजि' आपण समजून घेऊया. पुढे मांडलेल्या कृती या दुधाच्या गाळण्या आहेत असा विचार करा. दूध गाळले कि साय गाळण्यात उरते. इथे मात्र उरते नुसती उकिरड्यावरची घाण.
प्रत्येक वेळेस अशी घटना घडली कि सगळे लोक, ज्यात हिंदूही असतात, एकत्रित झाल्याची भावना मनात आणतात. खऱ्यात कोणीही एकत्र आलेले नसतात. पण स्वतःची समजून लोक तशी घालतात. झालेले हत्याकांड इतके निर्मम असते कि शांतीप्रिय-धर्म प्रेमी, (शांतीप्रिय धर्माचे अनुयायी नाहीं बर का, त्यांचे प्रेमी) सेकुलर म्हणवणारे षंढ आणि शंख लोकही निदान प्रतिक्रिये करता तरी या हत्याकांडाची कडक शब्दात निषेध दर्शवितात. तरुण जनता प्लकार्ड घेऊन थोडे मोर्चे काढतातआणि सामोसे-भजी किंव्हा खर्रा खाल्ल्या हात झटकावा तसे आता सोशल मीडियावर स्टेटस टाकून मोकळे होतात. (" All Eyes On ") या प्रत्येक गाळण्यातून हिंदू शब्द आता हळू हळू नाहीसा होऊ लागतो. शब्दांचा खेळ बघा 'हिंदूंची मुसलमानी धर्मांधांनी केलेल्या निर्मम हत्येचा निषेध' असे कोणी लिहीत नाहीं. 'धर्मांधांनी केलेल्या हत्येचा निषेध' एवढेच सुरुवातीला म्हंटल्या जाते. मग हळू हळू त्याचे रूपांतर 'या 'हत्याकांडाचा निषेध' वर पाळी येते. मग अजून एक छोटेखानी गाळणे लागते. 'या हिंसेचा विरोध झालाच पाहिजे' किंव्हा 'या दहशतवादाचा निषेध' यावर पाळी येते. आणि मग सगळ्यात शेवटी, उकिरड्यावरची घाण म्हणजे 'शांती, भाईचारा आणि मानवता हीच खरी सत्ये आहेत' ' मेलेले आणि जखमींसाठी आमच्या प्रार्थना' किंव्हा 'आजच्या जगात क्रूरतेला आणि धर्मांधतेला जागा नाहीं' इत्यादी घाणीचाही चोथा काढावा तसे बरळल्या जाते. या सगळ्यात हिंदू शब्द गळतो, इस्लाम शब्द कधी आलाच नसतो. निर्मम शब्दाला टांग दिल्या जाते. दहशतवाद, क्रूरता, धर्मांधता इत्यादींचा नपुंसक बनविल्या जाते आणि पुढे तर या सगळ्या गोष्टी सगळ्याच धर्मात आहेत असेही बोलबाला व्हायला लागतो.
मग सुरु होत कि सरकार काय करते आहे किंव्हा काय करत नाहीं याची चर्चा. काय करायला हवे याचा उहापोह. मोदीजींना नावे ठेवा, संघाला नाव ठेवा, त्यांना त्यांची कामे करू द्या, तुमची काय कर्तव्य आहेत, याचा विचार करा? मग पुढे मुसलमानांना त्रास दिला, वक्फ बिल पास केले म्हणून मग ते बिचारे उद्विग्न होऊन असे कृत्य करतात इत्यादी गरळ ओकल्या जाते. या सगळ्यात काही दिवस गेले कि लोक हळू हळू विसरून जातात आणि आपापल्या कामाला लागतात. घाण तशीच राहते, किंबहुना वाढते, डुकरांना सोयीचं होतं, त्यांना लोळायला अजून फावतं. दुर्गंध सगळीकडे पसरतो, लोकांची डोकी खराब करतो, लोकांचे मेंदू कुजवतो. उकिरडे बघवत नाहीं म्हणून लोक डोळे बंद करतात. पुढच्या हत्याकांडासाठी मार्ग मोकळे होतात.
पहलगाम मध्ये मारलेल्या प्रत्येक पुरुषाला आधी त्याचा धर्म विचारला. काहींना इस्लामी कलमा पढायला लावला, काहींचे कपडे काढून गुप्तांग पडताळलीत आणि जे हिंदू आहेत त्यांच्या डोक्यात गोळ्या घातल्यात. त्यांच्या बायका-पोरांसमोर. कोणाची जात विचारली नाहीं, पोटजात विचारली नाहीं, भाषा, राज्य विचारली नाहीत. कपाळाचे गंध उभं कि आडवं, खांद्यावर जानवं बघितले नाहीं. धर्म कुठला एवढेच विचारले. आपल्या धर्माचे तुकडे करून, विखरून, विस्कळीत होऊन उभे राहणारे आंधळे आपण आहोत. शांतीप्रिय डोळे उघडे ठेऊन आहेत कारण त्यांचे लक्ष त्यांच्यासमोर पोपटाच्या डोळ्यासारखे स्वच्छ आहे. काफिरांना मारा, त्यांच्या बायका-पोरांना गुलामीत विका, निर्वंश करा. आणि ते हजार वर्षे सातत्याने करीत आले आहेत. अगदी १९४७ साल च्या फाळणीतही तेच केले. फाळणीनंतर पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये त्यांनी तेच केले. १९८९ ला काश्मीर मधेही तेच केले.
अगदी हे शब्द लिहितांना बांगलादेश मध्ये हिंदूंना हिंदू म्हणून मारतायत. पश्चिम बंगाल मध्ये मुर्शिदाबाद मध्ये, मालदा मध्ये हिंदूंना हिंदू म्हणून मारतायत. पाकिस्तानी सेनेचा सेनापती 'आम्ही हिंदू भारताला नामशेष करू' या धमक्या देतो आहे.
हे असाच चालत राहणार. आपण श्रीयुत गोंधळे बनून फिरणार. सगळे लोक सारखे नसतात. मान्य. पण म्हणून सगळ्यांशी सारखा वागायला कोण म्हणतय? विचारसरणीचा विरोध हवा, प्रवृत्तीचा सामना करायला हवा, धर्मांधतेसोबत युद्ध करायला हवे. मानसिक विस्कळता या बाबतीत नको.
जो पर्यंत सनातन संस्कृतीवर विश्वास ठेवणारे आहेत तो पर्यंत 'बुत-शकीन गळे कापायला येणारच. प्रश्न असा आहे कि, आपण सनातन संस्कृतीचे पालन करण्याचे धाडस दाखवीत राहणार कि नाहीं? त्यासाठी जागृत होणार कि नाहीं? त्या साठी एकत्रित येणार कि नाहीं?
निदान, त्या साठी डोळे उघडणार कि नाहीं?
नाहीं तर 'कलमा' चे पाठांतर सुरु करा!